सह्याद्री किंवा पश्चिम घाट
सह्याद्री घाट |
सह्याद्री हा प्रमुख जलविभाजक असून त्याच्यामुळे अरबी समुद्रास मिळणाऱ्या पश्चिमवाहिनी नद्या व बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या पूर्ववाहिनी नद्या असे नद्यांचे विभाजन झाले आहे.
निर्मिती : सह्याद्रीची निर्मिती प्रस्तरभंगामुळे झाली आहे.
महाराष्ट्राच्या क्षेत्रफळात पश्चिम घाटाचा वाटा : १२.२%
सरासरी उंची : ९१५ ते १२२० मीटर
भारतातील लांबी : १६०० किमी
महाराष्ट्रातील लांबी : ७५० किमी
सह्याद्रीतील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर : कळसूबाई (उंची १६४६ मी.) हे नाशिक व नगर जिल्ह्यांदरम्यान आहे.
सह्याद्रीच्या मुख्य दक्षिण-उत्तर रांगेपासून पूर्वेकडे अनेक डोंगररांगा फुटलेल्या आहेत.
सह्याद्रीच्या तीन प्रमुख डोंगररांगा व त्या दरम्यानच्या नद्या :
१) सातमाळा अजिंठा डोंगररांगा : सातमाळा रांगा नाशिक जिल्ह्यात, तर अजिंठा रांगा औरंगाबाद जिल्ह्यात आढळतात. या रांगांमुळे उत्तरेकडे तापी व दक्षिणेकडे गोदावरी या नद्यांचे विभाजन झाले आहे.
२) हरिश्चंद्र - बालाघाट रांगा : या रांगांमुळे गोदावरी व भीमा खोरी वेगळी झाली आहेत. हरिश्चंद्र रांगा प्रामुख्याने अहमदनगर जिल्ह्यात पसरल्या आहेत. बालाघाट डोंगररांगा अहमदनगर, परभणी, बीड व नांदेड या जिल्ह्यात विस्तारल्या आहेत.
३) महादेव डोंगररांगा : या रांगांचा विस्तार प्रामुख्याने सातारा व सांगली जिल्ह्यात आढळतो. या रांगांमुळे भीमा व कृष्णा या नद्यांची खोरी अलग झाली आहेत. त्र्यंबकेश्वर डोंगर, माथेरान डोंगर, महाबळेश्वर पठार ही सह्याद्रीची भूवैशिष्ट्ये आहेत. घाट : थळ, भोर, कुंभार्ली, आंबा, फोंडा, आंबोली इत्यादी घाट सह्याद्रीत आढळतात.
सह्याद्रीतील घाट मार्गाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे कम : १) थळघाट (उत्तरेकडे), २) माळशेज घाट, ३) बोर (खंडाळा) घाट, ४) वरंधा घाट, ५) खंबाटकी घाट, ६) परसणी घाट, ७) आंबेनळी घाट, ८) कुंभार्ली घाट, ९) आंबा घाट, १०) फोंडा घाट, ११) हनुमंते घाट (कोल्हापूर-कुडाळ), १२) आंबोली घाट, १३) राम घाट
४) सातपुडा रांगा : राज्याच्या उत्तरेकडे नंदूरबार जिल्ह्याच्या सीमेस सातपुडा रांगांचा स्पर्श झाला आहे. पूर्व-पश्चिम विस्तार असलेल्या सातपुड्याचा फारच थोडा भाग राज्यात समाविष्ट होतो. नर्मदा व तापी नद्यांची खोरी सातपुडा रांगांमुळे एकमेकांपासून अलग झाली आहेत. सातपुड्याचा विस्तार : नंदूरबार जिल्ह्यात सातपुडा डोंगरास 'तोरणमाळ पठार' म्हणून ओळखले जाते. अमरावती जिल्ह्यात सातपुडा रांगांना 'गाविलगड टेकड्या' असे म्हटले जाते. सातपुडा पर्वताच्या मध्यभागी रावेर-ब-हाणपूर दरम्यान ब-हाणपूर खिंड आहे.
महाराष्ट्रातील सह्याद्रीतील उंच शिखरे :
१. कळसुबाई - १६४६ मी., अहमदनगर
२. साल्हेर - १५६७ मी., नाशिक
३. महाबळेश्वर - १४३८ मी., सातारा
४. हरिश्चंद्रगड - १४२४ मी., अहमदनगर
५. सप्तश्रृंगी - १४१६ मी., नाशिक
६. तोरणा - १४०४ मी., पुणे
७. मुल्हेर - १३०६ मी., नाशिक
८. ब्रह्मगिरी - १३०४ मी., नाशिक
९. तोला - १२३१ मी., नाशिक
१०. हनुमान - १०६३ मी., धुळे (गाळणा)
महाराष्ट्रातील सातपुडातील उंच शिखरे :
१) अस्तंभा, जि. नंदूरबार (१३२५ मी.)
महाराष्ट्रातील स्थानिक डोंगररांगा :
- धुळे - गाळणा डोंगर
- नांदेड - मुदखेड डोंगर
- भंडारा-गोंदिया - दरेकसा टेकड्या
- गडचिरोली - चिरोली टेकड्या, भामरागड व सुरजागड डोंगर
- परभणी-नांदेड - निर्मल रांगा
- नागपूर - गरमसूर डोंगर
0 Comments