फ्रेंच व पोर्तुगीज वसाहतींचे विलिनीकरण | गोवामुक्ती संग्राम | ऑपरेशन विजय

फ्रेंच-पोर्तुगीज विलिनीकरण
फ्रेंच-पोर्तुगीज विलिनीकरण 


 फ्रेंच व पोर्तुगीज वसाहतींचे विलिनीकरण 

  • भारतात फ्रेंचांची सत्ता चांद्रनगर, पुदुच्चेरी, कारिकल, माहे, येनम येथे होती. 
  • १९४९-५० मध्ये चांद्रनगर या वसाहतीत सार्वमत घेण्यात आले. इतरही वसाहती अशाच प्रकारे भारतात सामील झाल्या व भारतातील फ्रेंच सत्तेचा शेवट झाला.

गोवामुक्ती संग्राम (ऑपरेशन विजय) 

  • १९२८ मध्ये डॉ. टी. बी. कुन्हा यांच्या अध्यक्षतेखाली गोवा काँग्रेस कमिटीची स्थापना झाली. 
  • १९४५ मध्ये डॉ. कुन्हा यांनी 'गोवा युथ लीग' ही संस्था मुंबईत स्थापन केली. 
  • १९४६ मध्ये डॉ. कुन्हा यांनी गोव्यात भाषणबंदीचा हुकुम मोडल्याबद्दल त्यांना आठ वर्षाच्या तुरूंगवासाची शिक्षा झाली. जून १९४६ मध्ये डॉ. राममनोहर लोहियाना गोव्यातून हद्दपार करण्यात आले. 
  • १९४८ : मोहन रानडे (मूळ नाव : मनोहर आपटे) यांनी गोव्यातील पोर्तुगिजांविरूध्द सशस्त्र लढा दिला. रानडेंना १९६० पर्यंत गोव्यात व त्यानंतर १२ वर्षे पोर्तुगालमधील तरूंगात ठेवले गेले. 
  • २१ जुलै १९५४ : गोवा मुक्ती आघाडीच्या स्वयंसेवकांनी दादरा परिसर पोर्तुगिजांच्या बंधनातून मुक्त केला (चळवळीचे नेते : फ्रान्सिस मस्का-हेन्हास, वामन सरदेसाई) 
  • २८ जुलै १९५४ : आझाद गोमंतक दल व गोवन्स पीपल्स पार्टी (नेते जॉर्ज वाझ, केशव तळवलीकर) यांनी स्थानिक वारली नागरिकांच्या सहाय्याने नगरहवेलीवर हल्ला चढविला व नगरहवेली स्वतंत्र केले. 
  • २ ऑगस्ट १९५४ : विश्वनाथ लवांदे, राजाभाऊ वाकणकर, सुधीर फडके, काजरेकर, ना. ग. गोरे, सेनापती बापट, पीटर अल्वारिस, सौ. सुधाताई जोशी इत्यादींनी गोव्यात सत्याग्रह केला. 
  • १९५५ मधील गोवा मुक्ती सत्याग्रहात अनेकांनी हौतात्म्य पत्करले, यामध्ये हिरवे गुरूजी, कर्नालसिंग, कमला उपासनी, प्रभा साठे, शांता राव यांचा समावेश होता.
  • डिसेंबर १९६१ मध्ये भारत सरकारने 'ऑपरेशन विजय' मोहिमेंतर्गत गोव्यात लष्कर घुसविले. 
  • १९ डिसेंबर १९६१ रोजी गोवा पोर्तुगीजांच्या जोखडातून पूर्णपणे मुक्त झाला व त्याचे भारतात विलीनीकरण करण्यात येऊन त्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला. 
  • २० डिसेंबर १९६३ रोजी दयानंद बांदोडकर यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात पहिले लोकनियुक्त सरकार स्थापन झाले. 
  • 'गोवा, दमण-दीव' केंद्रशासित प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री : दयानंद बांदोडकर (१९६३ ते १९७२)
  • स्वतंत्र गोवा राज्याचे पहिले मुख्यमंत्री : प्रतापसिंह राणे (१९८७ ते १९८९)   


Post a Comment

0 Comments