१८५७ नंतरचे भारतातील व्हाईसरॉय Part 2 | लॉर्ड लिटन | लॉर्ड रिपन | लॉर्ड डफरिन | लॉर्ड लान्सडाऊन | लॉर्ड एल्गिन दुसरा

१८५७ नंतरचे भारतातील व्हाईसरॉय
१८५७ नंतरचे भारतातील व्हाईसरॉय

 

१८५७ नंतरचे भारतातील व्हाईसरॉय Part 2

६) लॉर्ड लिटन (१८७६-१८८०) : १८७६-७८ च्या दुष्काळावर उपाय सुचविण्यासाठी रिचर्ड स्ट्रॅची आयोग नेमला. १ जानेवारी १८७७ : दिल्ली दरबारात राणी व्हिक्टोरियास ‘भारताची सम्राज्ञी' (कैसर-ए-हिंद) सदवी दिली. मार्च १८७८ : देशी वृत्तपत्र कायदा (व्हर्नाक्यूलर प्रेस अॅक्ट) संमत करून वृत्तपत्रांची मुस्कटदाबी केली. १८७८ चा शस्त्रबंदी कायदा. (विनापरवाना शस्त्रे बाळगण्यास भारतीयांवर बंदी) . १८७९ चा 'स्टॅट्यूटरी सिव्हिल सर्व्हिसेस अॅक्ट' संमत करून परीक्षेची कमाल वयोमर्यादा २१ वरून १९ वर्षे केली. १८८३ ची दुष्काळ संहिता. (Famine Code) मीठाच्या व्यापारावर जाचक कर लादले.

७) लॉर्ड रिपन (१८८०-८४) : म्हैसूर, बडोदा या राज्यांची पुनर्स्थापना (१८८१). १८८१ : फॅक्टरी अॅक्ट संमत केला (७ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना कामावर ठेवण्यास बंदी) . १९ जानेवारी १८८२ : व्हर्नाक्यूलर प्रेस ॲक्ट रद्द केला. १८८२ : प्राथमिक शिक्षणासंबंधी विचारार्थ विल्यम हंटर कमिशन नेमले. हाच भारतीय शिक्षण आयोग होय. १८ मे १८८२ : स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा केला. २ फेब्रुवारी १८८३ : इलबर्ट विधेयक मंजूर केले.त्यानुसार भारतीय न्यायाधीशांना युरोपियन आरोपींचे खटले चालवण्याचा अधिकार मिळाला. रमेशचंद्र मित्तर यांची कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती केली. (पहिले भारतीय) नागरी सेवा परीक्षेची कमाल वयोमर्यादा १९ वरून पुन्हा २१ वर्षे केली. मानवतावादी दृष्टीकोन व भारताबद्दलची आस्था यामुळे रिपनला भारतात कमालीची लोकप्रियता लाभली.

८) लॉर्ड डफरिन (१८८४-८८) : २८ डिसेंबर १८८५ रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना. जानेवारी १८८६ : उत्तर ब्रम्हदेश भारतात विलिन करून घेतला. (३ रे बर्मा युध्द) १८८६ : चार्लस् अचिसनच्या अध्यक्षतेखाली लोकसेवा आयोगाची स्थापना. १८८७ : पंजाब कुळकायदा संमत. १६ फेब्रुवारी १८८७ : व्हिक्टोरिया राणीच्या राज्यरोहणाच्या ५० व्या वर्धापनदिनाचे आयोजन. डफरिन यांच्या पत्नीने भारतीय स्त्रियांच्या आरोग्यासाठी लेडी डफरिन फंड स्थापन केला. इंपिरिअल सर्व्हिस ट्रप्स योजनेंतर्गत संस्थानिकांना स्वत:चे सैन्य ठेवण्यास परवानगी. (पंजदेह प्रकरण)

९) लॉर्ड लान्सडाऊन (१८८८-१८९४) : १८९२ साली भारतीयांना शासनात प्रवेश देण्यासाठी 'कौन्सिल अॅक्ट' संपत संमतीवय कायद्यानुसार १२ वर्षांखालील मुलींचा विवाह बेकायदेशीर ठरवण्यात आला. राजा प्रतापसिंग (काश्मीर) प्रकरण. भारत-अफगाणिस्तानदरम्यान ड्यूरँड सीमारेषा आखली. लिटनने सुरू केलेली स्टॅट्यूटरी सिव्हिल सर्व्हिस लान्सडाऊनने बंद केली. 

१०) लॉर्ड एल्गिन दुसरा (१८९४-१८९९) : १८९६-९७ या काळात महाराष्ट्रात प्लेगची साथ आली. १८९९ : बिहारमध्ये संथाळांनी उठाव केला. २२ जून १८९७ : जुलमी प्लेग कमिशनर रँड व त्याचा सहकारी आयर्ट यांची चाफेकर बंधंनी हत्या केली.

Post a Comment

0 Comments