१८५७ नंतरचे भारतातील व्हाईसरॉय Part 1 | लॉर्ड कॅनिंग | लॉर्ड एल्गिन पहिला | सर जॉन लॉरेन्स | लॉर्ड मेयो | लॉड नॉर्थब्रुक

१८५७ नंतरचे भारतातील व्हाईसरॉय
१८५७ नंतरचे भारतातील व्हाईसरॉय


 १८५७ नंतरचे भारतातील व्हाईसरॉय Part १

  • १८५८ च्या जाहीरनाम्यानुसार भारताचा गव्हर्नर जनरल हा भारताचा व्हाईसरॉय बनला. अशा रीतीने १८५७ च्या उठावावेळी गव्हर्नर जनरलपदी असलेला लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हाईसरॉय बनला. 

१) लॉर्ड कॅनिंग : (१८५६-१८५८ या काळात गव्हर्नर जनरल, १८५८-६२ या काळात व्हाईसरॉय). भारताचा पहिला व्हाईसरॉय (१८५८-१८६२) . १८५७ चे बंड मोडून काढले. १८५६-५७ मध्ये आय. सी. एस्. परीक्षेची भारतात सुरूवात केली. . खालसा धोरण रद्द केले. १८५७ मध्ये मुंबई, मद्रास, कोलकाता येथे विद्यापीठांची स्थापना केली. १८६० मध्ये आग्रा व लाहोर येथे दरबार भरवून संस्थानिकांना त्यांच्या सनदा परत करण्याची घोषणा केली. १८३६ मध्ये लॉर्ड मेकॉलेने तयार केलेल्या 'इंडियन पीनल कोड' ला १८६० मध्ये कॅनिंगने मान्यता दिली. १८६१ च्या "Indian HighcourtAct' नुसार मुंबई, मद्रास व कोलकाता येथे उच्च न्यायालयांची स्थापना केली. भारतमंत्री चार्ल्स वूडूच्या सल्ल्यानुसार १८५९ मध्ये भारतातील प्रत्येक प्रांतात शिक्षण खाते सुरू केले. (१८६१ मध्ये कोलकाता - अहमदाबाद लोहमार्ग सुरू केला. १८६१ चा कौन्सिल अॅक्ट संमत केला. १८५९ मध्ये शेतकऱ्यांसाठी हितकारक असा 'बंगाल रेंट अॅक्ट' संमत केला.

२) लॉर्ड एल्गिन पहिला (१८६२-६३) : सहिष्णू धोरणाचा पुरस्कर्ता. धर्मशाळा (हिमाचल) यथे मृत्यू. 

३) सर जॉन लॉरेन्स (१८६४-६९) : शेतकऱ्यांच्या हितासाठी पंजाब, अवध येथे 'टेनन्सी अॅक्टस्' पास केले. १८६८ मध्ये दुष्काळ आयोगाची (फॅमिन कमिशन) स्थापना केली. जलसिंचन खाते निर्माण करून त्यावर रिचर्ड स्ट्रॅची या तज्ज्ञाची नियुक्ती केली. पाटबंधारे खाते सुरू केले. सिमला हे उपराजधानीचे ठिकाण निर्माण केले. अफगाणिस्तानबरोबर उत्कृष्ट निष्क्रीयता धोरण राबविले.

४) लॉर्ड मेयो (१८६९-१८७२) : आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक ४ डिसेंबर १८७० चे आर्थिक विकेंद्रीकरणाचे विधेयक पास केले. (प्रांतिक स्वायत्ततेची सनद) १८७२ मध्ये मेयोने पहिली जनगणना केली. याच्या काळात वहाबी चळवळ, कुका चळवळ क्रियाशील झाल्या. १८७२ मध्ये अंदमान येथे शेरअलीने लॉर्ड मेयोचा खून केला.

५) लॉड नॉर्थब्रुक (१८७२-७६) : बिहारमधील दुष्काळ, अफगाणिस्तानसंबंधी धोरण यावरून विवादास्पद. १८७५ मध्ये प्रिन्स ऑफ वेल्सची भारतभेट. 

Post a Comment

0 Comments