महाराष्ट्राचा भूगोल । महाराष्ट्र राज्य मराठी माहिती
महाराष्ट्राचा भूगोल |
महाराष्ट्राची निर्मिती : १ मे १९६० (१ मे हा 'महाराष्ट्र दिन' म्हणून साजरा केला जातो.)
महाराष्ट्राचे स्थान : भारताच्या पश्चिम भागात अरबी समुद्रास लागून.
महाराष्ट्राचे क्षेत्रफळ : ३,०७,७१३ चौ.कि.मी. (भारताशी प्रमाण : ९.३६%)
अक्षवृत्तीय विस्तार : १५° ८' उत्तर ते २२° १' उत्तर अक्षांश (१५°३५'४०" ते २२°२'१३” उत्तर अक्षांश)
रेखावृत्तीय विस्तार : ७२° ६' पूर्व ते ८०° ९' पूर्व रेखांश (७२°३८'४५” ते ८०°५३'१७” पूर्व रेखांश)
महाराष्ट्राच्या पूर्वेस व ईशान्येस : छत्तीसगढ राज्य
आग्नेयेस : तेलंगणा राज्य
दक्षिणेस : कर्नाटक
उत्तरेस : मध्य प्रदेश
वायव्येस : गुजरात राज्य, दमण, दादरा व नगरहवेली हे केंद्रशासित प्रदेश
महाराष्ट्राची दक्षिणोत्तर लांबी : ७३० कि.मी.
पूर्व-पश्चिम विस्तार : ८६० कि.मी. (संदर्भ : इ. ९ वी, भूगोल)
समुद्रकिनाऱ्याची लांबी : ७२० कि.मी.
लोकसंख्या : (२००१) : ९,६८,७८,६२७ (२०११) चा अंतिम निष्कर्ष : ११,२३,७४,३३३
भारताच्या लोकसंख्येशी प्रमाण : ९.४२% (२००१), ९.२८% (२०११)
राजधानी : मुंबई
उपराजधानी : नागपूर
विधानसभा मतदारसंघ : २८८
विधानपरिषद मतदारसंघ : ७८
राज्यातील लोकसभा मतदारसंघ : ४८
राज्यातील राज्यसभा मतदारसंघ : १९
राज्यातील जिल्हे : ३६ (पालघर हा ३६ वा जिल्हा. क्षेत्रफळाने अहमदनगर सर्वात मोठा, तर मुंबई शहर सर्वात लहान जिल्हा
जिल्हा परिषदा : ३४ (पालघर ३४ वी जिल्हा परिषद. मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांना जिल्हा परिषदा नाहीत)
तालुके : ३५८ (३५५ + ३)
ग्रामपंचायती : २८,३३२
पंचायत समित्या : ३५१ (टीप : मुंबई उपनगर जिल्ह्यातील अंधेरी, कुर्ला, बोरिवली हे तीन तालुके प्रशासकीय सोयीसाठी बनविण्यात आले आहेत.)
महानगरपालिका : २७
नगरपरिषदा : २३६
नगरपंचायती : १२४
कटक मंडळे : ०७ (संदर्भ: महाराष्ट्राची आर्थिक पाहणी, २०१६-१७)
राज्यातील दशलक्षी शहरे : ०७
एक लाखाहून अधिक लोकसंख्येची शहरे : ४०
सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा : सिंधुदुर्ग
प्रशासकीय विभाग : ६ (कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर, औरंगाबाद)
महाराष्ट्रातील ६ प्रशासकीय विभाग व त्यामधील ३६ जिल्हे.
कोकण : पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
पुणे : पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर
नाशिक : नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव
नागपूर : नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर
अमरावती : अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ
औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड
प्रादेशिक विभाग व त्यात समाविष्ट प्रशासकीय विभाग व जिल्हे.
पश्चिम महाराष्ट्र : (पुणे विभागातील : पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर) (नाशिक विभागातील : नाशिक व अहमदनगर हे २ जिल्हे)
मराठवाडा (गोदावरी खोरे) : (औरंगाबाद विभागातील ८ जिल्ह्यांचा समावेश)
विदर्भ (वऱ्हाड) : (अमरावती विभागातील सर्व ५ जिल्हे) (नागपूर विभागातील सर्व ६ जिल्हे)
खानदेश (तापी खोरे) : (नाशिक विभागातील : धुळे, नंदूरबार, जळगाव जिल्हे)
कोकण विभाग : (मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग)
राज्यातील प्रशासकीय विभागांचा क्षेत्रफळानुसार उतरता क्रम : १) औरंगाबाद (सर्वाधिक), २) नाशिक, ३) पुणे, ४) नागपूर, ५) अमरावती, ६) कोकण (सर्वात कमी)
राज्यातील प्रशासकीय विभागांतील तालुक्यांची संख्या : १) औरंगाबाद (७६), २) नागपूर (६४), ३) पुणे (५८), ४) अमरावती (५६), ५) नाशिक (५४), ६) कोकण (५०)
महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे विभाजन : १९८० पर्यंत राज्यात २६ जिल्हे अस्तित्वात होते.
१९८१ नंतर काही जिल्ह्यांचे विभाजन झाले असून आजअखेर राज्यात जिल्ह्यांची संख्या ३६ इतकी झाली आहे.
सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील अतिदक्षिणेकडील जिल्हा.
गडचिरोली हा अतिपूर्वेकडील जिल्हा.
नंदूरबार हा राज्यातील अतिउत्तरेकडील व शंभर टक्के आदिवासी लोकसंख्येचा जिल्हा.
कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी व सिंधदर्ग या ७ जिल्लांना मिळून ७२० किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.
किनाऱ्यांची लांबी (किमी) : रत्नागिरी : २३७; रायगड : १२२; सिंधुदुर्ग : १२०; ठाणे-पालघर : १२७
(१६ डिसेंबर २०१५ च्या दै. लोकसत्तामध्ये रायगड जिल्ह्याच्या किनाऱ्याची लांबी २४० किमी दिली आहे.)
राज्यातील जिल्ह्यांचा क्षेत्रफळानुसार उतरता क्रम : १) अहमदनगर (सर्वाधिक), २) पुणे, ३) नाशिक, ४) सोलापूर, ५) गडचिरोली
राज्यातील जिल्ह्यांचा क्षेत्रफळानुसार चढता क्रम : १) मुंबई शहर (सर्वात कमी), २) मुंबई उपनगर, ३) भंडारा, ४) ठाणे, ५) हिंगोली
0 Comments