डॉ बाबासाहेब आंबेडकर माहिती | शिक्षण | उच्च शिक्षण | शैक्षणिक सुधारणा | संस्था | ग्रंथसंपदा

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१८९१-१९५६) 

डॉ बाबासाहेब आंबेडकर
डॉ बाबासाहेब आंबेडकर


  • इतिहासकार धनंजय कीर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल म्हणतात, 'या युगातील पहिल्या श्रेणीतील अलौकिक पुरुषांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्थान आहे. जगात आजवर जे पददलितांचे रक्षणकर्ते व कैवारी होऊन गेले त्या सर्वांत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्थान उच्च आहे.'
  • जन्म : १४ एप्रिल, १८९१, मध्य प्रदेशातील इंदूरजवळील महू येथे. 
  • मूळ गाव : आंबडवे (जि. रत्नागिरी) 
  • मूळ नाव : भीमराव रामजी सकपाळ ऊर्फ आंबावडेकर. 
  • आईचे नाव : भीमाबाई 
  • डॉ. बाबासाहेब हे त्यांच्या आई-वडिलांचे १४ वे व शेवटचे अपत्य होते. 
  • शिक्षण : प्राथमिक शिक्षणासाठी काही काळ दापोली व त्यानंतर साताऱ्यातील अॅग्रीकल्चर स्कूल (एलिमेंटरी स्कूल/प्रतापसिंह स्कूल) मध्ये प्रवेश. या शाळेतील कृष्णाजी केशव आंबेडकर या प्रेमळ गुरुंनी बाबासाहेबांना आपले 'आंबेडकर' हे आडनाव स्वीकारण्यास सांगितले.
  • १९०५ : रमाबाई यांच्याशी विवाह. 
  • १९०७ : मुंबईच्या एल्फिन्सटन हायस्कूलमधून मॅट्रिक परिक्षा उत्तीर्ण. या शाळेतील केळूसकर या शिक्षकांच्या प्रयत्नाने बाबासाहेबांना बडोदाधिपती सयाजीराव गायकवाड यांची दरमहा रु. २५ ची शिष्यवृत्ती मिळाली व एल्फिन्सटन कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला.
  • उच्च शिक्षण : महाराज सयाजीराव गायकवाड यांनी दिलेल्या दरमहा रु. २५ च्या शिष्यवृत्तीच्या आधारे जुलै १९१३ ते जुलै १९१६ या काळात बाबासाहेबांनी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात प्रवेश घेतला. 
  • M.A. पदवी, १९१५ : Administration & Finance of East India Company हा प्रबंध कोलंबिया विद्यापीठात सादर केला व एम. ए. ची पदवी संपादन केली.
  • Ph.D. पदवी, १९१७ : १९१७ साली वरील प्रबंध 'ब्रिटिश भारतातील प्रांतिक अर्थव्यवस्थेची उत्क्रांती (Evolution of Provincial Finance in British India) या नावाने प्रसिद्ध झाल्यावर त्यांना कोलंबिया विद्यापीठाची Ph.D. ही पदवी मिळाली.
  • १९२३ : लंडन विद्यापीठाची D.Sc. ही पदवी.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक सुधारणा : 

  • १९४६ : मुंबई येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना. या संस्थेमार्फत मुंबई येथे सिद्धार्थ कॉलेज (१९४६) तर औरंगाबाद येथे मिलिंद कॉलेजची (१९५०) स्थापना केली. (२०१० मध्ये मिलिंद महाविद्यालयाचा हीरकमहोत्सव संपन्न झाला.)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकीय पक्ष : 

  • स्वतंत्र मजूर पक्ष (Independent Labour Party) : १५ ऑगस्ट १९३६ रोजी या पक्षाची स्थापना. या पक्षाने १९३७ च्या प्रांतिक निवडणुका लढवून १३ जागा जिंकल्या.
  • अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट फेडरेशन : १८ जुलै १९४२ रोजी या पक्षाची स्थापना. (मुख्यालय : नागपूर)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या संस्था : 

  • बहिष्कृत हितकारिणी सभा : २० जुलै १९२४ रोजी मुंबई येथे या सभेची स्थापना. बहिकृष्त हितकारिणी सभेचे ब्रीदवाक्य : 'शिका, चेतवा व संघटीत व्हा'.
  • समाज समता संघ : १९२७ साली या संघाची स्थापना. 
  • १९२८ : या संघातर्फे समता, जनता व प्रबुद्ध भारत ही पत्रे सुरू केली.
  • १९५५ : बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) ची स्थापना.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रंथसंपदा : 

  • व्हू वेअर द शुद्राज ? (शुद्र कोण होते?)
  • Federation Versus Freedom (1939)
  • अनटचेबल्स अॅण्ड इंडियन कन्स्टिट्युशन
  • अॅनिहिलेशन ऑफ कास्टस् (जातीव्यवस्थेचे निर्मूलन) 
  • The Children of India's Ghetto (द अनटचेबल्स)
  • थॉटस् ऑन पाकिस्तान 
  • द प्रॉब्लेम ऑफ रूपी 
  • बुद्ध अँड हिज धम्म (१९५६) 
  • स्टेट अॅण्ड मायनॉरिटिज् 
  • द अनटचेबल्स

  • निधन : ६ डिसेंबर १९५६ दिल्ली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण. 
  • भारतरत्न : १९९० साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.   

Post a Comment

0 Comments