१८५७ नंतरचे भारतातील व्हाईसरॉय Part 3 | लॉर्ड कर्झन | भारतीय चलन कायदा | बंगाल फाळणी

 
लॉर्ड कर्झन
लॉर्ड कर्झन

१८५७ नंतरचे भारतातील व्हाईसरॉय Part 3

११) लॉर्ड कर्झन (१८९९-१९०५) : 

  • १८९९ : भारतीय चलन कायदा संमत, भारतासाठी सुवर्ण परिमाणाचा स्वीकार. 
  • १९०० : ‘कोलकाता महापालिका विधेयक' मंजूर करून स्थानिक स्वराज्य संस्थांवर नियंत्रणे लादली. 
  • १९०० : लॉर्ड मॅक्डोनलच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ आयोग नेमला. 
  • १९०१ : शेतकऱ्यांची पिळवणूक रोखण्यासाठी 'पंजाब लँड एलीनेशन' कायदा संमत. सर्वाधिक रेल्वेमार्गांची निर्मिती. 
  • १९०१ : सिमला येथे शिक्षणपरिषद. 
  • १९०१ : वायव्य सरहद्द प्रांताची निर्मिती. 
  • १९०१ : रॉयल नेव्हीची स्थापना. 
  • १९०१ : संस्थानिकांच्या मुलांना लष्करी शिक्षणासाठी 'इंपिरिअल कॅडेट कोअर' ची स्थापना. 
  • १९०१ : राणी व्हिक्टोरियाच्या स्मृतिप्रित्यर्थ कोलकाता येथे 'व्हिक्टोरिया मेमोरिअल हॉल' स्मारक उभारले. 
  • १९०१ : ब्रिटिश वैभवाचे प्रदर्शन करण्यासाठी दिल्ली दरबार भरवला. 
  • १९०१ : भारतीय रेल्वेची स्थिती अभ्यासण्यासाठी कर्झन याने 'थॉमस रॉबर्टसन' आयोगाची नियुक्ती केली. या आयोगाच्या शिफारशींनुसार १९०५ मध्ये भारतात रेल्वे बोर्डाची' स्थापना. (रचना : अध्यक्ष + १ सेक्रेटरी + २ सदस्य) 
  • १९०२ : अॅण्ड्यू फ्रेझर याच्या अध्यक्षतेखाली पोलिस सेवेतील दोष शोधण्यासाठी समिती नेमली. 
  • १९०४ : विद्यापीठ कायदा संमत करून उच्च शिक्षणपध्दतीवर निर्बंध आणले. 
  • १९०४ : भारतातील पहिला सहकारी पतपेढी विषयक कायदा संमत केला. 
  • १९०४ : भारतातील 'प्राचीन स्मारकांचा संरक्षण कायदा' संमत केला. 
  • १९ जूलै १९०५ : बंगालच्या अन्याय्य फाळणीची अधिसूचना. 
  • फाळणीची मूळ कल्पना : सर विल्यम वॉर्ड (१८९६) 
  • फाळणीस विरोध : सर हेनरी कॉटन (१८९६)  
  • फाळणीविरोधी स्वदेशी चळवळीस प्रारंभ : १७ ऑगस्ट १९०५. 
  • १६ ऑक्टोबर १९०५ : बंगालच्या फाळणीची अधिकृत घोषणा. 
  • लष्करी अधिकाऱ्यांसाठी क्वेट्टा येथे प्रशिक्षण केंद्र उभारले. 
  • लष्करी सेनापती किचनेरशी वाद व त्यावरून राजीनामा. 
  • लो. टिळकांनी कर्झनची तुलना औरंजेबाशी केली.


Post a Comment

0 Comments