भारतीय पठारावरील (द्वीपकल्पीय) नद्या
भारतीय पठारावरील नद्या |
- हिमालयीन नद्यांच्या तुलनेत या नद्या कमी लांबीच्या आहेत. वाहण्याच्या दिशेनुसार या नद्यांचे ४ प्रकार पडतात.
अ) दक्षिण वाहिनी नद्या :
लुनी, साबरमती व मही.
१) लुनी व साबरमती : या नद्या वायव्येकडील अरवली पर्वतात उगम पावतात. अरवली पर्वतात पुष्कर दरीत उगम पावणारी 'लुनी' ही राजस्थानच्या वाळवंटातील एकमेव नदी आहे. लुनी नदी ‘लवणावरी' किंवा 'मिठाची नदी' म्हणून ओळखली जाते. घग्गर नदीच्या व वाऱ्याच्या अपक्षरणामुळे राजस्थानचा मैदानी प्रदेश तयार झाला आहे. घग्गर नदी येथेच लुप्त झाली आहे.
२) मही नदी : (उगम : विंध्य पर्वत) मध्य प्रदेश, राजस्थान व गुजरातमधून वाहते. या सर्व नद्या दक्षिणेकडे वाहत जाऊन अरबी समुद्रास मिळतात.
ब) उत्तर वाहिनी नद्या :
उत्तर भारतीय पठारावरून वाहणाऱ्या चंबळ, शोण, बेटवा, केन या उत्तरवाहिनी नद्या असून त्या बंगालच्या सागरास मिळतात.
क) पश्चिम वाहिनी नद्या :
(नर्मदा, तापी, वैतरणा, उल्हास, वशिष्ठी, तेरेखोल, मांडवी, शरावती, पेरियार)
१) नर्मदा : लांबी : १३१० कि.मी. नर्मदा खोऱ्याचे देशातील क्षेत्रफळ : ९८,७९५ चौकिमी. नर्मदा खोऱ्याचा देशात पाचवा क्रमांक लागतो. (द्वीपकल्पीय पठारात - चौथा क्रमांक) उगम : मैकल टेकड्यांतील अमरकंटक (मध्यप्रदेश). नर्मदा ही सर्वात जास्त लांबीची पश्चिमवाहिनी नदी. नर्मदा नदी मध्य प्रदेश, महाराष्ट्र व गुजरात या तीन राज्यांतून वाहते. नर्मदा पश्चिमेकडे वाहत जाऊन भरूच (भडोच) येथे अरबी समुद्रास मिळते. जबलपूरजवळ भेडाघाट येथे नर्मदेची ‘खोल घळई' व धुवांधार धबधबा प्रसिद्ध आहे.
प्रमुख उपनद्या : शक्कर, दुधी, तवा, बाहनेरा, बंजार, कोलार, हिरण, ओरसांग, शार, कुंडी, मंचक. ३ मे २०१७ रोजी मध्य प्रदेश विधानसभेने नर्मदा नदीस मानवी दर्जा देण्यासंबंधी विधेयक संमत केले!!
२) तापी : लांबी : ७३० कि.मी. तापी खोऱ्याचे देशातील क्षेत्रफळ : ६५,१४५ चौकिमी. उगम : मध्य प्रदेशात बैतूल जिल्ह्यात मुलताई येथे. मध्यप्रदेश, महाराष्ट्र व गुजरात या राज्यांतून वाहते. पश्चिमेकडे वाहत जाऊन सुरतजवळ अरबी समुद्रास मिळते.
उपनद्या : उत्तर पूर्णा, गिरणा, पांझरा, वाघूर, अंभोरा, बोरी, खुरसी, गोगाई, बोकड, अणेर, अमरावती, अरुणावती, बेतूल, गंजाल.
३) शरावती : पश्चिमवाहिनी नदी. उगम : तीर्थहळ्ळी (जि. शिमोगा, कर्नाटक). लांबी : १२८ किमी. संपूर्ण कर्नाटकात वाहते व अरबी समुद्रास मिळते. 'जोग'चा धबधबा (गिरसप्पा धबधबा) शरावती नदीवर आहे.
ड) पूर्व वाहिनी नद्या :
दक्षिण भारतीय पठारावरील गोदावरी, कृष्णा, महानदी, पेन्नेरू, कावेरी. पूर्व वाहिनी नद्या त्यांच्या एखाद्या मुख्य नदीस व मुख्य नद्या बंगालच्या उपसागरास मिळतात.
