१९०५ नंतरचे भारतातील प्रमुख व्हाईसरॉय व त्यांची कारकीर्द
भारतातील प्रमुख व्हाईसरॉय |
लॉर्ड मिंटो (१९०५ - १९१०):
- १९०६ : मुस्लीम लीगची स्थापना.
- १९०९ : मोर्ले-मिंटो सुधारणा कायदा
लॉर्ड हार्डिंग्ज दुसरा (१९१०-१९१६) :
- १९११ : भारताची राजधानी कोलकाताहून दिल्लीला हलविली.
- १९११ : ब्रिटीश सम्राट पंचम जॉर्ज यांची भारत भेट : दिल्ली दरबार. याच दिल्ली दरबारात पंचम जॉर्ज यांनी बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा केली.
लॉर्ड चेम्सफोर्ड (१९१६-१९२१) :
- १९१९ : रौलेट कायदा संमत.
- १३ एप्रिल १९१९ : रौलेट कायद्याच्या निषेधार्थ अमृतसरमधील जालियनवाला बागेत भरलेल्या सभेवर
- डायरचा गोळीबाराचा आदेश (जालियनवाला बाग हत्याकांड)
- १९१९ : माँटेग्यू-चेम्सफोर्ड सुधारणा कायदा संमतः
- १९२० : गांधीजींची असहकार चळवळ.
लॉर्ड रिडींग (१९२१-१९२६) :
- ५ फेब्रुवारी १९२२ : चौरी-चौरा हत्याकांडामुळे गांधीजींची असहकार चळवळ स्थगित.
- प्रिन्स ऑफ वेल्सची.भारत भेट . १९२३ : स्वराज्य पक्षाची स्थापना.
- १९२५ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना (नागपूर)
लॉर्ड आयर्विन (१९२६-१९३१):
- १९२७ : सायमन कमिशनची स्थापना.
- १९२८ : सायमन कमिशनच्या निषेधार्थ काढलेल्या मोर्ध्यात लाहोर येथे लाला लजपतराय यांचा लाठीहल्ल्यात मृत्यू.
- ऑगस्ट १९२८ : नेहरू रिपोर्ट (पंडित मोतीलाल नेहरू)
- १९२८ : नेहरू रिपोर्टच्या विरोधात बॅ. जिनांचे प्रसिध्द १४ मुद्दे.
- १९२९ : संपूर्ण स्वराज्याची मागणी.
- १९३० : लंडन येथे पहिली गोलमेज परिषद.
- ५ मार्च १९३१ : गांधी-आयर्विन करार.
लॉर्ड विलिंग्डन (१९३१-१९३६) :
- १९३१ ची दुसरी व १९३२ ची तिसरी गोलमेज परिषद (लंडन).
- १६ ऑगस्ट १९३२ : रॅम्से मॅक्डोनाल्डचा जातीय निवाडा; त्यानुसार अस्पृश्यांसाठी वेगळ्या मतदार संघांची घोषणा.
- १९३२ : महात्मा गांधींचे येरवडा कारागृहात उपोषण सुरू.
- २४ सप्टेंबर १९३२ : गांधी-आंबेडकर यांच्यात पुणे करार/ऐक्य करार (या करारावर गांधींच्या वतीने पं. मदनमोहन मालविय यांनी सही केली.)
- १९३५ : भारत सरकारचा १९३५ चा सुधारणा कायदा संमत.
- १९३५ : ब्रह्मदेश भारतापासन वेगळा
लॉर्ड लिनलिथगो (१९३६-१९४४):
- १९३७ : भारतात प्रांतिक निवडणुका; ८ प्रांतांत काँग्रेसची सरकारे.
- १ सप्टे. १९३९ : दुसऱ्या महायुध्दाची सुरूवात
- ऑक्टो. १९३९ : प्रांतिक मंत्रीमंडळांचे राजीनामे.
- ८ ऑगस्ट १९४२ : 'चले जाव' ठराव संमत.
लॉर्ड वेव्हेल (१९४४ ते मार्च १९४७):
- १९४५ : सिमला परिषदेत वेव्हेल योजना मांडली. भारतीयांनी ती नाकारली.
- १९४५ : इंग्लंडमध्ये मजूर पक्ष सत्तेवर लॉर्ड ॲटली पंतप्रधानपदी. १९४६ : त्रिमंत्री योजना (कॅबिनेट मिशन).
- २ सप्टें. १९४६ : पं. नेहरूंच्या अध्यक्षतेखाली हंगामी सरकारची स्थापना.
- ९ डिसेंबर १९४६ : घटना परिषदेचे पहिले अधिवेशन दिल्लीत सुरू.
लॉर्ड माऊंटनबॅटन (१९४७ : स्वातंत्र्यपूर्व कारकीर्द):
- ३ जून १९४७ : माऊंटबॅटन योजना घोषित; त्यानुसार भारत आणि पाकिस्तान ही दोन नवीन राष्ट्र निर्माण.
- १८ जुलै १९४७ : भारतीय स्वातंत्र्याचा कायदा संमत.
- १५ ऑगस्ट १९४७ : सुमारे दीडशे वर्षांच्या गुलामीच्या शृंखलांतून भारत स्वतंत्र.
- लॉर्ड माऊंटबॅटन हे ब्रिटीशकालीन भारताचे शेवटचे व्हॉईसराय तर स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल ठरले.
0 Comments