महाराष्ट्रातील कामगार हितवर्धक सभा | समतेच्या चळवळी | कामगार चळवळी संपूर्ण माहिती स्पर्धापरीक्षा उपयुक्त | Social Service League

महाराष्ट्रातील समतेच्या चळवळी 

महाराष्ट्रातील समतेच्या चळवळी
महाराष्ट्रातील समतेच्या चळवळी


महाराष्ट्रातील कामगार चळवळींचा इतिहास : 

  • सत्ता, संपत्ती, अधिकार व सवलतींचे समाजव्यवस्थेत असमान वाटप झाल्याने कामगारांची आर्थिक स्थिती नेहमीच हलाखीची राहिली. यामुळे संघटित कामगारांची चळवळ उदयास आली. 
  • २३ मार्च १८७५ रोजी मुंबईचे तत्कालिन जिल्हाधिकारी अर्बुथ नॉट यांच्या अध्यक्षतेखाली 'पहिले फॅक्टरी कमिशन' नियुक्त. यामध्ये दिनशॉ पेटीट, मोरारजी गोकुळदास, मंगलदास नथुबाई या गिरणी मालकांचा समावेश होता. या कमिशनचा अहवाल सरकारने नाकारला. 
  • १८७५ मध्ये सोराबजी शापूरजी यांनी सरकारकडे कामगारांची स्थिती सुधारण्यासाठी कायदा करण्यात यावा ही मागणी केली. 
  • १८७९ मध्ये महात्मा फुले यांनी मुंबईतील गिरणी कामगारांची 'मुंबई मजूर संघ' ही संघटना स्थापन केली. 
  • २३ सप्टेंबर १८८४ रोजी नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबई येथे 'बॉम्बे मिलहँडस असोसिएशन' ही भारतातील पहिली कामगार संघटना स्थापन केली. २३ सप्टेंबर १८८४ रोजी मुंबईतील परळ येथे कामगारांची पहिली सभा संपन्न झाली. 
  • २४ एप्रिल १८९० च्या मुंबईतील कामगार सभेत कामगारांनी रविवारच्या सुट्टीची मागणी केली. 
  • १० जून १८९० पासून कामगरांना रविवारची सुट्टी सुरू. यासाठी नारायण मेघाजी लोखंडे यांचे योगदान लाभले. 

बॉम्बे पोस्टल युनियन, १९०७ : टपाल कर्मचाऱ्यांनी ही संघटना स्थापन केली. 

कामगार हितवर्धक सभा, १९०९ : भिवाजी नरे यांनी सीताराम बोले व बॅ. हरिश्चंद्र तालचेरकर यांच्या मदतीने ही संघटना स्थापन केली. कामगारांना शिक्षण व कायदेशीर सल्ला देणे हा या संस्थेचा हेतू होत. 

सोशल सर्व्हिस लीग, १९०९ : नारायण मल्हार जोशी यांनी गोपाळ देवधर व नरेश आप्पाजी द्रविड यांच्या मदतीने ही संस्था स्थापन करून कामगारांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला.

मध्य प्रांत वऱ्हाड विडी कामगार संघ : १ जानेवारी १९३१. संस्थापक : एल. एन. हरदास. 

संयुक्त खानदेश मजूर फेडरेशन : ऑक्टोबर १९३७ 

  • ११ एप्रिल १९३९ रोजी कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील ब्रिटिया गिरणीतील कामगाराना ७ महिन्यांचा बंद पाळला. 
  • जानेवारी १९५९ मध्ये मुंबईतील सर्व गिरणी कामगारांची 'मुंबई गिरणी कामगार युनियन' ही संघटना स्थापन. डॉ. दत्ता सामत यांची 'कामगार आघाडी', राजन नायर यांची 'महाराष्ट्र लेबर युनियन' या कामगार संघटनादेखील महत्त्वाच्या आहत. डॉ. दत्ता सामंत यांनी १९८२ साली मुंबईतील गिरणी कामगारांचा संप घडवून आणला.  



Post a Comment

0 Comments