१) गोदावरी : गोदावरी खोऱ्याचा संपूर्ण भारतात गंगाखोऱ्याखालोखाल दुसरा क्रमांक. गोदावरी खोऱ्याने संपूर्ण भारताच्या क्षेत्रफळाच्या सुमारे ९.५१ टक्के तर द्वीपकल्पीय पठारी प्रदेशाच्या क्षेत्राच्या सुमारे ४९% क्षेत्र व्यापलेले आहे. गोदावरीचा उगम : त्र्यंबकेश्वर ‘ब्रह्मगिरी' (जि. नाशिक) गोदावरी खोऱ्याचे देशातील क्षेत्रफळ : ३,१२,८१२ चौकिमी. यापैकी महाराष्ट्रातील क्षेत्र : १,५२,१९९ चौकिमी. द्वीपकल्पीय पठारी प्रदेशातील सर्वाधिक लांबीची नदी (प्रथम क्रमांक)
गोदावरीची भारतातील एकूण लांबी : १४६५ कि.मी. (विश्वकोशानुसार १४९८ किमी) गोदावरीची महाराष्ट्रातील लांबी : ६६८ किमी. (काही संदर्भग्रंथात महाराष्ट्रातील लांबी ७३२ किमी आढळते) गोदावरी महाराष्ट्र, तेलंगणा व आंध्र प्रदेश या तीन राज्यातून व पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशातून वाहते. गोदावरी खोरे भारतातील महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, ओडिशा व कर्नाटक ही ७ घटकराज्ये व पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात विस्तारले आहे. (सर्वाधिक विस्तार : महाराष्ट्र, सर्वात कमी : कर्नाटक) आंध्र प्रदेशात राजमहेंद्री येथे बंगालच्या उपसागरास मिळते. इतर नावे : ‘वृद्धगंगा', 'दक्षिण गंगा'
प्रमुख उपनद्या : दारणा, प्रवरा, मुळा, सिंधफणस, बिंदूसरा, मांजरा, प्राणहिता, इंद्रावती, शबरी. गोदावरी-कृष्णा नदीजोड प्रकल्प यशस्वी : १६ सप्टेंबर २०१५ रोजी आंध्र प्रदेशात गोदावरीच्या पोलावरम उजव्या बोगद्यातून कृष्णा नदीस ८०TMC पाणी सोडण्यात आले.
प्रमुख उपनद्या : कोयना, वारणा, वेण्णा, वेरळा, पंचगंगा, घटप्रभा, मलप्रभा, भीमा, तुंगभद्रा, मुशी, मुन्नेरू
३) महानदी : देशातील चौथ्या क्रमांकाचे व द्वीपकल्पीय पठारी प्रदेशातील तिसऱ्या क्रमांकाचे खोरे. उगम : छत्तीसगढमधील रायपूर जिल्ह्यात. एकूण लांबी : ८५८ कि.मी. (ओडिशा राज्यातील सर्वांत मोठी नदी) पूर्व घाटात महानदी पात्रात ‘सत्कोसिया' घळई निर्माण झाली आहे. महानदी खोऱ्याचे क्षेत्र : १४१६०० चौकिमी. ओडिशातील कटक येथे बंगालच्या उपसागरास मिळते.
उपनद्या : हिराकूड, ईब, ओंग, मांद, तेल, शिवनाथ.
४) कावेरी : पश्चिम घाटात कर्नाटकातील कूर्ग (कोडूगू) जिल्ह्यात 'ब्रह्मगिरी' येथे उगम. नर्मदा खोऱ्याप्रमाणेच कावेरी खोऱ्याचा देशात पाचवा क्रमांक व द्वीपकल्पीय पठारी प्रदेशात चौथा क्रमांक लागतो. विस्तार : लांबी ७६५ कि.मी. (कर्नाटक, तामिळनाडू या दोन राज्यांतून वाहते.) तामिळनाडूमध्ये बंगालच्या उपसागरास मिळते. कावेरी खोऱ्याचे देशातील क्षेत्रफळ : ८७,९०० चौकिमी. गोदावरीप्रमाणेच कावेरी नदीलादेखील 'दक्षिण गंगा' म्हणून ओळखले जाते. 'शिवसमुद्रम' (कर्नाटक) हा प्रसिद्ध धबधबा कावेरी नदीमुळे तयार झाला आहे.
0 Comments