महाराष्ट्रातील राष्ट्रवादाचा उदय
राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशने |
महाराष्ट्रातील राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे -
१) ऐतिहासिक वारसा : छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य, लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेले शिवजयंती व गणेशोत्सव इत्यादी बाबींमुळे राष्ट्रवादास उत्तेजन मिळाले.
२) ब्रिटिशांनी केलेले आर्थिक शोषण.
३) पाश्चात्य संस्कृती व पाश्चात्य भाषेचा प्रभाव : ब्रिटिशांनी भारतात इंग्रजी शिक्षण सुरू केल्यामुळे भारतातील विविध प्रांतातील लोक एकमेकांच्या संपर्कात आले.
४) दळणवळणातील क्रांती : रेल्वे, पोस्ट, तारायंत्रे इत्यादी सुविधांमुळे देशातील विविध प्रांतातील लोक एकमेकांच्या संपर्कात आले.
५) मध्यमवर्गाचा उदय : इंग्रजी शिक्षणामुळे डॉक्टर, वकील, शिक्षक, पत्रकार, साहित्यिक यासारखा सुशिक्षित मध्यमवर्ग पुढे येऊन त्यांनी राष्ट्रवादाच्या भावनेस व्यापक स्वरूप प्राप्त करून दिले.
६) प्रसारमाध्यमांमुळे लोकजागृती : प्रबोधन काळात विविध वृत्तपत्रे व साहित्य यामुळे लोकांमध्ये जागृती होऊन राष्ट्रवादी भावना वाढीस लागली.
७) १८५७ चा उठाव : १८५७ चा उठाव जरी अयशस्वी झाला तरी ब्रिटिशांच्या ‘फोडा व झोडा' या नीतिमुळे संपूर्ण भारतात राष्ट्रवादाची भावना वाढीस लागली.
महाराष्ट्रातील राष्ट्रवादी संघटना
राष्ट्रवादाच्या अमूर्त भावनेला प्रेरणा देणाऱ्या महाराष्ट्रातील राष्ट्रवादी संघटना पुढीलप्रमाणे -
मुंबई इलाख्यातील राष्ट्रवादी संस्था
१) बॉम्बे असोसिएशन :
- स्थापना : २६ ऑगस्ट १८५२
- संस्थापक : नौरोजी फरदूनजी, जगन्नाथ शंकरसेठ.
- नाना जगन्नाथ शंकरसेठ यांनी मुंबईतील मोठ्या व्यापाऱ्यांच्या सहकार्याने ही संस्था स्थापन केली.
- हेतू : सनदशीर मार्गाने जनतेचे प्रश्न सोडविणे.
- बॉम्बे असोसिएशन ही मुंबई प्रांतातील (महाराष्ट्रातील) पहिली राजकीय संघटना आहे.
२) ईस्ट इंडिया असोसिएशन, १८६९ :
- दादाभाई नौरोजी यांनी १८६६ मध्ये लंडन येथे 'ईस्ट इंडिया असोसिएशन' ही संघटना स्थापन केली होती.
- १८६९ मध्ये या संघटनेची शाखा मुंबई येथे स्थापन.
३) बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, १८८५ :
- संस्थापक : फिरोजशहा मेहता, बद्रुद्दीन तय्यबजी, न्या. के. टी. तेलंग (हे त्रिकूट 'ब्रदर्स-इन-लॉ म्हणून प्रसिद्ध)
- इंग्लंडमधील जनमत भारतीयांबाबत जागृत करण्याचा प्रयत्न या संस्थेने केला.
- वरील सर्व संघटना या प्रादेशिक स्तरावर स्थापन झाल्या होत्या.
४) राष्ट्रीय सभा (राष्ट्रीय काँग्रेस) :
- २८ डिसेंबर १८८५ रोजी अखिल भारतीय स्तरावर राष्ट्रीय सभेची स्थापना झाली.
- राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन : २८ डिसेंबर १८८५ रोजी मुंबई येथे गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयाच्या सभागृहात ७२ सदस्यांच्या उपस्थितीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन पार पडले.
- राष्ट्रीय सभा तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजेच आजचा राष्ट्रीय काँग्रेस पक्ष होय.
राष्ट्रीय सभेची महाराष्ट्रात संपन्न झालेली अधिवेशने :
वर्ष |
ठिकाण |
अध्यक्ष |
१८८५ |
मुंबई |
व्योमेशचंद्र
बॅनर्जी |
१८८९ |
मुंबई |
सर विल्यम
वेडरबर्न |
१८९१ |
नागपूर |
पी. आनंदा
चार्लू |
१८९५ |
पुणे |
सुरेंद्रनाथ
बॅनर्जी |
१८९७ |
अमरावती |
सी. शंकरन नायर |
१९०४ |
मुंबई |
सर हेनरी कॉटन |
१९१५ |
मुंबई |
सत्येंद्र
प्रसन्न सिन्हा |
१९१८ |
मुंबई |
बॅ. सय्यद हसन
इमाम |
१९२० |
नागपूर |
चक्रवर्ती विजय
राघवाचार्य |
१९३४ |
मुंबई |
डॉ. राजेंद्र
प्रसाद |
१९३६ |
फैजपूर |
पं. जवाहरलाल
नेहरू |
१९४२ |
मुंबई |
मौलाना आझाद |
१९५० |
नाशिक |
पुरुषोत्तमदास
टंडन |
१९५९ |
नागपूर |
यु. एन. ढेबर |
१९८३ |
मुंबई |
इंदिरा गांधी |
१९८५ |
मुंबई |
राजीव गांधी |
0 Comments