महाराष्ट्रातील समाजसुधारक व धार्मिक सुधारणा चळवळी | महात्मा जोतिबा फुले | सावित्रीबाई फुले

महाराष्ट्रातील समाजसुधारक व धार्मिक सुधारणा चळवळी 

सावित्रीबाई फुले
सावित्रीबाई फुले


महात्मा जोतिबा फुले (१८२७ ते १८९०) 

  • हिंदू समाजातील बहुजन समाजात आत्मप्रत्यय व आत्मावलोकन उत्पन्न करणारा पहिला माणूस म्हणजे महात्मा फुले.

जन्म : ११ एप्रिल १८२७, पुणे. 

मूळ गाव : कटगुण (जि. सातारा) 

मुळ आडनाव : गोऱ्हे 

  • जोतिबा क्षत्रिय माळी समाजातील होते. 
  • जोतिबांचे पूर्वज पुणे येथे फुलांचा व्यवसाय करत, त्यामुळे गोऱ्हे आडनाव मागे पडून ते फुले बनले. जोतिबांचे आजोबा : शेरीबा ; पिता : गोविंदराव, माता : चिमणाबाई (जोतिबा १ वर्षाचे असताना मातोश्रींचे निधन)
  • १८४० : वयाच्या १३ व्या वर्षी धनकवडीच्या खंडोजी नेवसे पाटील यांची कन्या सावित्रीबाईंशी विवाह. 
  • १८४१ : उर्दू शिक्षक गफार बेग मुन्शी व धर्मोपदेशक लिजिट साहेब यांच्या प्रयत्नाने जोतिबांच्या शिक्षणास पुन्हा सुरुवात. (पुण्यात स्कॉटिश मिशनरी शाळेत प्रवेश)

महात्मा फुले यांचे महिला उद्धाराचे कार्य : 

अ) स्त्री शिक्षण : जोतिबांनी समाजकार्यास सुरुवात करताना सर्वप्रथम स्त्रीशिक्षणास प्राधान्य दिले. 
  • १८४८ : पुण्यात बुधवार पेठेतील भिड्यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरूं 
  • ३ जुलै १८५१ : बुधवार पेठेतील चिपळूणकरांच्या वाड्यात मुलींची दुसरी शाळा सुरू. 
  • १७ सप्टेंबर १८५१ : रास्ता पेठेत मुलींची तिसरी शाळा सुरू. 
  • १५ मार्च १८५२ : वेताळ पेठेत मुलींची आप्पखी एक शाळा सुरू. 
  • १६ नोव्हेंबर १८५२ : जोतिबांच्या शिक्षण कार्याची दखल घेऊन इंग्रज सरकारने पुण्यातील विश्रामबाग येथे मेजर कॅन्डीच्या हस्ते त्यांचा सत्कार केला. 

ब) विधवा पुनर्विवाह : १८६४ : पुण्यातील गोखल्यांच्या बागेत फुल्यांनी पहिला पुनर्विवाह घडवून आणला. 
१८६५ : विधवांच्या केशवपन बंदीसाठी प्रयत्न करताना तळेगाव-ढमढेरे येथे नाभिक बांधवांचा संप घडवून आणला. 

क) बाल हत्याप्रतिबंधक गृहाची स्थापना, १८६३ : चुकून वाकडे पाऊल पडलेल्या विधवांची आपत्तीतून सुटका करण्यासाठी जोतिबांनी स्वतःच्या घरी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. जोतिबांना अपत्य नव्हते. काशिबाई या विधवेच्या यशवंत या मुलास त्यांनी दत्तक घेतले.

महात्मा फुले यांचे अस्पृश्यतानिर्मूलन कार्य : 

  • १९ व्या शतकात भारतात अस्पृश्यता निर्मुलन आंदोलनाची पायाभरणी महात्मा ज्योतिराव फुले यांनी सर्वप्रथम केली. 
  • महात्मा फुले यांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी संपूर्ण समाज व्यवस्थेची पुनर्रचना करणे आवश्यक आहे हा विचार सर्वप्रथम मांडला. 
  • १८५१ : अस्पृश्यांच्या मुलांसाठी नाना पेठेत पहिली शाळा सुरू, ती बंद पडली. 
  • १८५२ : अस्पृश्यांच्या मुलांसाठी वेताळ पेठेत शाळा सुरू केली. 
  • १८५३ : पुण्यात 'महार, मांग इत्यादी अस्पृश्य लोकांस विद्या शिकविणारी मंडळी' ही संस्था स्थापन केली. 
  • १८५८ : अस्पृश्यांच्या मुलांसाठी तिसरी शाळा सुरू. 
  • महात्मा फुले यांच्या शैक्षणिक कार्यास दक्षिणा प्राइझ फंडातून आर्थिक सहाय्य मिळाले. 
  • १८६८ : स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला. 
  • १८७३ : म. फुले यांनी अस्पृश्यता निवारणाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. 
  • १८७७ मध्ये 'दीनबंधू' या वृत्तपत्रातून सामाजिक रुढी-परंपरा तसेच अस्पृश्यांच्या परिवर्तनाचे विचार मांडले.

सावित्रीबाई फुले (१८३१ ते १८९७)

जन्म : ३ जानेवारी १८३१, नायगाव (ता. खंडाळा, जि. सातारा) येथे. 

  • महात्मा फुलेंनी पुण्यात मुलींसाठी सुरू केलेल्या शाळेत सावित्रीबाईंनी शिक्षिका म्हणून कार्य केले. त्या महाराष्ट्रातील तसेच भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका तसेच पहिल्या मुख्याध्यापिका होत. 'काव्यफुले', 'बावन्नकशी', 'सुबोध रत्नाकर' या काव्यसंग्रहातून सावित्रीबाईंनी समाज प्रबोधनाचे विचार मांडले. महात्मा फुले यांच्या निधनानंतर त्यांनी सत्यशोधक समाजाची धुरा समर्थपणे सांभाळली, विधवा पुनर्विवाह घडवून आणणारी संस्था स्थापन केली. हळदी-कुंकू, चहापान असे कार्यक्रम घेऊन स्त्रियांना एकत्रित केले.

निधन : १० मार्च १८९७ रोजी प्लेगच्या रुग्णांची सुश्रुषा करताना प्लेगची बाधा होऊन या क्रांतिज्योतीचे निधन. सावित्रीबाई फुले यांनी अज्ञानाच्या अंध:कारात खितपत पडलेल्या स्त्री-शुद्रांना ज्ञानाचा प्रकाश दाखविला. महाराष्ट्रातील स्त्री मुक्ती आंदोलनाची पहिली अग्रणी म्हणून सावित्रीबाईंचा गौरव केला जातो.






Post a Comment

0 Comments