महाराष्ट्रातील समाजसुधारक व धार्मिक सुधारणा चळवळी
![]() |
महाराष्ट्रातील समाजसुधारक |
जगन्नाथ शंकरसेठ (१८०३ ते १८६५)
जन्म : १० फेब्रुवारी १८०३, मुंबई येथे
मूळगाव : मुरबाड (जि. ठाणे)
मूळ आडनाव : मुरकुटे
- जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरसेठ यांना 'मुंबईचे शिल्पकार' म्हणून ओळखले जाते. दानशूर स्वभावाच्या नानांनी गोरगरीब जनता व अनेक संस्थांना आर्थिक मदत केली.
नाना शंकरसेठ यांच्या शैक्षणिक व सामाजिक सुधारणा :
बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी, १८२३ : लॉर्ड एल्फिन्स्टन यांच्या सहकार्याने नानांनी उभारलेल्या या सोसायटीने मुंबईत व मुंबईबाहेर अनेक शाळा सुरू केल्या.
- १८४५ मध्ये स्टुडण्टस् लिटररी अॅण्ड सायंटिफिक सोसायटीच्या स्थापनेसाठी नानांनी मोठी आर्थिक मदत केली डॉ. भाऊ दाजी लाड, दादाभाई नौरोजी, विश्वनाथ नारायण मंडलिक यांनी मुंबईत या संस्थेची स्थापना केली.
- १८३४ मध्ये मुंबईत एल्फिन्स्टन कॉलेजच्या स्थापनेत पुढाकार.
- मुंबई इलाख्यातील 'बोर्ड ऑफ एज्युकेशन-१८४०'चे सदस्य. या बोर्डावर ३ सरकारी सदस्य व ३ बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे सदस्य नेमले जात. या संस्थेचे १८५६ मध्ये शिक्षण खात्यात रूपांतर. मुंबईच्या कायदेमंडळाचे सदस्य. मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेत पुढाकार.
बॉम्बे असोसिएशनची स्थापना, १८५२ : जनतेची दुःखे सनदशीर मार्गाने सरकारपुढे मांडण्यासाठी दादाभाई नारोजी व भाऊ दाजी लाड यांच्या सहकार्याने नानांनी या संस्थेची स्थापना केली.
निधन : ३१ जलै २०११ 'नाना हे मुंबईचे अनभिषिक्त सम्राट होते' या शब्दांत आचार्य प्र. के. अत्रे यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर (१८१२ ते १८४६)
जन्म : ६ जानेवारी १८१२, पोंबर्ले (पोंभुर्ले, ता. राजापूर, जि. रत्नागिरी)
- आद्य सुधारक, आद्य इतिहास संशोधक, सुधारणावाद्यांचे प्रवर्तक, मराठी वृत्तपत्राचे जनक, श्रेष्ठ पत्रकार शिक्षणतज्ज्ञ, एक प्रगमनशील व्यवहारवादी सुधारक, महाराष्ट्रातील अग्रणी सुधारक अशा शब्दांत आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा गौरव केला जातो.
आचार्य जांभेकरांचे शिक्षण विषयक कार्य :
- संस्कृत, इंग्रजी, गुजराथी, फारसी, बंगाली आदी भाषांवर प्रभुत्व.
- 'बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी' या संस्थेत 'डेप्युटी सेक्रेटरी' (उपसचिव) या पदावर नियुक्ती.
- सरकारच्या वतीने अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक म्हणून नियुक्ती.
- मुंबईतील एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर.
- शिक्षकांच्या अध्यापन वर्गाचे संचालक.
- मुंबई प्रांतातील प्राथमिक शाळा तपासणी मोहिमेचे निरीक्षक.
पत्रकारितेविषयक कार्य : १८३२ मध्ये 'दर्पण' हे मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक. 'दिग्दर्शन' हे मासिक.
इतिहास संशोधनविषयक व वाङ्मयीन कार्य :
- शिलालेख वाचन, ताम्रपटांचा शोध याविषयी कार्य.
- इतिहास, भूगोल, व्याकरण, गणित, छंदशास्त्र, नीतिशास्त्र इत्यादी विषयांवर पुस्तकाचे लेखन.
जांभेकरांची ग्रंथसंपदा :
- शून्यलब्धी, हिंदूस्थानचा इतिहास, हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास, सार संग्रह, इंग्लंडचा इतिहास.
- जांभेकरांनी ज्ञानेश्वरीचे पाठभेदासह संपादन केले.
निधन : १७ मे १८४६, बनेश्वर येथे. (६ जानेवारी हा जांभेकरांचा जन्मदिन ‘पत्रकार दिन' म्हणून साजरा केला जातो.)
0 Comments