माझ्या देशावर माझे प्रेम आहे ?
मित्रांनो आपल्याला कदी हा प्रस्न पडला का ? जरा विचार करा आपले आई वडील आपल्या ला प्रेम करता का ?
उत्तर असणार हो खूप प्रेम करतात.
प्रेम करणे म्हणजे नेमके काय ?
आई वडील आपल पालनपोषण करता, आपल्याला वाढवता.
मग नेमकं देशावर प्रेम करणे म्हणजे काय ?
आपले देश म्हणजे भारत देश भारतातले सर्वे नागरिक. देशावर प्रेम करणे म्हणजे देशाचे पालनपोषण करणे, त्याचे गौरव वाढवणे. देशावर प्रेम करणे एक वेळा सोपे, पण देशबांधवांवर प्रेम करणे म्हणजे अवघड, बरोबर ना ? भारतावर प्रेम म्हणजे भारतभूमीवर प्रेम आणि भूमिपुत्रांवरही प्रेम. काही लोक नुसते भूमीवर प्रेम करतात तर काही लोक नुसते भूमिपुत्रांवर प्रेम करतात. देशावर प्रेम करणे म्हणजे भूमी आणि भूमिपुत्र, दोघांवर प्रेम करणे, बरोबर ना ?
भगतसिंह, राजगुरू कुर्बान हुसेन फासावर गेले. ते देशावर खरेखुरे प्रेम करत होते, पण आता त्यांचासारखे प्रेम करायचे तर देश पुन्हा गुलाम व्हायला हवा ? प्रेम करायचे म्हणजे दुसऱ्याचे दुःख पाहून ओल्या डोळ्यांनी त्याच्या मदतीसाठी धावून जायचे आणि दुसऱ्याला आनंद झाला, कि आपणही आनंदित व्ह्याचे. प्रेम करायचे तर अश्रू आणि हास्य यांची भाषा आपल्याला आली पाहिजे.
देशाच्या नवनिर्माणासाठी रचनात्मक काम करणे म्हणजे देशावर प्रेम करणे. हातात झाडू घेऊन गावाची शास्त्रीय पद्धतीने साफसफाई करणे म्हणजे देखील देशावर प्रेम करणेच होय.
'वंदे मातरम' गीतात जो आदर्श सांगितला आहे तो वास्तव्यात यावा, यासाठी धडपडण्याची प्रेरणा आपल्याला मिळाली पाहिजे. आपण जात, धर्म, वंश, भाषा यांना निमित्त करून आपसांत भांडत राहिलो तर ते भारतमातेला रुचेल काय ? देशावर आपले प्रेम असेल, तर सर्व समाजघटकांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि आपलेपणाची हमी आपल्याला देता आली पाहिजे.
'वंदे मातरम' गीतात जे चित्र आहे ते वास्तवात यावे, म्हणून धडपड करत रहाणे आणि सर्व भूमिपुत्रांना न्याय, स्वातंत्र्य, संत आणि आपलेपणा यांचे आश्वासन देणे, म्हणजेच देशावर प्रेम करणे.
जय हिंद जय महाराष्ट्र.
0 Comments