महाराष्ट्रातील समाजसुधारक व धार्मिक सुधारणा चळवळी | दादोबा पांडुरंग तर्खडकर | भाऊ महाजन

महाराष्ट्रातील समाजसुधारक व धार्मिक सुधारणा चळवळी

महाराष्ट्रातील समाजसुधारक
महाराष्ट्रातील समाजसुधारक


दादोबा पांडुरंग तर्खडकर (१८१४ ते १८८२) 

  • दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी सामाजिक व धार्मिक सुधारणांचा पुरस्कार केला. आधुनिक ज्ञान व विज्ञानाशिवाय समाजाची प्रगती होणे शक्य नाही, हे तत्त्व त्यांनी समाजाला पटवून दिले. 

जन्म : ९ मे १८१४, मुंबई येथे. 

  • शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही काळ जावरा संस्थानच्या नबाबाचे शिक्षक. त्यानंतर सुरत येथे एल्फिन्स्टन संस्थेत शिक्षकाची नोकरी. 
  • १८४६ : ट्रेनिंग कॉलेजच्या संचालकपदी नियुक्ती. 
  • १८५२ मध्ये अहमदनगर येथे डेप्युटी कलेक्टर म्हणून कार्य करताना भिल्लांच्या बंडाचा यशस्वी बीमोड कला. 
  • निवृत्तीनंतर बडोदा संस्थानात दुभाषी म्हणून कार्य केले. 
  • दादोबांच्या कार्याची दखल घेऊन ब्रिटिश सरकारने त्यांना 'रावबहादूर' ही पदवी दिली. 

दादोबा पांडुरंग यांच्या सामाजिक व धार्मिक सुधारणा : 

मानवधर्म सभा, १८४४ : दुर्गाराम मंछाराम, दिनमणी शंकर दलपतराय यांच्या सहकार्याने दादोबांनी समाजातील दोष व उणीवा दूर करण्यासाठी सुरत येथे ही संस्था स्थापन केली. कार्यकर्त्यांच्या अभावामुळे ही संस्था लवकरच बंद झाली. 

परमहंस सभा, १८४९ : मुंबई येथे स्थापना. (भिकोबा चव्हाण, राम बाळकृष्ण जयकर याचे सहकार्य.) परमहंस सभेचे कार्य गुप्तपणे चाले. या सभेच्या स्थापनेमुळेच पुढे प्रार्थना समाजाच्या स्थापनेस गती मिळाला. 

दादोबा पांडुरंगांची ग्रंथसंपदा : मराठी भाषेचे व्याकरण, विद्येच्या लाभाविषयी, पारमहांसिक ब्राह्मधर्म, धर्मविवेचन, यशोदा पांडुरंग (मोरोपंतांच्या 'केकावली'वर टीका) मराठी भाषेचे व्याकरणकार व गाढे विद्वान असलेले दादोबा 'मराठी भाषेचे पाणिनी' (मराठी व्याकरणाचे पाणिनी) म्हणून ओळखले जातात. 

निधन : १७ ऑक्टोबर १८८२

भाऊ महाजन (१८१५ ते १८९०) 

जन्म : १८१५, कुलाबा जिल्ह्यातील पेण येथे. 
पूर्णनाव : गोविंद विठ्ठल कुंटे. 
  • भाऊ महाजन हे आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचे वर्गमित्र होते. 
  • जांभेकरांच्या 'दर्पण' व 'दिग्दर्शन'मध्ये ते प्रथम लेखन करीत असत. 

भाऊ महाजनांचे कार्य : 'प्रभाकर' हे साप्ताहिक. 'धूमकेतू' व 'ज्ञानदर्शन' या नियतकालिकांचे संपादक.

Post a Comment

0 Comments