महाराष्ट्रातील वनांचे प्रकार | वनांचे उपयोग संपूर्ण माहिती 2022

 महाराष्ट्र : वने

महाराष्ट्र वने
महाराष्ट्र वने



ऑगस्ट २०१५ अखेर महाराष्ट्रातील एकूण वनव्याप्त क्षेत्र : ६१,९३९ चौ. किमी किंवा (५२.१ लाख हेक्टर)

ऑगस्ट २०१५ अखेर महाराष्ट्रात वनांखालील (जंगले) प्रदेशाचे एकूण भूक्षेत्राशी प्रमाण : सुमारे २०.१२%

वनांचे वर्गीकरण : राखीव वने : ५११७० चौ.किमी, संरक्षित वने : ६६८१ चौकिमी, अवर्गीकृत वने : ३७३० चौकिमी 

भारतातील वनक्षेत्राशी महाराष्ट्राच्या वनक्षेत्राचे प्रमाण : सुमारे ७.७७ टक्के 

राज्य वनविभागाचे मुख्यालय : नागपूर  

महाराष्ट्रात दाट वनांचे प्रमाण : सुमारे ११.५% 

राज्यात अभयारण्यांखालील क्षेत्र : १०,०५७ चौ.किमी. (३.२६%) 

महाराष्ट्र निसर्ग पर्यटन महामंडळाची स्थापना : डिसेंबर २०१५, मुख्यालय : नागपूर

राज्यात सर्वाधिक वनक्षेत्र (९०.४%) गडचिरोली जिल्ह्यात तर सर्वात कमी वनक्षेत्र (४३ चौ.कीमी) लातर जिल्ह्यात आहे. (०.६%)

महाराष्ट्र : वनांचे वर्गीकरण

१. उष्ण कटीबंधीय सदाहरित वने : वार्षिक २०० सेमी. हन अधिक पावसाच्या प्रदेशात आढळतात. पश्चिम घाट, सह्याद्री घाटमाथा, गाविलगड (अमरावती), चंदपर, गडचिरोली येथे ही वने आढळतात.

प्रमुख वृक्ष : जांभूळ, पिसा. पारजांब, पांढरा सिडार, नागचंपा, फणस, शिसव, कावशी, मॅग्नेलिया, ओक, बांबू, कोकम, हिरडा, तेल्याताड.

२. उष्ण कटीबंधीय निम सदाहरित वने : वार्षिक १५० ते २०० सेमी. पावसाच्या प्रदेशात आढळतात. सह्याद्रीचा पश्चिम व पूर्व उतार तसेचसिंधुदुर्ग, रत्नागिरी, लोणावळा या जिल्ह्यांत ही वने आढळतात.

प्रमुख वृक्ष : किंजळ, हिरडा, बेहडा, रानफणस, कदंब, शिसम, किंडल, बिबळा, सावर, किन्हई, ऐन, वावळी, जीबत, नाणा, हेद, गेळा. 

वैशिष्ट्य : डोंगरभागात 'कुमारी' हा स्थलांतरित शेती प्रकार आढळतो. वनस्पतींची विविधता, रुंदपर्णी व सर्वात उंच वने. वृक्षांची उंची : ६० ते ६५ मीटर.

३) उपोष्ण कटिबंधीय सदाहरित वने : वार्षिक ३५० ते ४०० सेमी. पावसाच्या प्रदेशात आढळतात. महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान, आंबोली, भिमाशंकर, अस्तंभा डोंगर, गाविलगड टेकड्यांत ही वने आढळतात. 

प्रमुख वृक्ष :अंजन, हिरडा, बेहडा, आंबा, जांभळ, शेंद्री, रानफणस, सुरंगी, पिशा, लाल देवदार, पारजांब, काटेकुवर, येवती, फांगळा, रामेण, बामणी, दिंडा, फापटी, ओंबळ 

४) आद्र पानझडी वने (मोसमी वने) : वार्षिक १२५ ते २०० सेमी. पावसाच्या प्रदेशात आढळतात. महाराष्ट्रातील एकूण वनक्षेत्रात या वनांचे प्रमाण सुमारे ३०% आहे. . गडचिरोली जिल्ह्यात भामरागड, सुरजागड, टिपरागड: चांदुरगड (जि. चंद्रपूर), नवेगाव (भंडारा) तसेच कोल्हापूर, धुळे, नाशिक या जिल्ह्यांत ; हरिश्चंद्र-बालाघाट, सातमाळा, महादेव डोंगरांत ही वने आढळतात. 

प्रमुख वृक्ष : सागवान, शिसम, सावर, हळदू, बीजा, कळंब, ऐन, बोंडारा, शिरिष, धावडा, अंजन, अर्जुन, सादडा, खैर, आवळा, बिबळा. साग हा या वनांतील आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष आहे. बाष्पीभवन टाळण्यासाठी हे वृक्ष कोरड्या ऋतूत स्वत:ची पाने गाळतात. गडचिरोली जिल्ह्यात अहेरी येथे प्राणहिता नदीकाठी आढळणाऱ्या या वनांना ‘अल्लापल्ली वने' म्हणतात.

