भारतीय राज्यव्यवस्थापन व प्रशासन | घटना समितीचे प्रमुख सदस्य | घटना समितीची अधिवेशने

भारतीय राज्यव्यवस्थापन व प्रशासन

समितीची स्थापना : कॅबिनेट मिशनने (त्रिमंत्री योजना) भारताच्या संभाव्य घटना समितीसाठी निवडणुका घेण्यात याव्यात अशी शिफारस केली. या मिशनने घटना समितीची रचना खालीलप्रमाणे निश्चित केली. 

संविधान सभेचे एकूण सदस्य : ३८९; 

यापैकी - ब्रिटिश भारतासाठी : २९६ सदस्य;  संस्थानिकांसाठी : ९३ सदस्य 

या २९६ पैकी भारतातील ११ प्रांतांसाठी : २९२ सदस्य

संविधान समितीच्या रचनेत बदल : १८ जुलै १९४७ रोजी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा संमत झाला. या कायद्यानुसार संविधान समितीची सदस्य संख्या कमी करून ती २९९ इतकी निश्चित करण्यात आली. 

यापैकी संस्थानिकांचे प्रतिनिधी : ७० 

प्रांतांचे सदस्य : २२९ (सर्वाधिक ५५ सदस्य संयुक्त प्रांतातून)

घटना समितीचे प्रमुख सदस्य 

प्रमुख पुरुष सदस्य : डॉ. राजेंद्रप्रसाद, पं. जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, गोविंद वल्लभपंत, मौलाना आझाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ग. वा. मावळणकर, बलवंतराय मेहता, श्यामाप्रसाद मुखर्जी, बॅ.एम.आर. जयकर, कन्हैयालाल मुन्शी, सी. राजगोपालाचारी

प्रमुख स्त्री सदस्या : राजकुमारी अमृता कौर, अम्मू स्वामीनाथन, बेगम एझाज रसूल, दाक्षायिनी वेलायुधान, रेणुका रे, लिला रे, कमला चौधरी, पुर्णिमा बॅनर्जी, मालती चौधरी, हंसाबेन मेहता, दुर्गाबाई देशमुख, विजयालक्ष्मी पंडित, नलिनी रंजन घोष, सरोजिनी नायडू

फ्रँक अँथनी : घटना समितीचे अँग्लो इंडियन सदस्य 

एच. पी. मोदी : घटना समितीचे पारशी सदस्य

संविधान समितीची (घटना समितीची) अधिवेशने : संविधान सभेची एकूण ११ अधिवेशने (बैठका) झाली. 

पहिले अधिवेशन : ९ ते २३ डिसेंबर १९४६. ११ वे अधिवेशन : १४ ते २६ नोव्हेंबर १९४९

घटना समितीचे अध्यक्ष : ११ डिसेंबर १९४६ रोजी डॉ. राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. 

घटना समितीचे उपाध्यक्ष : हरेंद्र कुमार (एच.सी.) मुखर्जी 

घटना समितीचे सल्लागार : बी. एन. राव.



Post a Comment

0 Comments