भारतातील प्रमुख नद्या संपूर्ण माहिती स्पर्धापरीक्षा उपयुक्त १००% येणार

भारत - नदीप्रणाली 

भारत नदीप्रणाली
भारत नदीप्रणाली


दिलेल्या ब्लॉग मध्ये तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे मिळतील :

भारतातील प्रमुख नद्या ?
भारतातील पश्चिम वाहिनी नद्या ?
भारतातील दक्षिण वाहिनी नद्या ?
भारतातील पूर्व वाहिनी नद्या ?
भारतातील द्वीपकल्पावरील नद्या ?
दक्खन पठारावरील नद्या ?
भारतातील नद्या व त्यांचे उगमस्थाने ?
अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या ?
बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या नद्या ?
कोणत्या नद्यांना मानवी दर्जा ?

भारतीय नदीप्रणाली प्रामुख्याने दोन गटांत विभागली जाते.

१) हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या. संपूर्ण माहिती स्पर्धापरीक्षा उपयुक्त १००% येणार 

२) भारतीय पठारावरील (द्वीपकल्पीय) नद्या. 

१) हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या : सिंधु, सतलज, गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा इत्यादी. 

  • हिमालयीन नद्या बारमाही व युवावस्थेतील नद्या आहेत. यांच्या अपक्षरण कार्यामुळे 'V' आकाराची दरी, खोल घळई, धबधबे, द्रुतप्रवाह ही भूरूपे तयार होतात. हिमालयात उगम पावणाऱ्या नद्यांचे अ) अरबी समुद्राला मिळणाऱ्या आणि ब) बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या असे दोन प्रकार पडतात.

अ) अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या 

१) सिंधू नदी (Indus River) : उगम : मानस सरोवराच्या उत्तरेस. (तिबेटमध्ये-कैलास पर्वतावर) सिंधू नदी भारतात जम्मू-काश्मीर राज्यात प्रवेश करते. ही नदी चीन, भारत व पाकिस्तान या तीन देशांतून वाहते. काश्मीरमधून वाहत जाऊन गिलगिट येथे पाकिस्तानात प्रवेश करते. (सिंधूची लांबी पाकिस्तानात सर्वाधिक आहे.) 

  • एकूण लांबी : २८८० कि.मी. भारतातील लांबी : ८०० कि.मी. 
  • पाकिस्तानात कराचीच्या पूर्वेस अरबी समुद्रास मिळते. सिंधूच्या भारतातील उपनद्या : झेलम, सतलज, रावी, चिनाब, बियास, श्योक, झास्कर, गिलगिट, सतलज. 
  • १९ सप्टेंबर १९६० च्या सिंधू पाणी वाटप करारानुसार सिंधू खोऱ्यातील फक्त २०% पाणी भारत वापरू शकतो, हे पाणी पंजाब, हरियाणा ही राज्ये तसेच दक्षिण व पश्चिम राजस्थानमध्ये सिंचनासाठी वापरले जाते. सियाचीन (लांबी ७० किमी), बल्तोरो, हिस्पार या हिमालयाच्या काराकोरम भागातील प्रमुख हिमनद्यांमुळे सिंधू नदीला वर्षभर पाणी असते. सतलज नदी : उगम : मानस सरोवराजवळील राकस सरोवरात, . सतलज नदीचे मूळ नाव : शतदू, शताद्री 
  • सतलज नदी शिप्किला खिंडीतून भारतात हिमाचल प्रदेशात प्रवेश करते. (लांबी : १४५० किमी)
  • हिमाचल प्रदेश व पंजाबमधून वाहत पाकिस्तानात सिंधूला मिळते. (सतलजची भारतातील लांबी : १०५० किमी) पंजाब म्हणजे झेलम, सतलज, रावी, चिनाब व बियास या पाच नद्यांचा प्रदेश, चिनाब ही सर्वात मोठी नदी.

ब) बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या नद्या 

१) गंगा नदी : उगम : कुमाऊँ हिमालयातील गंगोत्री येथे हिमनदीपासून उगम. . भारतातील सर्वाधिक लांबीची नदी (२५२५ किमी)

