प्लासीची लढाई व बक्सारची लढाई |
इंग्रजांचे बंगालवरील वर्चस्व
- १७६३ च्या पॅरिसच्या तहानुसार इंग्रजांनी फ्रेंचांना पुदुच्चेरी परत केला व फ्रेंच सत्ता एवढ्यापुरतीच सिमित राहीली. त्यानंतर इंग्रजांनी आपले लक्ष बंगालकडे वळविले व येथूनच खऱ्या अर्थाने त्यांचा भारतीय राज्यकर्त्यांशी संघर्ष सुरू झाला.
(प्लासीची लढाई व बक्सारची लढाई):
- बंगालचा सुभेदार अलीवर्दीखान याच्या मृत्यूनंतर (१७५६) गादीवर आलेला त्याचा पूत्र सिराजउद्दौलाच्या कारकिर्दीत इंग्रजांनी बंगालमध्ये साम्राज्याचा पाया रोवला. सिराजउद्दौलाने इंग्रजांवर स्वारी करून कासिमबजार व कोलकाता येथील वखारी ताब्यात घेतल्या. अंधार कोठडीची दुर्घटना' याच काळात घडल्याने इंग्रजांचे पित्त खवळले. रॉबर्ट क्लाईव्ह व वॅटसन या अधिकाऱ्यांनी प्लासीच्या लढाईत सिराजउद्दौलास धडा शिकविला.
प्लासीची लढाई (२३ जून १७५७) :
- मीरजाफरशी संधान व सिराजचा पराभव : सिराजउद्दौलास धडा शिकविण्यासाठी रॉबर्ट क्लाईव्ह या इंग्रज मुत्सद्याने सिराजचा सेनापती मीरजाफर यास नबाबपदाचे अमिष दाखवून फितविले. परिणामी २३ जून १७५७ रोजी प्लासी येथे सिराज व इंग्रज यांच्यामध्ये झालेल्या लढतीत मीरजाफर तटस्थ राहिल्याने सिराजचा सहज पराभव झाला व मीरजाफर बंगालच्या नबाबपदी आला. १७६० मध्ये इंग्रजांनी मीरजाफरचा जावई मीरकासीम यास सत्तेवर आणले. १७६३ मध्ये इंग्रजांनी पुन्हा मीरजाफरला नबाबपदी आणले. यातूनच बक्सारची लढाई उद्भवली.
बक्सारची लढाई (२२ ऑक्टोबर १७६४) :
- इंग्रज विरुद्ध शहाआलम, शुजाउद्दौला, मीरकासीम संघर्ष : बिहार प्रांतातील बक्सार येथे २२ ऑक्टोबर १७६४ रोजी बक्सारच्या लढतीत मेजर मन्रोच्या इंग्रजी फौजेने मुघल बादशहा शहाआलम, मीरकासीम व अवधचा नबाब शुजाउदौवला यांचा पराभव केला. अशा प्रकारे प्लासीच्या लढाईने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवला गेला, तर बक्सारच्या लढाईतील विजयाने हा पाया मजबूत केला गेला, मे १७६५ मध्ये बंगालच्या गव्हर्नरपदी दुसऱ्यांदा आरूढ झालेल्या रॉबर्ट क्लाईव्हने बंगालमध्ये 'दुहेरी राज्यव्यवस्था' हा महसूल व्यवस्थेचा जुलमी प्रकार सुरू केला.
0 Comments