भारतातील प्रमुख नद्या व त्यांची उगमस्थाने संपूर्ण माहिती स्पर्धापरीक्षा उपयुक्त

भारतातील प्रमुख नद्या 

भारतातील प्रमुख नद्या
भारतातील प्रमुख नद्या


  • पश्चिम वाहिनी नर्मदा नदी उत्तरेकडे विंध्य व दक्षिणेकडे सातपुडा रांगांमधून वाहते. सातपुड्याच्या दक्षिणेस तापी नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. पूर्ववाहिनी गोदावरी नदी, उत्तरेकडील सातमाळा-अजिंठा व दक्षिणेकडील हरिश्चंद्र-बालाघाट डोंगररांगांदरम्यान वाहते. हरिश्चंद्र-बालाघाट व महादेव डोंगररांगांदरम्यान भीमा नदी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते. भीमा खोरे व कृष्णा खोरे दरम्यान महादेव डोंगररांगा पसरलेल्या आहेत. सातमाळा-अजिंठा, हरिश्चंद्र-बालाघाट, महादेव या डोंगररांगा सह्याद्रीच्या (पूर्वेकडील) उपरांगा आहेत.

भारत : क्षेत्रानुसार नदी खोऱ्यांचा क्रम

नदीखोरे

क्रमांक

भारतातील क्षेत्रफळ चौकिमी.

गंगा नदीखोरे

भारतातील सर्वात मोठे (प्रथम क्रमांकाचे) खोरे

,६१,४५२ (२६.%)

गोदावरी खोरे

भारतातील दुसरे पठारावरील प्रथम क्रमांकाचे खोरे

,१२,८१२ (.५१%)

कृष्णा खोरे

भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे खोरे

,५८,९४८ (.८७%)

महानदी खोरे

भारतातील चौथ्या क्रमांकाचे खोरे

,४१,६०० (.%)

नर्मदा खोरे

भारतातील पाचव्या क्रमांकाचे खोरे

९८,७९५ (.००५%)

कावेरी खोरे

भारतातील पाचव्या क्रमांकाचे खोरे

 

८७,९०० (.६७%)

गोदावरी खोरे ७ राज्यातून पसरलेले आहे : 

१) महाराष्ट्र : १,५२,१९९ चौकिमी: 

२) व ३) आंध्र प्रदेश व तेलंगणा : ७३.२०१ चौकिमी; 

४) छत्तीसगढ़ : ३३,४३४ चौकिमी; 

५) मध्य प्रदेश : ३१.८२१ चौकिमी;

६) ओडिशा : १७,७५२ चौकिमी; 

७) कर्नाटक : ४,४०६ चौकिमी.

  • काली नदी भारतात 'शारदा नदी' या नावे ओळखली जाते.
  • मही, चंबळ, बेटवा या नद्या माळवा पठारात उगम पावतात. 
  • 'शोण-नर्मदा' ही मध्यवर्ती उच्चभूमी व दख्खनचे पठार यांच्यातील प्राकृतिक सीमारेषा आहे. 
  • विंध्याचल-बाघेलखंड हा टोन्स, शोण व त्यांच्या उपनद्यांचा प्रदेश आहे.

भारत : प्रमुख नद्या व त्या ज्या राज्यांमधून वाहतात त्यांची संख्या

१) गंगा (आंतरराष्ट्रीय) : उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ही ५ राज्ये व बांगलादेशातून 

२) ब्रह्मपूत्रा (आंतरराष्ट्रीय) : अरुणाचल प्रदेश, आसाम ही भारतातील दोन राज्ये व बांगला देश, चीन. 

३) सिंधू (आंतरराष्ट्रीय नदी) : भारतातील जम्मू-काश्मीर या एकमेव राज्यातून व पाकिस्तान, चीन. 

४) नर्मदा : मध्य प्रदेश, महाराष्ट्र व गुजरात (३ राज्ये) 

५) तापी : मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात (३ राज्ये) 

६) गोदावरी : महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश (३ राज्ये) व येनाम (पुदुच्चेरी) या केंद्रशासित प्रदेशातून 

७) कृष्णा : महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश (४ राज्ये)

८) कावेरी : कर्नाटक, तामिळनाडू, (२ राज्ये) 

९) महानदी : छत्तीसगढ, ओडिशा (२ राज्ये)

१०) मही : मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात (३ राज्ये) 

११) साबरमती : राजस्थान, गुजरात (२ राज्ये)

१२) चंबळ : मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश (३ राज्ये)

भारतातील प्रमुख नद्या व त्यांच्या काठावर वसलेली शहरे

१) गंगा : हरिद्वार, कानपूर, पाटणा,मिर्झापूर, बनारस, भागलपूर, बक्सार

२) महानदी : कटक, सबळपूर  

३) नर्मदा : जबलपूर, देवास, राजपिपला

४) यमुना : दिल्ली, आग्रा, मथुरा

५) चंबळ : कोटा

६) ब्रह्मपुत्रा : दिब्रुगड, गुवाहाटी, गोलापारा

७) शरयू (घाग्रा) : अयोध्या

८) कृष्णा : विजयवाडा, सांगली

९) गोमती : लखनौ

१०) साबरमती : अहमदाबाद

११) मुशी :हैदराबाद 

१२) तापी : सुरत, भुसावळ

१३) गोदावरी : नाशिक, पैठण, कोपरगाव 

१४) कावेरी : श्रीरंगपट्टणम्, तिरुचिरापल्ली 

१५) सतलज : फिरोजपूर, लुधियाना 

१६) हुगळी : कोलकाता, हावडा

१७) झेलम : श्रीनगर

१८) पेरियार : अलवाए 

१९) सुवर्णरेखा : जमशेदपूर 

२०) क्षिप्रा : उज्जैन 

२१) गंगा, यमुना, सरस्वती (त्रिवेणी संगम) : अलाहाबाद 

भारत : प्रमुख सरोवरे

खाऱ्या पाण्याची सरोवरे

राज्य

गोड्या पाण्याची सरोवरे

राज्य

चिल्का (सर्वात मोठे)

ओडिशा

वुलर (सर्वांत मोठे)

बंदिपोरा (जम्मू-काश्मीर)

पुलिकत

आंध्र-तामिळनाडू सीमा

दाल

श्रीनगर (जम्मू-काश्मीर)

सांभर (क्षारता सर्वाधिक) -

राजस्थान

कोलेरू

आंध्र प्रदेश

लोणार

महाराष्ट्र

नगिन सरोवर

श्रीनगर (जम्मू-काश्मीर)

वेंबनाड (कायल)

केरळ

अंचर सरोवर

श्रीनगर (जम्मू-काश्मीर)


Post a Comment

0 Comments