महाराष्ट्रातील पिके |
महाराष्ट्रातील प्रमुख पिके व उत्पादक जिल्हे
प्रमुख पिके |
उत्पादक जिल्हे |
ज्वारी |
सोलापूर, उस्मानाबाद,
नाशिक |
तांदूळ |
रायगड, रत्नागिरी,
सिंधुदुर्ग, भंडारा, चंद्रपूर |
बाजरी |
अहमदनगर, पुणे |
गहू |
नाशिक, नागपूर |
ऊस |
अहमदनगर, कोल्हापूर,
सांगली |
कापूस |
धुळे, अकोला,
वाशीम, अमरावती, यवतमाळ |
तंबाखू |
कोल्हापूर, सांगली,
सातारा |
कांदा-लसूण |
निफाड व लासलगाव (नाशिक), जुन्नर व फुरसुंगी (पुणे) |
हळद |
सांगली, सातारा |
राज्यात खरीपाचे सर्वाधिक क्षेत्र अकोला जिल्ह्यात तर खरीपाचे सर्वात कमी क्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. राज्यात रब्बीचे सर्वाधिक क्षेत्र सोलापूर जिल्ह्यात तर रब्बीचे सर्वात कमी क्षेत्र रत्नागिरी जिल्ह्यात आहे. देशातील ज्वारीखालील एकूण क्षेत्रापैकी ४० टक्के क्षेत्र महाराष्ट्रात आहे. तर उत्पादन भारताच्या ५७% आहे. ज्वारी उत्पादनात महाराष्ट्रात सोलापूर जिल्हा आघाडीवर.
ज्वारीचे कोठार : सोलापूर, अहमदनगर व परभणी हे जिल्हे. ज्वारीच्या उत्पादनात व क्षेत्रात देशात महाराष्ट्र आघाडीवर.
यवतमाळ : ‘पांढरे सोने' पिकविणारा जिल्हा. महाराष्ट्रात कर्जत, खोपोली व रत्नागिरी येथे भात (तांदूळ) संशोधन केंद्रे आहेत. धुळे, जळगाव (तापी खोरे); बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती (पूर्णा खोरे) आणि भीमा-कृष्णा खोऱ्यात गहू पीक घेतले जाते. महाराष्ट्रात एकूण पीकक्षेत्रापैकी ३% क्षेत्र ऊस पिकाखाली, मात्र राज्याच्या आर्थिक विकासात या पिकाचे महत्त्वाचे योगदान. महाराष्ट्रात शेतकरी कुटुंबांची संख्या : १.४८ कोटी . गेल्या दीड शतकात महाराष्ट्रात अन्नधान्य लागवडीखालील क्षेत्रात १.७ दशलक्ष हेक्टरची घट झाली आहे.
महाराष्ट्र : प्रमुख पिकांचे उत्पादन (२०१५-१६)
पीक |
उत्पादन (१००० टनात) |
ऊस |
६९२३५ |
तांदूळ |
२५९६ |
ज्वारी |
१२०५ |
गहू |
९८१ |
भुईमूग |
३३४ |
बाजरी |
३३३ |
महाराष्ट्र : फलोत्पादन
ठिकाण |
प्रसिद्ध फळे |
नागपूर, अमरावती |
संत्री |
जळगाव, वसई |
केळी |
नाशिक, सांगली |
द्राक्षे |
राजेवाडी |
अंजीर |
घोलवड, ठाणे, डहाणू, पालघर |
चिकू |
रत्नागिरी |
हापूस आंबा |
दौलताबाद |
सीताफळे |
अलिबाग |
कलिंगड |
0 Comments