  • अलकनंदा (उगम : अलकापुरी, उत्तराखंड) व भागिरथी (उगम : गंगोत्री) या दोन नद्या 'देवप्रयाग' येथे एकत्र येऊन त्यांच्या संयुक्त प्रवाहास 'गंगा' असे नामाभिधान आहे. उत्तराखंड व उत्तर प्रदेश या दोन राज्यांतच गंगेची लांबी सुमारे १२०० कि.मी. आहे. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल या पाच राज्यांतून गंगा वाहते. राजमहल टेकड्यांना वळसा घालून गंगा दक्षिणेकडे वळते तेव्हा फराक्का धरणाजवळ हुगळी ही गंगेची पहिली व सर्वात मोठी वितरिका तयार होते व ती प्रामुख्याने पश्चिम बंगालमध्ये वाहते (हुगळीची लांबी : २६० किमी). भागीरथी व जालंगी नद्यांच्या प्रवाहातून हुगळी हा प्रवाह तयार होतो. गंगा ही भारतातील पाच राज्यांतून व बांगला देशातून वाहणारी आंतरराष्ट्रीय नदी आहे. बांगलादेशात गंगेस ‘पद्मा' या नावे ओळखले जाते. येथेच तिला ब्रह्मपुत्रा येऊन मिळते. गंगा (पद्मा) व ब्रह्मपुत्रा संयुक्तपणे बांगला देशातील चंदिपूरजवळ बंगालच्या उपसागरास मिळतात. 
  • गंगेच्या प्रमुख उपनद्या : 
  • डाव्या (उत्तरेकडील) : रामगंगा, गोमती, घागरा, गंडक, कोसी, महानंदा,
  • उजव्या (दक्षिणेकडील) : यमुना, शोण (गंगेच्या सुमारे ११५ उपनद्या आहेत.) 
  • गोमती, घागरा, गंडक, कोसी या उपनद्या गंगा-यमुना संगमाच्या आधी गंगेस मिळतात. यांच्या गाळामुळे पंखाकृती मैदाने तयार होतात. शोण नदी दक्षिणेकडून वाहत येऊन बिहार राज्यात गंगेस मिळते. बंगालच्या उपसागरास मिळताना गंगेच्या मुखाशी मोठा त्रिभूज प्रदेश निर्माण झाला असून असंख्य वितरिकांमध्ये तिचे पाणी विभागले जाते. गंगा खोऱ्याचा विस्तार देशातील १० राज्यांत झालेला आहे. सतत पात्र बदलणाऱ्या गंगेच्या 
  • उपनद्या : घागरा, गंडक, कोसी, शोण (कोसी नदीस 'बिहारचे दुःखाश्रू' म्हणतात) गंगेचे खोरे हे देशातील सर्वांत मोठे (प्रथम क्रमांकाचे) खोरे आहे.
  • डिसेंबर २००८ मध्ये भारत सरकारने गंगा नदीस 'राष्ट्रीय नदी' म्हणून घोषित केले. 

२) यमुना नदी : (उगम : यम्नोत्री; हिमालय, लांबी : १३७६ कि.मी.) ही गंगेची सर्वांत मोठी उपनदी अलाहाबाद येथे गंगेला मिळते. सरस्वती ही गुप्त नदी गंगेला येथेच मिळते. 

  • उपनद्या : चंबळ, सिंद, बेटवा, धसान, केन या नद्या माळवा पठारावर उगम पावतात व पुढे यमुनेला मिळतात. चंबळ नदी ही राजस्थान व मध्य प्रदेशातून वाहणारी सर्वांत मोठी नदी आहे. 

३) ब्रह्मपुत्रा : उगम : मानस सरोवर (तिबेट) लांबी : २९०० कि.मी., भारतातील लांबी : ८८५ कि.मी. 'त्सांगपो' या नावाने तिबेटमधून वाहणाऱ्या नदीस भारतात अरुणाचल प्रदेशात दिहांग म्हणतात. दिहांग नदीस दिबांग व लोहित या नद्या मिळतात. त्यांच्या एकत्रित प्रवाहास 'ब्रह्मपुत्रा' म्हणून ओळखले जाते.

  • (त्सांगपो म्हणजे शुद्धीकारक : Purifier). ब्रह्मपुत्रा नदी चीन, भारत व बांग्ला देश या तीन देशांतून वाहते. ब्रह्मपुत्रा भारतात अरुणाचल प्रदेश, आसाम या ईशान्येकडील राज्यांमधून व बांगला देशातून वाहणारी आंतरराष्ट्रीय नदी आहे. ब्रह्मपुत्रा बांगलादेशात बंगालच्या उपसागरास मिळते. बांगलादेशात ब्रह्मपुत्रा ही 'जमुना' नावे प्रसिद्ध. ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रात गाळाच्या निक्षेपणामुळे निर्माण झालेले 'माजुली' हे जगातील सर्वात मोठे नदीय बेट आहे. ब्राझीलमधील अॅमेझॉन नदीतील 'माराजो' हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नदीय बेट आहे. आसाममध्ये विध्वंसक महापुरास कारणीभूत ठरत असल्याने ब्रह्मपुत्रेस 'आसामचे दुःखाश्रु' म्हणतात.
  • ब्रह्मपुत्रेच्या उपनद्या : सुभानशिरी, धानशिरी, जयभोरेली, मानस, तिस्ता, भूरी-दिहिंग, दिसांग, कोपोली, कलाग, दिखू, कामेंग, बेलसिरी, चंपामन, गंगाधर, धारला, दिबू. (तिस्ता ही पूर्वी गंगेची उपनदी होती. १७८७ मधील मोठ्या पुरामुळे तिचे पात्र बदलले जाऊन तिस्ता पूर्वेकडे वाहत जाऊन ब्रह्मपुत्रेची उपनदी बनली.)

नद्यांना मानवी दर्जा : 

  • २० मार्च २०१७ रोजी उत्तराखंड उच्च न्यायालयाने गंगा व यमुना या दोन मोठ्या नद्यांना मानवी दर्जा (Living Human Status) बहाल केला होता. त्यामुळे या नद्यांना सर्वसामान्य भारतीय नागरिकांप्रमाणे हक्क प्राप्त होऊन त्यांना प्रदूषित केल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार होता. ७ जुलै २०१७ रोजी सर्वोच्च न्यायालयाने उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या वरील आदेशास स्थगिती दिली. यापूर्वी न्यूझीलंड देशाच्या संसदेने तेथील 'व्हांगनुई नदीस मानवी दर्जा दिला होता.



Post a Comment

0 Comments