ब्रिटिशांचे भारतात आगमन | ब्रिटिश सत्तेचा भारतातील विकास | ईस्ट इंडिया कंपनी | तीन कर्नाटक युध्दे १७४६-१७६३

ब्रिटिशांचे भारतात आगमन व ब्रिटिश सत्तेचा भारतातील विकास 

ईस्ट इंडिया कंपनी

ईस्ट इंडिया कंपनी


ईस्ट इंडिया कंपनी : 

  • पोर्तुगिजांची भारतातील प्रगती पाहून भारतात व्यापाराच्या उद्देश्याने लंडनमधील व्यापाऱ्यांच्या एका गटाने ३१ डिसेंबर १६०० रोजी इस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. एलिझाबेथ राणीने सुरूवातीस १५ वर्षांसाठी या कंपनीस पूर्वेकडील देशांशी व्यापाराची सनद दिली.  
  • १६०९ मध्ये राजा जेम्स पहिला याने कंपनीला कायमस्वरूपी सनद दिली. इ. स. १६१५ साली इंग्रज वकील सर थॉमस रो याने जहांगीर बादशहाकडून प्रथम व्यापारी सवलती मिळविल्या. 

इंग्रज-फ्रेंच संघर्ष (तीन कर्नाटक युध्दे १७४६-१७६३) : १६५० साली स्पेनने पोर्तुगालचा तर १६५४ मध्ये इंग्लंडने हॉलंडचा पराभव केला. परिणामी भारतातील पोर्तुगिज व डचांच्या (हॉलंड) व्यापारावर मर्यादा येऊन फ्रेंच हेच इंग्रजांचे एकमात्र प्रतिस्पर्धी भारतात उरले. 

पहिले कर्नाटक युद्ध (१७४६ ते १७४८) : पूर्व किनाऱ्यावरील मद्रास (आताचे चेन्नई) हे इंग्रजी सत्तेचे प्रमुख केंद्र होते. तर त्यानजिकच्या पाँडेचरी (आताचे पुदुच्चेरी) येथे फ्रेंचांची सत्ता होती. युरोपात इंग्लंड-फ्रान्स यांच्यात नेहमीच सत्ता संघर्ष चालत. त्याचे पडसाद भारतात उमटत. यातूनच इंग्रज-फ्रेंच यांच्यात १७४६-४८ या काळात पहिले युध्द होऊन फ्रेंचांनी मद्रास जिंकले व तहानंतर ते इंग्रजांना परत केले.

दुसरे कर्नाटक युद्ध (१७४८ ते १७५४) : १७४८ ते १७५४ या काळात हैद्राबाद व अर्काट (कर्नाटक) येथील नबाबांच्या झगड्यात फ्रेंचांनी डुप्ले व बुसी या अधिकाऱ्यांमार्फत हस्तक्षेप केला. मात्र इंग्रजांनी त्यांच्या गव्हर्नर सॅण्डर्स व क्लाईव्ह या अधिकाऱ्यांच्या पराक्रमाच्या जोरावर अर्काट फ्रेंचांकडून जिंकून घेतले.

वाँदिवॉशची लढाई (तिसरे कर्नाटक युद्ध - १७६०) : १७५६ मध्ये युरोपात इंग्लंड-फ्रान्स यांच्यात सुरू झालेल्या सप्त-वार्षिक युध्दाचे पडसाद भारतात उमटले व भारतात झालेल्या २२ जानेवारी १७६० च्या वांदिवॉशच्या लढाईत (तिसरे कर्नाटक युध्द) इंग्रजांनी फ्रेंचांना पूर्णतः पराभूत केले व त्यांची पुदुच्चेरी, जिंजी आदी सर्व ठिकाणे जिंकली. १७६३ च्या पॅरिसच्या तहानुसार इंग्रजांनी फ्रेंचांना पुदुच्चेरी परत केला व फ्रेंच सत्ता एवढ्यापुरतीच सिमित राहीली. त्यानंतर इंग्रजांनी आपले लक्ष बंगालकडे वळविले व येथूनच खऱ्या अर्थाने त्यांचा भारतीय राज्यकर्त्यांशी संघर्ष सुरू झाला.

Post a Comment

0 Comments