१८५७ चा उठाव | कोळी समाजाचे उठाव | भिल्ल समाजाचे उठाव संपूर्ण माहिती

 कोळी समाजाचे उठाव 

१८५७ चा उठाव
१८५७ चा उठाव

दिलेल्या ब्लॉग मध्ये तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे मिळतील :


1857 चा उठाव माहिती ?
1857 चा उठावाचे नेतृत्व कोणी केले ?
1857 च्या उठावाची केंद्रे आणि नेते ?
1857 च्या उठावाची सुरुवात कोठे झाली ?
1857 चा उठाव का झाला ?
1857 च्या उठावानंतर पुढीलपैकी कोण भारताचा पहिला व्हाइसरॉय बनला ?
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857 च्या उठावाला काय नाव दिले ?

  • महाराष्ट्रात कोळी समाजात साधे कोळी, डोंगरी कोळी असे भेद आणि सोनकोळी, महादेव कोळी हे पोटभेद आहेत. 
  • रामोशींप्रमाणेच महाराष्ट्रातील कोळी बांधवदेखील गडकिल्ल्यांचा बंदोबस्त पहात असत. मात्र ब्रिटिशांनी त्यांच्या नोकऱ्या तसेच शेतजमिनी काढून घेतल्यामुळे कोळी समाजाने ब्रिटिशांविरोधात उठाव केले. 
  • १८२४ ते १८४५ या काळात तीन टप्प्यात महाराष्ट्राच्या विविध भागात कोळ्यांचे उठाव झाले. 

अ) पहिल्या टप्प्यातील कोळी समाजाचा उठाव :  

  • १८२४ मध्ये मुंबईत नेटिव्ह इन्फंट्रिने केलेला उठाव ब्रिटिशांनी मोडला. 
  • रामजी भांगडिया हे कोळी जमातीचे अधिकारी पोलीस दलात होते. या पदाचा राजीनामा दिल्यानंतर १८२८ साली रामजी भांगडियांच्या नेतृत्वाखाली कोळी समाजाने सशस्त्र उठाव केला. दोन वर्षे हा संघर्ष चालू होता. 
  • सरकारी धोरणास विरोध करून कोळी समाजाने सारा भरण्यास विरोध केला. कॅप्टन अलेक्झांडर व कॅप्टन मॅकिन्टॉश यांनी पश्चिम किनारी भागातील हा उठाव मोडून काढला.

ब) दुसऱ्या टप्प्यात कोळी समाजाचा उठाव :

  • १८३९ मध्ये पुणे परिसरात कोळी समाजाने दुसरा मोठा उठाव केला. दुसरा बाजीराव पेशवा असताना सुमारे १५० कोळींनी 'घोडनदी' परिसरातील सरकारी खजिन्यास वेढा घातला.
  • असिस्टंट कलेक्टर 'रोझ' याने ५४ कोळींना पकडून काहींना फाशी दिली व उठाव मोडून काढला. 

क) तिसऱ्या टप्प्यातील कोळी समाजाचा उठाव :

  • १८४४ च्या दरम्यान रघू भांगडिया व बापू भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली कोळी बांधवांनी पुणे, नाशिक, अहमदनगर येथे मोठे उठाव केले. सातारा, पुरंदर, नाणेघाट, माळशेज घाट येथपर्यंत याची व्याप्ती वाढली. 
  • १८४५ मध्ये बापू भांगडियांना पकडल्यामुळे असंतोष तीव्र झाला. कॅप्टन जेल याने हा उठाव मोडून काढला. . सारांश, १८५० मध्ये कोळी समाजाचे उठाव कायमचे मोडून काढण्यात आले.

भिल्ल समाजाचे उठाव 

  • अरवली, विंध्य, सह्याद्री, सातपुडा पर्वत या भागात बरडा, डागची, माउची, वसावा, तडवी या भिल्ल जमाती राहात होत्या. शेती, पशुपालन, मासेमारी, शिकार हे त्यांचे व्यवसाय होते.
  • खानदेशात भिल्ल बांधवांचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे तेथील उठाव तीव्र होता. पेशवाईच्या अखेरीस खानदेशात माजलेल्या अराजक स्थितीचा भिल्लांनी फायदा उठवून बंड केले. 
  • उठावादरम्यान भिल्लांचे नेते : चिलनाईक, शेख ढुल्ला, हिरा, सेवाराम घिसाडी, खर्जासिंग (काजिसिंग) 
  • १८०३ मध्ये भिल्लांच्या खानदेशातील तीव्र उठावास पेंढाऱ्यांनी साथ दिली. 
  • १८१८ मध्ये सातमाळा, अजिंठा भागात भिल्ल समाजाने उठाव केले. 
  • कॅप्टन ब्रिग्ज याने चिलनाईक या नेत्यास फाशीची शिक्षा दिली. 
  • कॅप्टन डुसॉर्ट याने शेख ढुल्ला या नेत्यास पकडले. 
  • मेजर मोरीन याने १८१८ चे बंड मोडून काढले. 
  • १८२२ मध्ये 'हिरा' या नेत्याच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी मोठे बंड केले. 
  • १८२५ मध्ये सेवाराम घिसाडी याच्या नेतृत्वाखालील भिल्लांच्या बंडास तत्कालिन संस्थानिक व देशमुखांचा पाठिंबा लाभला. 
  • लेफ्टनंट ऑटट्रम याने सेवारामला पकडले व बंड काबूत आणले. 
  • खानदेशात शांतता निर्माण करण्यासाठी ब्रिटिशांनी भिल्लांना जमिनी वाटप, सैन्यात भरती या मार्गाने त्यांचे पुनर्वसन करण्याचे धोरण अवलंबिले.


Post a Comment

0 Comments