विविध विचारवंतांची १८५७ च्या उठावाबद्दल मते | १८५७ च्या उठावाला स्वातंत्र्ययुध्द मानणारे विचारवंत | १८५७ च्या उठावाला शिपायांचे बंड मानणारे विचारवंत

 विविध विचारवंतांची १८५७ च्या उठावाबद्दल मते 

१८५७ च्या उठावाबद्दल मते
१८५७ च्या उठावाबद्दल मते


'स्वातंत्र्ययुध्द' मानणारे विचारवंत :

१) स्वातंत्र्यवीर सावरकर : “हिंदी लोकांनी आपल्या धार्मिक व राजकीय स्वातंत्र्यासाठी केलेले 'क्रांतियुध्द." 

२) अशोक मेहता : “१८५७ चे बंडे हे शिपायांच्या बंडाहून अधिक होते...." 

३) संतोषकमार रे : "१८५७ चा उठाव म्हणजे केवळ शिपायांचे बंड नव्हते, तर तो प्रजेचा उठाव होता." 

४) कर्नल मालसन : “हिंदी समाजातील इंग्रजांविरोधी द्वेषभावना ही वैयक्तिक नसून राष्ट्रीय स्वरूपाची होती'

५) डॉ. सुरेंद्रनाथ सेन : “धर्मयुध्द म्हणून सुरू झालेल्या घटनेने शेवटी स्वातंत्र्ययुध्दाचे स्वरूप धारण केले 

६) फ्रान्समध्ये १८५७ च्या उठावाचे "God's Judgement upon English rule in India" असे वर्णन केले गेले 

७) पंडीत नेहरूंच्या मते १८५७ चा उठाव हे राष्ट्रीय आंदोलन होते. 

'शिपायांचे बंड' मानणारे विचारवंत :

१) प्रा. न. र. फाटक : “१८५७ चे बंड म्हणजे केवळ शिपायांची भाऊगर्दी." 

२) सर जॉन लॉरेन्स : “बंडाचे मूळ कारण लष्करातील केवळ काडतूस प्रकरण होय, दुसरे काही नाही." 

३) सर जॉन सीले : “१८५७ चे बंड संपूर्णत: देशाभिमानरहित स्वार्थी शिपायांचे बंड होते." 

४) पी. ई. रॉबर्टस् : “१८५७ च्या बंडात स्वार्थी उद्दिष्टाची परिपूर्ती करू इच्छिणारे अनेक हितसंबंधी लोक सामील झाले होते." 

५) किशोरचंद्र मित्रा : “लाखभर शिपायांच्या बंडाशी जनतेच्या सहभागाचा अजिबात संबंध नाही." 

६) डॉ. आर. सी. मुजुमदार : "१८५७ चे बंड राष्ट्रीय चळवळ मुळीच नव्हती. बंडाचे नेते हे राष्ट्रीय भावनेने प्रेरित झालेले नव्हते."


Post a Comment

0 Comments