५) शुष्क पानझडी वने : वार्षिक ५० ते १०० सेमी. पावसाच्या प्रदेशात आढळतात. विदर्भ, सह्याद्रीचा पूर्व उतार, सातपुडा ; धुळे, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा या जिल्ह्यांत ही वने आढळतात. राज्यातील एकूण वनक्षेत्रात या वनांचे प्रमाण ६० ते ६२% इतके आहे. 

प्रमुख वृक्ष : सावर, आवळा, तिवस, चारोळी, बेहडा, शेंदरी, चेरी, पळस, बारतोंडी, बेल, खैर, धामण, टेंबुर्णी, बोर, बाभूळ, बीजसाल. विरळ स्वरुपाची ही वने जळणासाठी उपयुक्त आहे.

६) शुष्क काटेरी वने : वार्षिक ५० सेमी. पेक्षा कमी पावसाच्या प्रदेशात ही वने आढळतात. •मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, जळगाव, धुळे, अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत ही वने आढळतात. 

प्रमुख वृक्ष : बोर, बाभूळ, कोरफड, खैर, सालई, निवडुंग, निंब, हिवर, टाकळा. राज्यातील एकूण वनक्षेत्रात या वनांचे प्रमाण १७% इतके आहे.

७) खाजणवने (मॅग्रोव्ह वने) : नारळ, ताड, माड, पोफळी, कांदळ, चिपी, मरांडी, तीस, तिवर, काजळी, सुंद्री. . पश्चिम किनाऱ्यावर नद्यांच्या मुखांशी दलदलीच्या खाजणक्षेत्रात ही वने आढळतात. (प्रमाण : ०.१ ते ०.२%)

पर्यावरण समतोलासाठी कोणत्याही प्रदेशातील ३३% जमीन वनांखाली असणे गरजेचे असते.

२००६ : महाराष्ट्रात वनसंवर्धनासाठी 'संत तुकाराम वनग्राम योजना' सुरू. 

उद्देश : अवैध वृक्षतोडीला विरोध, वनसंपतीचे संरक्षण, वने व वन्यजीवांबाबत जागृती.

नागपूर या प्रशासकीय विभागात सर्वाधिक वनक्षेत्र आहे तर औरंगाबाद या विभागात सर्वात कमी वनक्षेत्र आहे. महाराष्ट्रात घनदाट वनक्षेत्र पश्चिम घाट, नागपूर विभाग व अमरावती विभागात एकवटले आहे.

राज्यातील सर्वाधिक वने : 

१) विदर्भ : ५५%, 

२) पश्चिम महाराष्ट्र : ४०%, 

३) मराठवाडा : ५% 

सर्वाधिक वनक्षेत्राचे जिल्हे : १) गडचिरोली, २) अमरावती, ३) चंद्रपूर, ४) नाशिक 

सर्वात कमी वनक्षेत्राचे जिल्हे : १) मुंबई शहर, २) लातूर, ३) सोलापूर, ४) उस्मानाबाद 

वनांचे उपयोग : 

१. मृद संवर्धन ; जमिनीची धूप कमी होते. 

२. पर्यावरण संवर्धन ; वनांमुळे ढग अडवले जाऊन पाऊस पडतो. 

साग, ऐन, खैर, शिसव हे वृक्ष इमारती व फर्निचर उद्योगात उपयुक्त 

कोरफड - औषधनिर्मितीसाठी उपयुक्त 

कागदनिर्मिती कारखान्यात (उदा. बल्लारपूर-चंद्रपूर) कच्चा माल म्हणून बांबू व वेत वापरतात. 

सिरपूर (आंध्र प्रदेश) व सेंट्रल पल्प मिल (गुजरात) या कागदगिरण्यांना महाराष्ट्रातील जंगलांतून कच्चा माल पुरवला जातो. खैरापासून कात बनवला जातो. (डहाण. चंद्रपर) 

आगकाड्या बनविण्यासाठी 'सेमल' (शाल्मली) या वृक्षाचे मृदू लाकूड वापरतात. 

धुळे, नंदूरबार येथील ‘रोशा' गवतापासून सुगंधी तेल बनविले जाते. 

हिरड्यापासून 'टॅनिन' बनविले जाते. 

बाभूळ, निंब यांच्या लाकडापासून शेती औजारे, तर त्यांच्या सालीचा उपयोग कातडी कमविण्यासाठी. 

महाराष्ट्र शासनाने पर्यावरण संवर्धनासाठी ‘शतकोटी वृक्ष लागवड' ही योजना सुरू केली आहे.

Post a Comment

0 Comments