भारतातील सर्वात प्रथम महिला | पहिली महिला राज्यपाल | पहिली महिला IAS अधिकारी | पहिली भारतीय महिला डॉक्टर

भारतातील सर्वात प्रथम महिला (राजकीय क्षेत्र)

भारतातील-सर्वात-प्रथम-महिला
भारतातील सर्वात प्रथम महिला


भारताच्या (दिल्लीच्या) तख्तावरील पहिली मुस्लिम स्त्री राज्यकर्ती : रझिया सुलताना (१२३६-४०) 

भारतातील पहिली महिला राज्यपाल : सरोजिनी नायडू (आग्रा-अवध १९४७) 

भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री : सुचेता कृपलानी (उ. प्रदेश १९६३-६७) 

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या स्त्री अध्यक्षा : अॅनी बेझंट (१९१७-कोलकाता अधिवेशन) 

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय स्त्री अध्यक्षा : सरोजिनी नायडू (१९२५ कानपूर) 

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान : श्रीमती इंदिरा गांधी (१९६६) 

'युनो' च्या आमसभेतील पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा : श्रीमती विजयालक्ष्मी पंडित (१९५३) 

भारतातील पहिली महिला मेयर : अरूणा असफ अली (दिल्ली-१९५८) 

भारताच्या परदेशातील पहिल्या महिला राजदूत : सी. बी. मुथाम्मा (पॅरिस येथे) 

भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती : श्रीमती प्रतिभाताई पाटील 

भारतीय लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती : श्रीमती मीराकुमार (२००९) 

केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपद भूषविणारी पहिली महिला : राजकुमारी अमृता कौर (आरोग्य मंत्री) 

पहिली भारतीय महिला महापौर : सुलोचना मोदी (मुंबई, १९५६) 

लोकसभेच्या पहिल्या महिला सरचिटणीस : स्नेहलता श्रीवास्तव (डिसेंबर २०१७) 

राज्यसभेच्या पहिल्या महिला सरचिटणीस : व्ही. एस. रमादेवी (१९९३-१९९७)

भारतातील सर्वात प्रथम महिला (प्रशासकीय क्षेत्र) 

भारतातील पहिली महिला बॅरिस्टर : कार्नेलिन सोराबजी 

भारत : पहिल्या महिला (IPS) अधिकारी : किरण बेदी (१९७२) 

महाराष्ट्र : पहिल्या महिला (IPS) अधिकारी : मीरा बोरवणकर 

भारत : पहिल्या महिला पोलीस महासंचालक (DGP) : कांचन भट्टाचार्य 

सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश : न्या. मीरासाहीब फातिमा बीबी (१९८९) 

उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश : न्या. लैला शेठ (हिमाचल प्रदेश-१९९१) 

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) पहिल्या महिला अध्यक्षा : रोझ मिलियन बेथ्यू 

पहिली महिला IAS अधिकारी : अन्ना राजम जॉर्ज (१९५०) 

भारताच्या पहिल्या महिला मुख्य माहिती आयुक्त : श्रीमती दीपक संधू (२०१३) 

नीती आयोगाच्या (NITI) पहिल्या CEO व पहिल्या महिला CEO : श्रीमती सिंधुश्री खुल्लर

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) पहिल्या महिला अध्यक्षा : अरुंधती भट्टाचार्य 

सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी (हैद्राबाद)च्या पहिल्या महिला प्रमुख : अरुणा बहुगुणा (२०१४) 

भारताच्या पहिल्या महिला विदेश सचिव : चोकिला अय्यर 

भारताच्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त : व्ही. एस. रमादेवी (१९९०) 

सर्वोच्च न्यायालयात थेट न्यायमर्तीपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला वकील : न्या. इंद मल्होत्रा (जाने. २०१८) 

लंडनमधील ओल्ड बेली कोर्टाच्या पहिल्या गौरेतर (Non-White) न्यायाधीश : अनुजा धीर (एप्रिल २०१७) 

सीमा सुरक्षा दलातील (BSF) पहिली महिला लढाऊ अधिकारी : तनुश्री परिक 

पहिली भारतीय महिला डॉक्टर : डॉ. कदम्बिनी गांगुली व आनंदीबाई जोशी या दोघी महिला एकाच वर्षी १८८६ साली डॉक्टर बनल्या.

अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या पहिल्या भारतीय महिला : डॉ. आनंदी गोपाळ जोशी 

Post a Comment

0 Comments