ब्रिटिश भारतातील प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर्स part 2
भारतातील प्रमुख गव्हर्नर्स |
लॉर्ड वेलस्ली व तैनाती फौज (१७९८-१८०५) : स्वत:ला 'बंगालचा सिंह' समजणाऱ्या वेलस्लीच्या काळातील प्रमुख घडामोडी खालीलप्रमाणे : तैनाती फौजेची योजना : वेलस्लिने १७९८ मध्ये सर्वप्रथम निजामावर 'तैनाती फौजेचा' अवलंब केला. त्यानुसार निजामाने तैनाती फौज स्वीकारून तिचा खर्च द्यावा असे ठरले व निजामाचे परराष्ट्र धोण मात्र इंग्रज ठरवू लागले. अशाचप्रकारे टिपू सुलतान (१७९९), अयोध्येचा नवाब (१८०१), मराठे (१८०२) यांच्यावरही तैनाती फौजेची सक्ती करण्यात आली. इंग्रज-मराठा दुसरे युध्द (१८०२-१८०४). वसईचा तह (३१ डिसेंबर १८०२) : या तहानुसार मराठी साम्राज्याचा अस्त झाला. वेलस्लीनंतर १८०५ मध्ये कॉर्नवॉलीस पुन्हा गव्हर्नर जनरलपदी आला. परंतू कॉलऱ्याच्या साथीने गाझियाबाद येथे त्याचा मृत्यू झाला.
लॉर्ड हेस्टिंग्ज (मार्वेस ऑफ हेस्टिंग्ज १८१३-१८२३) : याच्या काळातील प्रमुख घडामोडी -
- इंग्रज-नेपाळ युध्द (१८१६); नेपाळचा पराभव.
- पेंढाऱ्यांचा यशस्वी बंदोबस्त केला.
- तिसरे व शेवटचे इंग्रज - मराठा युध्द (१८१७-१८) : मराठा साम्राज्याचा अस्त.
- १८२२ मध्ये कुळांना संरक्षण देणारा 'बंगाल कुळकायदा' संमत केला.
लॉर्ड विल्यम बेंटिक (१८२८-१८३५) : सती प्रतिबंधक कायदा (१८२९) - राजा राममोहन रॉय यांचे सहकार्य. म्हैसूरचा कारभार हाती घेऊन कूर्ग हे राज्य खालसा केले. लॉर्ड मेकॉलेचा शिक्षणाचा झिरपता सिध्दांत (१८३५) राबविला.
चार्ल्स मेटकॉफ : (१८३५) (वृत्तपत्रांचा मुक्तिदाता) : याची प्रमुख सुधारणा म्हणजे वृत्तपत्रांचा कायदा (१८३५), यानुसार वृत्तपत्रांवरील बंधने उठविली.
लॉर्ड ऑकलंड (१८३६-४२) : पहिले अफगाण युध्द (१८३९-४१), इंग्रजांचा पराभव.
लॉर्ड एलेनबरो (१८४२-४४) : अफगाणचा पराभव आणि सिंध प्रांतावर ताबा.
लॉर्ड हार्डिंग्ज पहिला (१८४४-४८) : पहिले इंग्रज - शीख युध्द सरकारी कार्यालयांना रविवारी सुट्टी देण्याची प्रथा सुरू.
लॉर्ड डलहौसी (१८४८-५६) : संस्थाने खालसा धोरण : राज्यकारभारातील अकार्यक्षमता व दत्तक वारस नामंजूर अशी कारणे दाखवून डलहौसीने अनेक संस्थाने खालसा केली. इथेच खऱ्या अर्थाने १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्याची ठिणगी चिथवली गेली.
डलहौसीच्या काळातील प्रमुख घडामोडी खालीलप्रमाणे -
- मार्च १८४९ : दुसरे इंग्रज-शीख युध्द. शीखांचा पराभव करून डलहौसीने पंजाब खालसा केले.
- १८५२ : दक्षिण ब्रम्हदेश इंग्रजी राज्यास जोडला.
- 'दत्तक वारस नामंजुर' तत्त्वानुसार डलहौसीने खालील राज्ये खालसा केली. सातारा, जैतपूर-संभलपूर, नागपूर, झाशी, उदयपूर, तंजावर, कर्नाटक, अयोध्या इत्यादी.
- तैनाती फौजेची वसुली बाकी असल्याचे कारण दाखवून निजामाचे व-हाड खालसा केले (१८५३).
- कर्नाटकाच्या नबाबाच्या मृत्यूनंतर त्याचे राज्य खालसा केले (१८५३).
- तंजावरची जहागिरी जप्त केली (१८५५). अयोध्या खालसा (१८५६).
- रेल्वे, पोस्ट, तारायंत्रणांची सुरूवात.
- १८५६ चा विंधवा पुनर्विवाह कायदा संमत.
0 Comments