About Us

MPSC MITRA (www.mpscmitra.in)

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, Mpsc Mitra म्हणजे www.mpscmitra.in या website वर आपलं स्वागत आहे. 

गेल्या काही वर्षात परीक्षांच्या जाहिराती सातत्याने प्रकाशित होत आहेत, हे सुचिन्ह आहे. मात्र त्याचवेळी या परीक्षांमार्फत भरल्या जाणाऱ्या विविध वर्ग-१, वर्ग-२ व वर्ग-३ च्या पदांची जाहिरातीगणिक कमी होत जाणारी संख्या आणि हाताच्या बोटांवर मोजता येणाऱ्या पदसंख्येसाठी लाखोंच्या संख्येने परीक्षांना सामोरे जाणारे विद्यार्थीमित्र ही विषमता निश्चितच चिंताजनक आहे. तरीदेखील आपण नाउमेद न होता सकारात्मकरित्या या परीक्षांना सामोरे जायलाच हवे.

मित्र हो, स्पर्धा परीक्षांमध्ये 'तो/ती आला/ली, त्याने/तिने पाहिले आणि त्याने/तिने जिंकून घेतलं सारं' या उक्तीची प्रचिती क्वचितच येते. दोन-चारदा अपयशाचा सामना करावा लागल्यास एका विशिष्ट टप्प्यावर आपल्या क्षमतांविषयी संभ्रम निर्माण होतो. अशावेळी यशस्वी होण्यासाठी प्रचंड आत्मविश्वास, नियोजनबद्ध अभ्यास, सातत्य, चिकाटी या बाबी महत्त्वाच्या ठरतात.

ताणतणावाखाली सतत आठवडाभर अभ्यासाला वाहून न घेता वेळेचे योग्य नियोजन करून अभ्यास करायला हवा. परीक्षेची तयारी करताना व्यक्तिमत्त्व सुधारण्यावर भर द्या. आठवड्यातील एक दिवस अभ्यासाला सुटी देऊन छंद जोपासा, एखादा चांगला चित्रपट पहा, फिरायला जा. नियमितपणे एखादे प्रेरणादायी चरित्र अभ्यासा. त्यामुळे ताण हलका होऊन अभ्यासास गती मिळते.

सध्या केंद्र व राज्य लोकसेवा आयोगांच्या परीक्षा अधिक आव्हानात्मक बनल्या आहेत. नव्या परीक्षा पद्धतीत केवळ पाठांतरास प्राधान्य न देता संकल्पना व आकलन या बाबींवर भर दिलेला आढळतो. सध्या बाजारात दाखल झालेल्या स्पर्धा परीक्षांच्या ढिगभर पुस्तकांमुळे आपल्या गोंधळातच अधिक भर पडते. अशा वेळी यशस्वी विद्यार्थी मित्रांच्या सल्ल्यानुसार योग्य पुस्तकांची निवड करा. रोजची राष्ट्रीय दर्जाची दोन-तीन वृत्तपत्रे, शासनाची प्रकाशने, संकेतस्थळे यांचे सहाय्य घेऊन परीक्षाभिमुख अभ्यास करा.

विद्यार्थी मित्रांनो मी तयार केलेल्या ह्या website मध्ये योग्य ते विषयावर परीक्षाभिमुख व दर्जेदार माहितीनुसार articles लिहिले आहेत. मित्रांनो प्रत्येक article वृत्तपत्रे, शासनाची प्रकाशने, संकेतस्थळे, महाराष्ट्राचा व केंद्राचा आर्थिक पाहणी अहवाल यांचा संदर्भ घेऊनच लिहिला गेला आहे. मित्रांनो या website वर तुम्हाला प्रत्येक विषयवार योग्य ती माहिती एकदम सोप्यारितीने उपलब्ध होईल. परीक्षेत येणारे प्रत्येक विषय मी cover करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही जर आपल्या website वर रेग्युलर अभ्यास केला तर तुम्हाला त्याचा नक्की लाभ होईल. आपल्या website वरील Wikipedia Search चे देखील option उपलब्ध आहे जे तुमची राहिलेली माहिती तुम्हाला जागेवर पुरवतील. तुम्हाला कुठल्याहि article बद्दल काही शंका किंवा प्रस्ताव मांडायचा असेल तर तुम्ही मला comment करून नक्की कळवा. 

तुम्ही आपल्या website ला subscribe देखील करू शकता जेणे करून इथे पब्लिश झालेले articles तुमच्या पर्यंत न चुकता पोहोचतील. 

तुम्ही आपल्या Instagram Page ला देखील follow करू शकता तिथे तुम्हाला योग्य ती माहिती व Updates मिळत असतात. 

तुम्ही आपल्या Telegram Channel ला देखील join करू शकता तिथे तुम्हाला रोज नवीन नवीन प्रश्न आणि महत्वाचे updates तसेच Study Material हे Pdf च्या स्वरूपात मिळतील. 


तेव्हा आळस न करता भरपूर अभ्यास करा आणि लवकर यशस्वी व्हा. माझ्या कडून सर्व विद्यार्थी मित्रांना मनापासून खूप खूप शुभेच्छा !


Post a Comment

0 Comments