जम्मू-काश्मीरचे विलिनीकरण | जुनागढ संस्थानाचे विलिनीकरण | हैद्राबादचे विलीनीकरण

जम्मू-काश्मीरचे विलिनीकरण
जम्मू-काश्मीरचे विलिनीकरण


 जम्मू-काश्मीरचे विलिनीकरण (२६ व २७ ऑक्टोबर १९४७) 

  • काश्मीरचे राजा हरिसिंग यांनी आपले संस्थान स्वतंत्र ठेवण्याचा निर्णय घेतला. १९४६ साली शेख अब्दुला यांनी महाराजा हरिसिंग यांच्याविरोधात 'छोडो काश्मीर' चळवळ सुरू केली. यामध्ये पत्रकार बलराज पुरी आघाडीवर होते. पाकिस्तानने राजा हरिसिंगावर विलिनीकरणासाठी दबाव आणून अनेक घुसखोर काश्मीरात धाडले.
  • २२ ऑक्टोबर १९४७ या दिवशी पाकिस्तानी सैन्य टोळ्यांच्या रूपात आत घुसून आक्रमणास प्रारंभ झाला. या बदलत्या परिस्थितीत हरिसिंगाने भारत सरकारकडे मदत मागितली व २६ ऑक्टोबर १९४७ रोजी सामीलनाम्यावर सह्या केल्या. 
  • २७ ऑक्टोबर १९४७ रोजी भारतीय सेनेने प्रतिआक्रमण करून घुसखोरांना हटविले. मेजर जनरल कलवंतसिंग, मेजर जनरल थिमय्या, मेजर जनरल आत्मासिंग, मेजर सोमनाथ शर्मा, ब्रिगेडियर उस्मान यांनी पराक्रम गाजवन निम्याहून अधिक काश्मिर मुक्त केले. 
  • १९४८ मध्ये पंडित नेहरूंनी काश्मीर प्रश्न युनोकडे नेला व १ जानेवारी १९४९ रोजी युद्धबंदी घोषित झाली. पाकने घूसखोरी केलेला काश्मीरचा उर्वरित भाग 'पाकव्याप्त काश्मीर' म्हणून ओळखला जातो.

जुनागढ संस्थानाचे विलिनीकरण (२० फेब्रुवारी १९४८) 

  • गुजरातच्या सौराष्ट्रातील जुनागढ संस्थानातील प्रजेची भारतात सामील होण्याची इच्छा होती. परंतु जुनागढच्या नबाबाने पाकिस्तानशी गुप्तपणे संधान बांधून पाकिस्तानात विलीन होण्याचा निर्णय घेतला. संस्थानी प्रजेने याविरूध्द आंदोलन करताच नबाब पकिस्तानात पळून गेला. 
  • २० फेब्रुवारी १९४८ रोजी जनमताच्या कौलानुसार भारत सरकारने जुनागढ संस्थान भारतात विलीन केले. 

हैद्राबादचे विलीनीकरण (१७ व १८ सप्टेंबर १९४८) 

  • रझाकार' या हिंसावादी संघटनेचा नेता कासीम रझवी याने हैद्राबादच्या निजामाला भारतात सामील न होण्याचा सल्ला दिला. पर्यायाने, निजामाने भारतविरोधी धोरण स्वीकारून हैद्राबाद हे स्वतंत्र राज्य घोषित करतानाच मध्यप्रांत व वऱ्हाड यांतील काही प्रदेश आपल्या राज्यास जोडण्याची मागणी केली. जनमताच्या कौलासही न जुमानता त्याने पाकिस्तानला २० कोटींचे कर्ज दिले. तसेच भारतीय चलन हैद्राबादमधून रद्दबातल केले व पाकिस्तानशी संधान बांधले. रझाकारांनी जनतेवर अनन्वित अत्याचार केले.
  • अखेर १३ सप्टेंबर १९४८ रोजी हैद्राबादेत 'ऑपरेशन पोलो' या नावे यशस्वी पोलिस कारवाई करण्यात आली. 
  • १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाने शरणागती पत्करली व हैद्राबात भारतात विलीन करण्यात आले.  
  • १९५६ च्या राज्य पुनर्रचना कायद्यानुसार, हैद्राबादमधील तेलगू भाषिक प्रदेश आंध्र प्रदेशास, कन्नड भाषिक प्रदेश कर्नाटकास आणि मराठी भाषिकांचा मराठवाडा हा प्रदेश महाराष्ट्रास जोडण्यात आला.



Post a Comment

0 Comments