महाराष्ट्र-वन्य प्राणीजीवन (अभयारण्ये)
![]() |
महाराष्ट्रातील अभयारण्ये |
राष्ट्रीय उद्यान (National Park) : म्हणजे वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ च्या कलम ३५, कलम ३८ किंवा ६६(३) नुसार घोषित केलेले संरक्षित क्षेत्र.
- राज्यात मेळघाट व पूर्व विदर्भात वाघ आढळतात.
- कर्नाळा (रायगड) येथे पक्ष्यांसाठी अभयारण्य आहे.
राज्यातील ६ व्याघ्र प्रकल्प : मेळघाट, ताडोबा, पेंच (पूर्व महाराष्ट्र), सह्याद्री (पश्चिम महाराष्ट्र), नागझिरा-नवेगाव, बोर (वर्धा)
२५ मे २००८ : चांदोली व कोयना परिसरातील 'सह्याद्री व्याघ्र प्रकल्प' या राज्यातील चौथ्या व्याघ्र प्रकल्पास केंद्राची मंजूरी, क्षेत्रफळ : ७४१.२२ चौ.किमी. (विस्तार : सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये)
२९ नोव्हेंबर २०१३ : नागझिरा-नवेगाव हा ५ वा व्याघ्र प्रकल्प.
१ जुलै २०१४ : बोर (वर्धा) ६ वा व्याघ्र प्रकल्प
राज्यातील ६ राष्ट्रीय उद्याने
राष्ट्रीय उद्यान |
जिल्हा |
क्षेत्रफळ चौ.किमी |
घोषणा निर्मिती |
ताडोबा-अंधारी |
चंद्रपूर |
११६.५५ |
१९५५ |
पेंच
(प. जवाहरलाल नेहरू उद्यान) |
नागपूर |
२५७.२६ |
१९७५ |
नवेगाव बांध |
गोंदिया |
१३३.८८ |
१९७५ |
संजय गांधी |
मुंबई उपनगर
(बोरीवली व ठाणे) |
८६.९६ |
१९८३ |
गुगामल |
मेळघाट
(अमरावती) |
३६१.२८ |
१९८७ |
चांदोली |
शिराळा
(जि. सांगली) |
३१७.६७ |
२००४ |
अभयारण्ये : राज्यातील ६ विभागातील प्रमुख अभयारण्ये खालीलप्रमाणे
महाराष्ट्रात एकूण ५८ संरक्षित क्षेत्रांमध्ये ६ राष्ट्रीय उद्याने, ४८ वन्यजीव अभयारण्ये व ४ संवर्धन क्षेत्रे आहेत.
1. कर्नाळा (पक्षी) - रायगड जिल्हा
2. भीमाशंकर (शेकरू खार) - पुणे जिल्हा
3. तानसा - ठाणे जिल्हा
4. सागरेश्वर (हरीण) - सांगली जिल्हा
5. फणसाड - रायगड जिल्हा
6. मयुरेश्वर - पुणे जिल्हा
7. तुंगारेश्वर - पालघर जिल्हा
8. कोयना - सातारा जिल्हा
9. देऊळगाव-रेहेकुरी (काळवीट)- कर्जत (अहमदनगर) जिल्हा
10. दाजीपूर-राधानगरी (गवे) १९५८ - कोल्हापूर जिल्हा
11. माळढोक (पक्षी) - अहमदनगर व सोलापूर जिल्हा
12. नायगाव (मोर) - बीड जिल्हा
13. येडशी - उस्मानाबाद जिल्हा
14. यावल - जळगाव जिल्हा
15. जायकवाडी (पक्षी) - औरंगाबाद-नगर जिल्हा
16. मेळघाट (व्याघ्र) (ढाकणा कोलकाझ) - अमरावती जिल्हा
17. गौताळा-औटरमघाट - औरंगाबाद व जळगाव जिल्हा
18. नांदूर-मधमेश्वर (पक्षी) - नाशिक जिल्हा
19. किनवट - यवतमाळ, नांदेड जिल्हा
20. चपराळा - गडचिरोली जिल्हा
21. पेनगंगा - यवतमाळ, नांदेड जिल्हा
22. अनेर धरण - नंदुरबार जिल्हा
23. टिपेश्वर - यवतमाळ, नांदेड जिल्हा
24. कळसूबाई-हरिश्चंद्रगड - अहमदनगर जिल्हा
25. नर्नाळा - अकोला जिल्हा
26. काटेपूर्णा - वाशीम जिल्हा
27. नागझिरा - गोंदिया जिल्हा
28. अंधारी - चंद्रपूर जिल्हा
सागरेश्वर हे महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य. (निर्मिती : दि. मो. मोहिते)
महाराष्ट्रातील नवी अभयारण्ये : २४ जानेवारी २०१३ : १) ताम्हिणी (जि. पुणे), २) इशापूर (जि. यवतमाळ) (पक्ष्यांसाठी)
चार नवी अभयारण्ये (७ जून २०१२) : नवीन माळढोक, नवीन बोर, नवे नागझिरा, नवीन नवेगाव.
- 'ग्रेट इंडियन बस्टर्ड' या पक्षासाठी उस्मानाबाद-सोलापूर हे अभयारण्य कार्यान्वित.
- जगात केवळ गडचिरोली जिल्ह्यात कोपेला कोलामार्क वनक्षेत्रात रानम्हशींचे अस्तित्व आहे.
- राज्यात वन्यजीव संरक्षण अधिनियम अस्तित्वात आला : १९७२
वन्य जीव सप्ताह : २ ते ८ ऑक्टोबर . १९५२ मध्ये देशात 'वन महोत्सव' सुरू झाला.
महाराष्ट्र वनविकास महामंडळाची स्थापना : १६ फेब्रुवारी १९७४. १९७२ च्या वन्यजीव संरक्षण अधिनियमात २००२ मध्ये दुरुस्ती करून 'सामाजिक साठे/संपत्ती' या संकल्पनेचा समावेश.
0 Comments