महाराष्ट्रातील समाजसुधारक व धार्मिक सुधारणा चळवळी | डॉ. भाऊ दाजी लाड | विष्णुबुवा ब्रह्मचारी

महाराष्ट्रातील समाजसुधारक व धार्मिक सुधारणा चळवळी

डॉ. भाऊ दाजी लाड
डॉ. भाऊ दाजी लाड


 डॉ. भाऊ दाजी लाड (१८२४ ते १८७४) 

जन्म : ७ सप्टेंबर १८२४; मांजरी (मांजरे-गोवा) येथे. 

मूळ नाव : रामचंद्र विठ्ठल लाड 

  • विज्ञानशाखेत पदवी घेऊन एलफिन्स्टन संस्थेत विज्ञानाचे शिक्षक म्हणून नोकरी.
  • १८४५ मध्ये मुंबईत ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना. या कॉलेजात प्रवेश घेऊन १८५१ साली भाऊ दाजी 'डॉक्टर' बनले (GGMC ही वैद्यकीय पदवी). 
  • कुष्ठरोगावर त्यांनी गुणकारी औषध शोधल्यामुळे त्यांना 'धन्वंतरी' असे म्हटले जाते. 
  • १८४८ मध्ये ज्ञानप्रसारक सभेचे अध्यक्ष बनल्यानंतर या संस्थेमार्फत भाऊंनी शिक्षण प्रसार व सामाजिक जागृतीसाठी प्रयत्न करताना त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केली. 
  • १८५२ मध्ये जगन्नाथ शंकरसेठ यांच्या सहकार्याने 'बॉम्बे असोसिएशन' ही भारतातील पहिली राजकीय संघटना स्थापन
  • १८५५ मध्ये व्यापार व उद्योगावर कर बसविणाऱ्या 'लायसेन्स बिलास' भाऊंनी विरोध केला.
  • इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात भाऊंचे कार्य मोलाचे आहे. 
  • गिरनार पर्वतावरील रुद्रदामनाच्या शिलालेखावरून रुद्रदामन हा चेस्टनचा नातू होता हे त्यांनी सिद्ध केले. लग्नमुंजीत कलावंतीणींचा नाच करण्याच्या प्रथेस भाऊंनी विरोध केला. 

निधन : ३१ मे १८७४. 

  • डॉ. भाऊ दाजी हे सनदशीर राजकीय चळवळीचे प्रवर्तक होते. तसेच ते स्वातंत्र्याचे आद्य द्रष्टे होते. डॉ. भाऊ दाजी यांचे वाङ्मय ‘द लिटररी रिमेन्स ऑफ भाऊ दाजी' या नावे प्रकाशित करण्यात आले आहे.

विष्णुबुवा ब्रह्मचारी (१८२५ ते १८७१) 

जन्म : १८२५, रायगड (कुलाबा) जिल्ह्यातील शिरवली येथे. 

मूळ नाव : विष्णु भिकाजी गोखले. 

  • ज्यावेळी ख्रिस्ती धर्मोपदेशकांनी वैदिक धर्माविरोधी प्रचार सुरू केला, त्या काळात विष्णुबुवांनी मुंबईत जाहीर व्याख्यानातून वैदिक धर्मावरील आक्षेपांचे खंडन केले. 'वर्तमानदीपिका' या वृत्तपत्रामधून विष्णुबुवांनी वैदिक धर्मावरील टीकेला चोख प्रत्युत्तर दिले. 

विष्णुबुवांचे साहित्य : भावार्थ सिंधू, वेदोक्त धर्मप्रकाश, सुखदायक राज्यप्रकरणी निबंध, सहजस्थितीचा निबंध, बोधसागर रहस्य, सेतुबंधानी टीका. 

निधन : १८ फेब्रुवारी १८७१.



Post a Comment

0 Comments