महाराष्ट्र : प्राकृतिक विभाग
महाराष्ट्राचे तीन प्रमुख प्राकृतिक विभाग पडतात.
अ) कोकण किनारपट्टी
ब) सह्याद्री किंवा पश्चिम घाट; सातपुडा रांगा
क) महाराष्ट्र पठार (दख्खन पठार)
कोकण किनारपट्टी
कोकण किनारपट्टी |
कोकण किनारपट्टीचा महाराष्ट्रातील विस्तार : उत्तरेकडे उल्हास नदी खोऱ्यापासून दक्षिणेकडील रेडी-बांद्यापर्यंत.
कोकण किनारपट्टीचा भारतातील विस्तार : उत्तरेस मयूरा नदी ते दक्षिणेस कर्नाटकातील गंगावली नदीच्या खोऱ्यादरम्यान.
कोकण किनारपट्टीची वैशिष्ट्ये : कोकण किनारपट्टी दक्षिणेकडे अरूंद झालेली आढळते. तर; उत्तरेकडे उल्हास नदी खोऱ्यात तिची रूंदी सर्वाधिक आढळते. कोकण किनारपट्टी 'रिया' प्रकारची आहे. कोकणच्या उत्तरेकडील भूभाग बेसाल्टपासून बनला आहे. कोकण ही 'परशुरामाची भूमी' आहे. कोकणच्या दक्षिण भागात अतिपावसामुळे 'जांभा' या प्रकारचा खडक आढळतो.
दक्षिणोत्तर लांबी : सुमारे ७२० कि.मी.
कोकणास 'अपरांत' या नावे ओळखले जाते. कोकण किनारपट्टीच्या अरुंदपणामुळे येथील नद्यांची लांबी कमी असून त्यांचे खणनकार्य तीव्र असते. कोकणातील प्रमुख नद्या : उल्हास, वैतरणा, सावित्री, वाशिष्ठी, शास्त्री, तेरेखोल इत्यादी. कोकणातील सर्व नद्या सह्यपर्वतावरून वाहत येऊन अरबी समुद्रास मिळतात.
कोकणातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम
उत्तर कोकण : दमणगंगा, वरोळी, सूर्या, वैतरणा, तानसा, भातसई (भातसा), काळू, उल्हास
मध्य कोकण : पाताळगंगा, अंबा, कुंडलिका, काळ, गंधार, भोगावती, घोड, सावित्री, भारजा, जोग, जगबुडी (वाशिष्ठीची उपनदी), वाशिष्ठी, शास्त्री, बाव (शास्त्रीची उपनदी)
दक्षिण कोकण : काजळी, मुचकुंदी, काजवी, शुक, वाघोटन, देवगड, आचरा, गड, कर्ली, तेरेखोल
कोकणातील खाड्या
भरतीच्या वेळी नदी मुखातून समुद्राचे पाणी जेथपर्यंत नदीत शिरते; त्या नदीच्या भागास खाडी असे म्हणतात.
कोकणातील खाड्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम : (कंसात नदीचे नाव दिले आहे) : डहाणू, दातिवरे | (वैतरणा/तानसा), वसई (उल्हास), ठाणे (भातसई), मनोरी, मालाड, माहीम, पनवेल, धरमतर (अंबा/ पाताळगंगा), रोहा (कुंडलिका), राजापुरी (काल), बाणकोट (सावित्री), कोळशी, दाभोळ (वशिष्ठी), जयगड (शास्त्री), भाट्ये (काजळी), पूर्णगड (मुचकुंदी), जैतापूर, विजयदूर्ग (शूक), देवगड (देवगड), आचरा (आचरा), कालावली (गड), कर्ली (कर्ली), तेरेखोल (तेरेखोल).
धरमतर खाडीत अंबा नदी, कारजा खाडी व पाताळगंगा नदी यांचा संगम आहे.
मिहिर सेन यांनी सर्वप्रथम धरमतर खाडी पोहून पार केली.
कोकणातील पुळणींचा (Beach) उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम : उड्डाण (ठाणे, उत्तरेकडे), जुहू, दादर, गिरगाव, अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, गणपतिपुळे, हर्णे, गुहागर, तारकर्ली, मोचेमाड, उभा दांडा, शिरोडा, दाभोळी (दक्षिणेकडे)
कोकणातील बेटांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम : मुंबई (उत्तरेकडे), अंजदिव, साष्टि, मढ, घारापुरी, खांदेरी, उंदेरी, कासा, कुलाबा, जंजिरा, कुरटे (दक्षिणेकडे)
0 Comments