जातीव्यवस्थेचा उगम उत्तर वैदिक काळातील वर्णव्यवस्थेतून झाला. वर्णव्यवस्था ही गुणांवर, तर जातीव्यवस्था जन्मावर आधारित होती. महाराष्ट्रात विविध समाजसुधारकांनी अस्पृश्यता निर्मूलन कार्यात मोलाचे योगदान दिले आहे.
महात्मा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यता निर्मूलन चळवळीतील महत्वाचे योगदान दिले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दलित चळवळीतील योगदान
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही दलितांना माणूस म्हणून प्रतिष्ठा मिळवून देणारी न्यायपूर्ण चळवळ आहे. सामाजिक व आर्थिक समतेशिवाय राजकीय स्वातंत्र्याला भक्कमपणा येणार नाही या विचारातून १९२० पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीस प्रारंभ झालेला आढळतो.
२५ नोव्हेंबर १९२६ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे समता सैनिक दल ही सामाजिक संघटना स्थापन केली. दलित बांधवांना गुलागिरीतून मुक्त करणे हा या संघटनेच्या स्थापनेमागील उद्देश होता.
१३ मार्च १९२७ : नागपूर येथे अखिल भारतीय समता सैनिक दल या संस्थेची स्थापना.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक सुधारणा :
जून १९२८ मध्ये अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी दोन वसतिगृहांची स्थापना.
डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना.
पीपल्स एज्युकेशन सोसायटी : १९४६
१९४५ मध्ये अस्पृश्य समाजातील २० गरीब होतकरू विद्यार्थ्यांना अमेरिका व इंग्लंड येथे उच्चशिक्षणासाठी पाठविले.
भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केली.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे अस्पृश्यतानिर्मुलन कार्य
वि. रा. शिंदे यांचा जन्म : २३ एप्रिल १८७३, कर्नाटकातील जमखिंडी येथे.
आईचे नाव : यमुनाबाई.
वि. रा. शिंदे हे प्रार्थना समाजाचे प्रचारक व कार्यकर्ते होते. महर्षी शिंदे यांनी आयुष्यभर जातिव्यवस्था नष्ट करण्यास प्राधान्य दिले. अस्पृश्योद्धाराबरोबरच स्त्रियांचे शिक्षण व शेतकऱ्यांच्या समस्या या बाबतीतही त्यांचे कार्य मोठे आहे.
अस्पृश्यता निर्मुलनासाठी महर्षी शिंदे यांनी खालील प्रयत्न केले -
१२ ऑक्टोबर १९०६ रोजी मुंबई येथे 'डिप्रेस्ड क्लासेस मिशन ऑफ इंडिया' ही संस्था स्थापन केली.
१२ ऑक्टोबर १९०६ रोजीच एल्फिन्स्टन रोड येथे पहिली शाळा सुरू केली.
ठाणे, मालवण, अमरावती, अकोला या शहरांत शाळा व वसतिगृहे सुरू केली.
१९१२ मध्ये पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमध्ये अस्पृश्य व ब्राह्मण यांच्या एकत्र सहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला.
१९१७ मध्ये मुंबई येथे नारायण गणेश चंदावरकर यांच्या अध्यक्षतेखाली भरविलेल्या सभेत महर्षी शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानपत्र देण्यात यावे, अशी मागणी केली.
१९१७ च्या कोलकाता येथील काँग्रेस अधिवेशनात महर्षी शिंदे यांनी अस्पृश्यताविरोधी ठराव मांडला.
दादोबा पांडुरंग तर्खडकर : मानवधर्म सभा व परमहंस सभा यांच्या माध्यमातून जातिव्यवस्थेस विरोध केला.
लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख : यांनी गुणकर्माधिष्ठित सामाजिक व्यवस्थेचा पुरस्कार केला.
0 Comments