भारतातील पर्जन्य विभाग | अवर्षण स्पर्धापरीक्षा उपयुक्त संपूर्ण माहिती १००% येणार

भारताचे पर्जन्य

भारताचे पर्जन्य
भारताचे पर्जन्य


पर्जन्याचे असमान वितरण 

प्रतिरोध पर्जन्य : पश्चिम घाटामुळे मान्सून वारे अडवले जाऊन ते उर्ध्वमुखी बनतात. उंचीवर थंड हवेमुळे त्यांच्यातील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन त्यामुळे पश्चिम घाट उतारावर प्रतिरोध पर्जन्य पडतो. 

  • उंचीनुसार पर्जन्याचे प्रमाण वाढत जाते. त्यानुसार, महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथे वार्षिक ५९४ सें.मी. पाऊस पडतो, तर पायथ्याशी असलेल्या 'वाई' येथे केवळ ५४ सें.मी. पाऊस पडतो. (पर्जन्यछायेचा प्रदेश) अशाच प्रकारे बंगालच्या उपसागरावरून वाहणारे मान्सून वारे पूर्वेकडील उंच टेकड्यांमुळे अडवले जाऊन चेरापूंजी, मॉसिनराम (मेघालय) येथे वार्षिक १२०० सें.मी. पाऊस पडतो, तर चेरापूंजीच्या उत्तरेला खासी टेकड्यांच्या पर्जन्यछायेच्या प्रदेशातील 'शिलाँग' येथे १४०. सें.मी. व गुवाहाटी येथे १०० सें.मी. पाऊस पडतो.  
  • मेघालयातील मॉसिनराम येथे भारतातील तसेच जगातील सर्वाधिक पावसाची नोंद होते. 
  • कर्नाटकातील आगुम्बे (जि. शिमोगा) येथे वार्षिक सरासरी ७६४० मिमी. पाऊस पडतो. आगुम्बेला 'दक्षिणेकडील चेरापुंजी' असे म्हणतात कारण, ईशान्य भारतानंतर पठारी प्रदेशात आगुम्बे हेच सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे. 
  • अंदमान-निकोबारमधील पोर्ट ब्लेयर येथे मे महिन्यापासून डिसेंबर महिन्यापर्यंत नैऋत्य व ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून वार्षिक सरासरी ३००० मिमी पाऊस पडतो. 
  • आवर्त : पूर्व किनाऱ्यावर बंगालच्या उपसागरावरून येणारी चक्रीवादळे व पश्चिम किनाऱ्यावर अरबी समुद्रावरून येणारी वादळे यामुळे तेथील प्रदेशात मुसळधार पाऊस पडतो. त्यास 'आवर्त' म्हणतात.
  • जागतिक बँकेच्या अहवालानुसार २०१०-१४ या काळात भारतात वार्षिक सरासरी १०८३ मि.मी. पाऊस झाला. 

मान्सून अंदाज : भारतात मान्सूनचा एकूण अंदाज व्यक्त करण्यासाठी भारतीय हवामान खाते 'दीर्घकालीन सरासरी' (Long Period Average) ही संकल्पना पाया म्हणून वापरते. त्यासाठी १९५१ ते २००० या पन्नास वर्षांच्या काळात भारतात पडलेल्या पावसाची ८९ सेंमी या सरासरीचा आधार घेतला जातो. 

या दीर्घकालीन सरासरीच्या टक्केवारीच्या प्रमाणाचे ५ प्रकारात वर्गीकरण केले जाते. 

१) ९०% पेक्षा कमी प्रमाण : अपूरा पाऊस 

२) ९० ते ९६ टक्के : सामान्यपेक्षा कमी पाऊस 

३) ९६ ते १०४ टक्के : सामान्य पाऊस 

४) १०४ ते ११० टक्के : सामान्यपेक्षा अधिक पाऊस 

५) ११० टक्क्यापेक्षा अधिक प्रमाण : पावसाचे अधिक्य

भारतातील पर्जन्य विभाग 

१) अति कमी पावसाचा प्रदेश (४० सें.मी. पेक्षा कमी पाऊस) : कच्छचे रण (गुजरात), पश्चिम राजस्थान, जम्मू-काश्मीरचा उत्तर भाग, नैऋत्य पंजाब, पश्चिम हरियाणा. 

२) कमी पावसाचा प्रदेश (४० सें.मी. ते ६० सें.मी.) : पूर्व राजस्थान, पश्चिम गुजरात, पश्चिम पंजाब, पूर्व हरियाणा आणि द. भारतातील पर्जन्यछायेचा प्रदेश. 

३) मध्यम पर्जन्याचा प्रदेश (६० सें.मी. ते १५० सें.मी.) : उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश (भारताचा बहुतांश भाग) 

४) जास्त पर्जन्याचा प्रदेश (१५० ते २५० सें.मी.) : हिमालयाच्या पायथ्याचा प्रदेश, मध्य प्रदेशाचा पूर्व भाग, आसाम 

५) अति जास्त पर्जन्याचा प्रदेश (२५० सें.मी. पेक्षा जास्त) : पश्चिम किनारा, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोराम. 

भारतीय पर्जन्याची वैशिष्ट्ये : वितरणातील असमानता. अनिश्चितता व अनियमितता. 

केंद्रीतता : वर्षाचा सर्व पाऊस एखाद्या महिन्यात पडतो व बाकीचे महिने कोरडे. 

चलक्षमता : म्हणजे सरासरी वार्षिक पर्जन्यापेक्षा जास्त किंवा कमी पाऊस पडणे. 

अवर्षण : ज्या प्रदेशात ५० सें.मी. पेक्षा कमी पाऊस पडतो, अशा भागात अवर्षणाची स्थिती निर्माण होते. 

  • कृत्रिम पावसाच्या निर्मितीसाठी वापरली जाणारी रसायने : सिल्व्हर आयोडाईड, पोटॅशियम आयोडाईड, शुष्क बर्फ (घन CO.) द्रवरुप प्रॉपेन. 
  • कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी 'सी डॉप्लर रडार' वापरले जाते.



Post a Comment

0 Comments