भारताची भूसीमा | भारतातील शेजारील देश | भारतातील राज्यांना लागून असणाऱ्या शेजारील देशांच्या सीमा

भारताची भूसीमा

भारताची-भूसीमा
भारताची भूसीमा


भारताची भूसीमा : १५,२०० कि.मी. 

भारताची भूसीमा पुढील सात राष्ट्रांना भिडलेली आहे :

१) बांग्ला देश (सर्वाधिक) 

२) चीन 

३) पाकिस्तान 

४) नेपाळ 

५) म्यानमार 

६) भूतान 

७) अफगाणिस्तान (सर्वात कमी) 

  • भारतातील एकूण १७ राज्यांची सीमा शेजारील ७ राष्ट्रांशी लागून आहे : १) गुजरात, २) राजस्थान, ३) पंजाब, ४) जम्मू-काश्मीर, ५) हिमाचल प्रदेश, ६) उत्तराखंड, ७) उत्तर प्रदेश, ८) बिहार, ९) सिक्कीम, १०) पं. बंगाल, ११) अरुणाचल प्रदेश, १२) नागालँड, १३) मणिपूर, १४) मिझोराम, १५) त्रिपूरा, १६) मेघालय, १७) आसाम. 
  • यापैकी १० राज्यांची सीमा प्रत्येकी केवळ १ देशास लागून आहे.

शेजारील एकूण ७ देशांशी लागून असणाऱ्या भारतातील १७ राज्यांच्या सीमा

१. बांगला देश (२७%) - प. बंगाल, आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम

२. चीन (२३%) - जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश

३. पाकिस्तान (२२%) - जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात

४. नेपाळ (१२%) - उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, प. बंगाल, सिक्कीम -

५. म्यानमार (१०.८%) - अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम

६. भूटान (४.५%) - सिक्कीम, प. बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश

७. अफगाणिस्तान (०.७%) - जम्मू-काश्मीर

भारतातील राज्यांना लागून असणाऱ्या शेजारील देशांच्या सीमा

१. जम्मू-काश्मीर (३ देशांना) - पाकिस्तान, चीन, अफगाणिस्तान

२. अरुणाचल प्रदेश (३ देशांना) - भूटान, चीन, म्यानमार

३. सिक्कीम (३ देशांना) - चीन, नेपाळ, भूटान

४. प. बंगाल (३ देशांना) - नेपाळ, भूटान, बांगलादेश

५. मिझोराम (२ देशांना) - म्यानमार, बांगलादेश

६. आसाम (२ देशांना) - भूटान, बांगलादेश

शेजारी देशांशी सर्वाधिक सीमा असणारी भारतातील राज्ये

१. बांग्लादेश - प. बंगाल (२२१७ किमी लांबी) 

२. चीन - जम्मू-काश्मीर (१९५४ किमी लांबी) 

३. पाकिस्तान - जम्मू-काश्मीर (१२२२ किमी लांबी) 

४. नेपाळ - उत्तर प्रदेश (६५१ किमी लांबी) 

५. म्यानमार - अरुणाचल प्रदेश (५२० किमी लांबी) 

६. भूतान - आसाम (२६७ किमी लांबी)

७. अफगाणिस्तान - जम्मू-काश्मीर (१०६ किमी लांबी) 

उत्तर प्रदेश या राज्याची सीमा भारतातील अन्य सर्वाधिक राज्यांशी लागून आहे :

१) उत्तराखंड, २) हिमाचल प्रदेश, ३) हरियाणा, ४) राजस्थान, ५) मध्य प्रदेश, ६) छत्तीसगढ, ७) झारखंड, ८) बिहार, ९) दिल्ली (कें.प्र.) या राज्यांना उत्तर प्रदेशची सीमा संलग्न.

भारताच्या मुख्य भूमीस लाभलेला समुद्रकिनारा : ६,१०० कि.मी.

मुख्यभूमी, अंदमान-निकोबार व लक्षद्वीप बेटे मिळून लाभलेला किनारा : ७५१७ कि.मी. (७५१६.६कि.मी.)

