महाराष्ट्र : हवामान
महाराष्ट्र हवामान |
महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेमुळे येथील हवामानात वैविध्य आढळते.
पश्चिमेकडील अरबी समुद्रावरून येणारे नैऋत्य मान्सून वारे सह्याद्रीमुळे अडविले जाऊन प्रतिरोध पाऊस पडतो.
प्राकृतिक विभाग |
हवामानाची विविधता |
कोकण |
उष्ण, सम व दमट हवामान |
सह्याद्री (प.घाट) |
थंड व आर्द्र हवामान |
महाराष्ट्र पठार |
उष्ण, कोरडे व विषम हवामान |
१) उन्हाळा : मार्च ते मे राज्यातील प्रमुख ऋतू :
२) पावसाळा : जून ते सप्टेंबर
३) हिवाळा : ऑक्टोबर ते फेब्रुवारी
हवामान विभाग :
डॉ. ग्लेन थॉमस त्रिवार्था या अमेरिकन भूगर्भतज्ञाने महाराष्ट्राचे ३ हवामान विभाग सांगितले आहेत.
१) उष्ण कटिबंधीय मोसमी वनांचा हवामान विभाग (AM)
२) उष्ण कटिबंधीय शुष्क हवामान / स्टेप्स हवामान विभाग (BS)
३) उष्ण कटिबंधीय दमट-कोरडे किंवा सॅव्हाना हवामान विभाग (AW)
तापमान कक्षा : नागपूरचे स्थान भारताच्या मध्यभागात असल्याने उन्हाळ्यात येथे दिवसाचे सरासरी तापमान ४८° सें. तर रात्रीचे सरासरी तापमान १९° सें. असते. पर्यायाने, तेथील दैनिक तापमान कक्षा २९ सें. इतकी मोठी असते.
महाराष्ट्रातील पर्जन्य
राज्यात मोसमी वाऱ्यांपासून (नैऋत्य मोसमी वारे) पाऊस पडतो. (वार्षिक सरासरी पर्जन्य : ४०० ते ६००० मि.मी.)
मोसमी पावसास ७ जूनपासून (मृग नक्षत्र) किनारी भागात सुरुवात होते. (मान्सूनचा स्फोट) .
राज्यात सर्वाधिक पाऊस जुलै महिन्यात पडतो.
राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे २०% क्षेत्र अवर्षणग्रस्त आहे.
राज्यातील अमरावती, नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा आदी जिल्ह्यांना 'ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून' पाऊस मिळतो, मात्र या वाऱ्यांपासून मिळणारा पाऊस तुलनेने कमी असतो... एप्रिल-मे महिन्यात राज्याच्या काही भागांत पावसाच्या 'आंबेसरी' पडतात. (हा पाऊस आंबा पिकास मानवतो)
महाराष्ट्रातील पर्जन्याचे वितरण :
१) कोकण (सर्वाधिक)
२) विदर्भ
३) मध्य महाराष्ट्र
४) मराठवाडा (सर्वात कमी)
राज्यातील मान्सूनची (पर्जन्याची) विविधता
राज्याचा प्रदेश |
पर्जन्याचे
प्रमाण |
वैशिष्ट्ये |
कोकण किनारपट्टी |
भरपूर पाऊस २५० ते ३०० सें.मी. |
- दक्षिण कोकणात रत्नागिरी येथे २४४ सें.मी. पाऊस. - कोकणात दक्षिणेकडून उत्तरेकडे पावसाचे प्रमाण कमी होत जाते. |
घाटमाथा |
अति पर्जन्याचा प्रदेश (प्रतिरोध पर्जन्य) ३०० सें.मी.हून अधिक पाऊस |
- दक्षिणेकडे आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे राज्यातील सर्वाधिक म्हणजे सुमारे ७०७ सेमी पाऊस पडतो. - उत्तरेकडे पावसाचे प्रमाण कमी होत जाते. |
सह्याद्रीच्या पूर्वेकडील भाग |
पर्जन्यछायेचा प्रदेश ५० ते ७५ सें.मी. पाऊस पाऊस |
- घाटमाथ्यावर महाबळेश्वर येथे ५९४ सेंमीहून अधिक; तर त्याच्या पूर्वेकडे पाचगणी (१५८ सें.मी.); वाई (५४ सें.मी.) असे प्रमाण कमी होत जाते. |
गोदावरी, भीमा व कृष्णा खोरे |
अवर्षणग्रस्त प्रदेश ५० सें.मी.पेक्षा कमी पाऊस |
- मालेगाव (नाशिक) येथे ४४ सें.मी. पाऊस; - दहीवडी (सातारा) येथे २९ सें.मी. पाऊस |
पूर्व विदर्भ (चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा) |
वाढते पर्जन्य १५० सें.मी. |
- पश्चिमेकडून पूर्वेकडे विदर्भात पाऊस वाढत जातो. - सातपुड्याच्या रांगांचा परिणाम (प्रतिरोध पर्जन्य) - ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो. |
0 Comments