घटना समितीच्या काही प्रमुख उपसमित्या व त्यांचे अध्यक्ष
मसुदा समिती - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
संघराज्य घटना समिती - पं. जवाहरलाल नेहरू
संघराज्य अधिकार समिती - पं. जवाहरलाल नेहरू
प्रांतिय राज्यघटना समिती - सरदार वल्लभभाई पटेल
राष्ट्रध्वजासंबंधी समिती - डॉ. राजेंद्र प्रसाद
अर्थ व स्टाफ समिती - डॉ. राजेंद्र प्रसाद
अधिकारपत्र समिती - सर अलादी कृष्णस्वामी अय्यर
राज्यघटना समितीचे कार्य - ग. वा. मावळणकर
गृह समिती - डॉ. बी. पट्टाभिसीतारामय्या
भाषिक प्रातांवरील समिती - के. एम. मुन्शी
सुकाणू समिती - के. एम. मुन्शी
मूलभूत हक्क व अल्पसंख्यांक सल्लागार समिती - सरदार वल्लभभाई पटेल
मूलभूत हक्क व अल्पसंख्यांक सल्लागार समिती :
या समितीच्या पुढील उपसमित्या होत्या.
१) मूलभूत हक्क विषयक उपसमिती - जे. बी. कृपलानी
२) अल्पसंख्यांक विषयक उपसमिती - एच. सी. मुखर्जी
३) ईशान्येकडील व आसाममधील काही जनजाती क्षेत्रे उपसमिती - गोपीनाथ बार्डोलोई
४) आसाम व अन्य क्षेत्रातील वगळलेल्या क्षेत्रांसाठी उपसमिती - ए. व्ही. ठक्कर
मसुदा समितीची रचना : १ अध्यक्ष + ६ सदस्य.
मसुदा समितीचे अध्यक्ष : डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
- २९ ऑगस्ट १९४७ : घटनेच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची निवड झाली.
मसुदा समितीचे ६ सदस्य : अलादी कृष्णस्वामी अय्यर, कन्हैय्यालाल माणेकलाल (के. एम.) मुन्शी, एन गोपालस्वामी अय्यंगार, सय्यद मोहम्मद सादुल्ला, डी. पी. खेतान, बी. एल. मित्तर.
- बी. एल. मित्तर यांच्या राजीनाम्यानंतर एन. माधवराव हे मसुदा समितीचे सदस्य बनले. .डी. पी. खेतान यांच्या निधनानंतर टी. टी. कृष्णम्माचारी हे मसुदा समितीचे सदस्य बनले.
- एन. जी. अय्यंगार हे काश्मीरचे राजा हरिसिंग यांचे दिवाण होते. त्यांनी काश्मीरविषयक कलम ३७० चा मसुदा तयार केला.
- मसुदा समितीचे कामकाज २९ ऑगस्ट १९४७ ते २६ नोव्हेंबर १९४९ या काळात चालले. मसुदा समितीने अवघ्या १४१ दिवसांत संविधानाचा मसुदा बनविला.
- 'घटना समितीचे कामकाज एकूण १०८२ दिवस (२ वर्षे, ११ महिने, १८ दिवस) इतका प्रदीर्घ काळ चालले. घटना समितीचे प्रत्यक्ष कामकाज एकूण १६५ दिवस चालले.
- १३ डिसेंबर १९४६ : पं. जवाहरलाल नेहरू यांनी राज्यघटनेच्या उद्दीष्टांचा ठराव मांडला. त्यालाच Preamble म्हणतात.
- २२ जानेवारी १९४७ : पं. जवाहरलाल नेहरूंनी मांडलेला घटना समितीच्या उद्दिष्टांबाबतचा ठराव मंजूर झाला.
संविधान सभेचे तीन टप्पे व स्वरूप :
टप्पा |
कालावधी |
स्वरुप |
पहिला टप्पा |
६ डिसेंबर १९४६
ते १४ ऑगस्ट १९४७ |
त्रिमंत्री
योजनेच्या अखत्यारितील संविधान सभा |
दुसरा टप्पा |
१५ ऑगस्ट १९४७
ते २६ नोव्हेंबर १९४९ |
सार्वभौम
संविधान सभा व हंगामी संसद तिसरा टप्पा २७ नोव्हेंबर १९४९ ते मार्च १९५२ हंगामी
संसद |
तिसरा टप्पा |
२७ नोव्हेंबर
१९४९ ते मार्च १९५२ |
हंगामी संसद |
- मार्च १९५२ मध्ये लोकसभेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका होऊन भारतीय संसद अस्तित्वात आली.
0 Comments