भारताची सागरी सीमा ६ देशांच्या सागरी सीमांना संलग्न आहे :

१) पाकिस्तान २) बांगलादेश ३) म्यानमार ४) इंडोनेशिया ५) श्रीलंका ६) मालदीव

तीन देशांना भारताची भूसीमा व सागरी सीमा संलग्न आहे : 

१) पाकिस्तान २) बांग्ला देश ३) म्यानमार

कर्कवृत्त भारताच्या मध्यातून ८ राज्यांतून गेले आहे. या राज्यांचा पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम पुढीलप्रमाणे :

१) गुजरात २) राजस्थान ३) मध्य प्रदेश ४) छत्तीसगढ ५) झारखंड ६) प. बंगाल ७) त्रिपुरा ८) मिझोराम

 भारत : क्षेत्रफळानुसार राज्यांचा क्रम

प्रथम राज्य - राजस्थान

क्षेत्रफळ (चौ.किमी) - ३,४२,२४०

भारताशी प्रमाण - १०.४१%

कोणत्या देशाच्या क्षेत्रफळा इतके ? - रिपब्लिक ऑफ काँगो

द्वितीय राज्य - मध्य प्रदेश

क्षेत्रफळ (चौ.किमी) - ३,०८,२५२

भारताशी प्रमाण - ९.३७%

कोणत्या देशाच्या क्षेत्रफळा इतके ? - ओमान

तृतीय राज्य - महाराष्ट्र

क्षेत्रफळ (चौ.किमी) - ३,०७,७१३

भारताशी प्रमाण - ९.३६%

कोणत्या देशाच्या क्षेत्रफळा इतके ? - इटली

चौथा राज्य - उत्तर प्रदेश

क्षेत्रफळ (चौ.किमी) - २,४०,९२८

भारताशी प्रमाण - ७.३२%

कोणत्या देशाच्या क्षेत्रफळा इतके ? - युनायटेड किंगडम (UK)

पाचवा राज्य - जम्मू-काश्मीर

क्षेत्रफळ (चौ.किमी) - २,२२,२३६

भारताशी प्रमाण - ६.७६%

कोणत्या देशाच्या क्षेत्रफळा इतके ? - रूमानिया

सहावा राज्य - गुजरात

क्षेत्रफळ (चौ.किमी) - १,९६,०२१

भारताशी प्रमाण - ५.९६%

कोणत्या देशाच्या क्षेत्रफळा इतके ? - सेनेगल

सातवा राज्य - कर्नाटक

क्षेत्रफळ (चौ.किमी) - १,९१,७९१

भारताशी प्रमाण - ५.८३%

कोणत्या देशाच्या क्षेत्रफळा इतके ? - किरगिझस्तान

भारतातील सर्वात कमी क्षेत्रफळाची राज्ये (चढत्या क्रमाने) : 

१) गोवा : ३७०२ चौकिमी (सर्वात कमी) 

२) सिक्किम : ७०९६ चौकिमी

३) त्रिपुरा : १०४९१ चौकिमी

४) नागालँड : १६५७९ चौकिमी

भारतातील नऊ (९) केंद्रशासित प्रदेश व त्यांचे क्षेत्रफळ (चढत्या क्रमाने) : 

१) लक्षद्वीप : ३२ चौकिमी, 

२) दीव-दमण : १०४ चौकिमी, 

३) चंदिगढ : ११४ चौकिमी, 

४) दादरा व नगरहवेली : ४८७ चौकिमी, 

५) पदच्चेरी : ४९२ चौकिमी, 

६) दिल्ली : १,४८४ चौकिमी, 

७) अंदमान-निकोबार बेटे : ८,०७३ चौकिमी

८) जम्मू काश्मीर : ४२,२४१ चौकिमी

९) लडाख : २७४, २८९ चौकिमी

Chicken's Neck : ईशान्येकडील सात राज्ये भारतीय मुख्य भूमीस ज्या चिंचोळ्या भूपट्ट्याने जोडलेली | आहेत, त्यास Chicken's Neck किंवा सिलिगुडी कॉरिडोर' असे म्हणतात.

हिंदी महासागरातील भारताचे शेजारी देश : श्रीलंका, मालदीव, सेशेल्स, मॉरिशस

Post a Comment

0 Comments