महाराष्ट्र : ऊर्जानिर्मिती | महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प | महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्प | महाराष्ट्रातील अणुविद्युत प्रकल्प

 महाराष्ट्र : ऊर्जानिर्मिती

दगडी कोळसा, जलविद्युत, औष्णिक विद्युत, अणुविद्युत, तेल व नैसर्गिक वायू ही राज्यातील प्रमुख ऊर्जासंसाधने आहेत.

जायकवाडी धरण
जायकवाडी धरण 


महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प

जलविद्युत प्रकल्प

जिल्हा

कोयना (१९५६ मे.वॅ.)धोम

सातारा

राधानगरी

कोल्हापूर

पवना

पुणे

वैतरणा

नाशिक

भिरा अवजल प्रवाह

रायगड

जायकवाडी

औरंगाबाद

भिवपुरी

रायगड

येलदरी

हिंगोली

पेंच

नागपूर

खोपोली

रायगड

भातसा

ठाणे

जिगाव

बुलढाणा

गोसीखुर्द

भंडारा

घाटघर

अहमदनगर

मुंबई शहरास पाणी पुरविणारे ७ तलाव : मोडकसागर, तानसा, विहार, तुळशी, अप्पर वैतरणा, भातसा, वैतरणा 

नाशिक शहरास पाणीपुरवठा : गंगापूर धरण (गोदावरी) 

भीरा-अवजल प्रकल्पास पाणीपुरवठा : मुळशी धरण (पुणे)

जायकवाडी धरण प्रकल्पास 'जपान' या देशाचे सहकार्य लाभले आहे. 

बाभळी बंधारा : गोदावरी नदीवरील बाभळी (जि. नांदेड) बंधाऱ्यातील पाणी वापरावरून महाराष्ट्र व तेलगणा या राज्यात वाद.  

जिगाव सिंचन प्रकल्प : बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प. २००८ मध्ये बांधकाम सुरू. अद्याप अपूर्ण. 

गोसीखुर्द प्रकल्प (इंदिरासागर जलाशय) : राष्ट्रीय सिंचन प्रकल्प. भंडारा जिल्ह्यात वैनगंगा नदीवर. २२ एप्रिल १९८८ ला सुरुवात. अद्याप अपूर्ण. मेंढेगिरी समिती, वडनेरे समिती यांची प्रकल्पाच्या निकृष्ट कामावर टीका. 

इंडिया बुल्स : अमरावती जिल्ह्यातील खासगी वीजनिर्मिती प्रकल्प. या प्रकल्पास पाणीपुरवठ्यावरून वाद. 

कोयना लेक टॅपिंग-२ यशस्वी : २५ एप्रिल २०१२ रोजी सातारा जिल्ह्यातील कोयना प्रकल्पातील शिवसागर जलाशयात लेक टॅपिंगचा दुसरा टप्पा यशस्वीपणे पार पडला. लेक टॅपिंगचे मुख्य अभियंता : दीपक मोडक . 

१३ मार्च १९९९ : कोयना धरणात लेक टॅपिंगचा पहिला टप्पा यशस्वी. लेक टॅपिंग हे नॉर्वेजियन तंत्रज्ञान आहे. 

ऑगस्ट २०१४ मध्ये ठाणे जिल्ह्यातील मोडकसागर धरणात (वैतरणा नदी) लेक टॅपिंगचा प्रयोग यशस्वी झाला. 

वीज वितरण धोरण : ज्या घटकराज्यांत वीजनिर्मिती केंद्र आहे, त्या राज्याला तेथील एकूण वीजनिर्मितीपैकी १२ टक्के वीज विनामूल्य दिली जाते. आधुनिक काळात वीजनिर्मिती केंद्रापासून गळती न होता सुमारे ८०० किमी अंतरापर्यंत वीजेचे वहन सहज शक्य होते. त्यापेक्षा अधिक अंतरावर वीज वाहून नेताना वीजगळती होते. 

महाराष्ट्रातील वीजेचा वापर (उतरता क्रम) : १) औद्योगिक क्षेत्र (सर्वाधिक), २) कृषी वापर, ३) घरगुती वापर, ४) वाणिज्यिक वापर, ५) सार्वजनिक सेवा, ६) रेल्वे 

महाराष्ट्रात एकूण वीजनिर्मितीपैकी ५२% वीज विदर्भात निर्माण होते.

महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्प

औ. वि. प्रकल्प

क्षमता (Mw)

जिल्हा

खापरखेडा

१३४०

नागपूर

तुर्भे

मुंबई उपनगर

कोराडी

६२०

नागपूर

चंद्रपूर

२३४०

चंद्रपूर

बल्लारपूर

चंद्रपूर

परळी वैजनाथ

११३०

बीड

पारस

५००

अकोला

चोला

कल्याण (ठाणे)

पोकरी/फेकरी

१४२०

भुसावळ (जळगाव)

धोपावे

रत्नागिरी

मौदा

१३२०

नागपूर

एकलहरे

६३०

नाशिक

चंद्रपूर औष्णिक विद्युत प्रकल्प : 

भारतातील सर्वात मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प. दर्गापूर व पद्मपूर येथील खाणीतून कोळसा पुरवठा. महाराष्ट्राची २५% वीजेची गरज भागवितो . इरई व चारगाव धरणातून पाणीपुरवठा. स्थापित क्षमता : ३३४० MW, प्रत्यक्ष उत्पादन : २३४० MW  

महाजनको लिमिटेड (महानिर्मिती) : 

स्थापना : ६ जून २००५, मुख्यालय : वांद्रे (मुंबई). NTPC नंतर भारतातील दुसऱ्या क्रमांकाची वीजनिर्मिती कंपनी. वीजनिर्मिती क्षमता : ११,२३७ MW. ही कंपनी महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत, जलविद्युत प्रकल्प तसेच उरण प्रकल्पाचे नियमन करते.

महाराष्ट्रातील अणुविद्युत प्रकल्प


तारापूर (ता. जि. पालघर). तारापूर हा भारतातील सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प आहे. 
नियोजित अणुप्रकल्प : जैतापूर (माडबन, जि. रत्नागिरी) 
जतापूर अणुविद्युत प्रकल्प सध्या जमीन संपादनाच्या मुद्यावरूनच रखडला आहे. हा क्रच कपनी जैतापर प्रकल्पात प्रत्येकी १६५० MW च्या ६ अणभटट्या उभारणार. 
क्षमता : ९९०० MW 

महाराष्ट्रातील अपारंपरिक ऊर्जा 


महाराष्ट्र : अपारंपरिक ऊर्जा निर्मिती क्षमता : १४,४००MW; 
प्रत्यक्ष निर्मिती : ६,७०५MW  
यापैकी पवन ऊर्जा निर्मिती: ४.३५४ MW (सर्वाधिक) 

महाराष्ट्रातील पवनऊर्जा प्रकल्प : 

सातारा, सांगली, अहमदनगर, धुळे, जामसंडे (ता. देवगड, जि. सिधुदूर्ग) वनकुसडे (सातारा) येथे सुझलान कंपनीचा सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प. 
विदर्भात मोथा (ता. चिखलदरा. जि. अमरावती) येथे 4MW क्षमतेचा पवन ऊर्जा प्रकल्प. 
पवन ऊर्जा निर्मितीसाठी वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किमी इतका आवश्यक असतो. 

सौरऊर्जा प्रकल्प : 

शिवाजीनगर (ता. साक्री, जि. धुळे) येथे १२५ MW क्षमतेचा आशियातील सर्वात मोठा सौरऊर्जा प्रकल्प. 
बुधल (ता. गुहागर, जि. रत्नागिरी) येथे सागरी लाटांपासून ऊर्जा निर्मिती प्रकल्प कार्यरत आहे. 

महाराष्ट्रात अपारंपरिक ऊर्जेपासून १४ हजार MW वीजनिर्मितीचे उद्दिष्ट : 
(२० जुलै २०१५ चा राज्य ऊर्जा विभागाचा निर्णय)

२०२० पर्यंत महाराष्ट्रात अपारंपरिक ऊर्जेपासून सुमारे १४,४०० मेगावॅट वीजनिर्मितीचे प्रकल्प उभारण्याचे उद्दिष्ट निश्चित. यामध्ये (पवन ऊर्जा : ५००० MW, लघु जलविद्युत निर्मिती : ४०० MW)
ऊसाचे चिपाड व कृषि अवशेषांवर आधारित सहवीजनिर्मिती : १००० MW 
औद्योगिक टाकाऊ पदार्थांपासून वीजनिर्मिती : २०० MW, सौरऊर्जा निर्मिती : ७५०० MW 
अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांद्वारे वीजनिर्मिती प्रकल्पांच्या स्थापित क्षमतेबाबत भारतात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. 

महाराष्ट्राचे नवे ऊर्जा धोरण, २०१७ : 

विधिमंडळाची मंजुरी : ३० मे २०१७
उद्दिष्ट : पुढील ५ वर्षात (२०२२ पर्यंत) राज्यातील विविध क्षेत्रात ऊर्जा धोरणाची प्रभावी अंमलबजावणी
करून ६,९७९ द.ल. युनिट म्हणजेच १ हजार मेगावॅट ऊर्जेची बचत करणे. 
यामुळे महाराष्ट्रास कर स्वरूपात रु. १२०० कोटींचे उत्पन्न आणि रोजगाराच्या नवीन ८ हजार संधी अपेक्षित. ऊर्जाबचत, संवर्धन आणि ऊर्जानिर्मिती क्षेत्रात स्वतंत्र धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

Post a Comment

0 Comments