महाराष्ट्र पोलीस भरती 2022 प्रक्रिया संपूर्ण माहिती एकदा बघाच

 

maharashtra-police-mumbai-police

 

 

दिलेल्या ब्लॉग मध्ये तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे मिळतील :

पोलीस भरती प्रक्रिया ?
पोलीस भरती शैक्षणिक पात्रता ?
पोलीस भरती पुरुषांसाठी शारीरिक पात्रता ?
पोलीस भरती महिलांसाठी शारीरिक पात्रता ?
पोलीस भरती वयोमर्यादा ?
पोलीस भरती शारीरिक पात्रतेतील सूट ?
होमगार्ड भरती प्रक्रिया ?
Maharashtra police bharti 2022

पोलीस भरती प्रक्रिया 


शैक्षणिक पात्रता 

  • उमेदवार किमान उच्च माध्यमिक परीक्षा ( १२वी ) उत्तीर्ण उमेदवार माजी सैनिक असल्यास शासकीय निर्णयानुसार शैक्षणिक पात्रतेची अट शिथिलक्षम.  
  • नक्षलग्रस्त भागातील उमेदवार - किमान ७ वी परीक्षा उत्तीर्ण असावा. 
  • पोलीस बँड पथकासाठी उमेदवार - १० परीक्षा उत्तीर्ण असावा. 

खेळाडू उमेदवारासाठी आवश्यक अटी 

  • जिल्हा, राज्य व राष्ट्रीय रस्तावर खेळलेल्या खेळाडूंच्या प्रमाणपत्रे आवश्यक. 
  • क्रिकेट खेळासाठी-खेळाडू रणजी करंडक स्पर्धा खेळलेला असावा. 
  • विशेष नैपुण्य प्राप्त केलेले महिला व पुरुष खेळाडू हे विद्यापीठ स्तरावरून खेळलेले असावेत. 

होमगार्ड 

  • उमेदवार हा होमगार्ड पदावर असेल तर त्या पदावर त्याने किमान ३ वर्षे सेवा केलेली असावी. 

वयोमर्यादा 

  • सर्वसाधारण उमेदवार - १८ ते २८ वर्षे 
  • मागासवर्गीय उमेदवार - १८ ते ३३ वर्षे 
  • माजी सैनिक उमेदवार - सैन्य दलातील सेवा + ३ वर्षे 

शारीरिक पात्रता 

पुरुषांसाठी  

  • उंची - १६५ सें.मी
  • छाती - न फुगवता ७९ सें.मी
  • फुगवून ८४ सें.मी

महिलांसाठी 

  • उंची - १५५ सें.मी
  • वजन - ४८ सें.मी

शारीरिक पात्रतेतील सूट 

अ) नक्षलग्रस्त भागातील आदिवासी व तत्सम उमेदवार असल्यास उंची २.५ सें.मी महिला व पुरुष उमेदवारांसाठी सवलत छातीच्या मोजमापाची आवश्यकता नाही.  
ब) पोलीस बँड पथकातील उमेदवारासाठी -
उंची - २.५ सें.मी
छाती - २ सें.मी न फुगवता व १.५ सें.मी फुगवून
क) खेळाडू प्रवर्गासाठी -
उंची - २.५ सें.मी सूट
ड) अनुकंपा तत्त्वावरील भरती उमेदवारासाठी -
उंची - २.५ सें.मी महिला व पुरुष उमेदवारासाठी सवलत.
छाती - २ सें.मी न फुगविता व १.५ सें.मी फुगवून

भरती प्रक्रिया 

१) शारीरिक पात्रता :-
प्रथम प्रमाणपत्रे पळताळणी - नंतर उमेदवारांची उंची, छाती आणि वजन मोजण्यात येते.
२) मैदानी चाचणी / शारीरिक चाचणी :
शारीरिक परीक्षा हि पुरुषांसाठी व महिलांसाठी १०० गुणांची असते. 
या परीक्षेत ५०% किमान गुण उत्तीर्ण होण्यासाठी मिळविणे आवश्यक असते.

यामध्ये पात्र ठरल्यास -

  • जाहीर झालेल्या एकूण रिक्त जागांच्या १५ पट उमेदवारांना लेखी परीक्षेस पात्र ठरविले जाते. 
  • तसेच SC/ST संवर्गातील किमान पात्रता मानकाइतके गुण मिळविलेल्या सर्वाना लेखीसाठी पात्र ठरविले जाते. 

REGULAR UPDATES मिळवण्या करिता पेज वर FOLLOW BY  EMAIL येथे आपली Email ID  टाकून ह्या Website ला Subscribe करा.
धन्यवाद मित्रांनो .

Post a Comment

0 Comments