चले जाव चळवळ (छोडो भारत आंदोलन : १९४२)
- १४ जुलै १९४२ : वर्धा येथे राष्ट्रसभेच्या कार्यकारिणीने 'छोडो भारत' चळवळीचा ठराव पास केला.
- ८ ऑगस्ट १९४२ : मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर (ऑगस्ट क्रांती मैदान) भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात पं. नेहरू यांनी मांडलेला 'चले जाव' चळवळीचा ठराव संमत करण्यात आला. या अधिवेशनाचे अध्यक्ष होते : मौलाना अबुलकलाम आझाद.
- ८ ऑगस्ट रोजी गांधीजींनी भारतीय जनतेस ‘करा किंवा मरा' (करेंगे या मरेंगे) हा संदेश दिला, याशिवाय 'ब्रिटिशांनी भारतातून चालते व्हावे' असे ठणकावून सांगितले.
छोडो भारत चळवळ आणि महाराष्ट्र
मुंबईतील आंदोलन : मुंबई हे १९४२ च्या चलेजाव चळवळीचे प्रमुख केंद्र बनले. मुंबईत 'सेंट्रल डिरेक्टोरेट' ही भूमिगतांची मध्यवर्ती संस्था स्थापन. डॉ. वसंत अवसरे हे बॉम्बस्फोटातील संशयित आरोपी भूमिगत झाले. उषा मेहता, विठ्ठलदास जव्हेरी, चंद्रकांत जव्हेरी यांनी 'आझाद रेडिओ' हे सिक्रेट रेडिओ स्टेशन (गुप्त रेडिओ) सुरू करून आंदोलनाच्या बातम्या प्रसारित केल्या.
रायगडमधील आंदोलन : रायगड जिल्ह्यातील महाड येथे नाना पुरोहित, मोहन धारिया यांच्या नेतृत्वाखाली पोस्ट व तारायंत्रांची मोडतोड करण्यात आली. कर्जत तालुक्यात भाई कोतवाल यांनी गोमाजी पाटील यांच्या सहकार्याने 'आझाद दस्ता' ही आंदोलकांची फौज स्थापन केला.
विदर्भातील आदोलन : मदनलाल बागडी, विनायक दाडेकर, शाम नारायण काश्मिरी यांच्या हिंदुस्थान लाल सेनन विदर्भात आंदोलन केले.
- नागपूरमध्ये राष्ट्रीय शिवाजी मंडळाचे कार्यकर्ते दाजीबा महाले व त्यांचा १८ वर्षीय मुलगा शंकर महाले हुतात्मा झाले.
- ऑगस्ट १९४२ मध्ये आष्टी व चिमूर येथील जनतेस चलेजाव आंदोलनाची चिथावणी दिल्याच्या आरोपावरून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अटक. नागपूरच्या जनरल आवारी यांच्या 'लाल सेने'ने आंदोलन तीव्र केले.
- वर्धा जिल्ह्यातील आष्टी या गावात १६ ऑगस्ट १९४२ रोजीच्या आंदोलनात सात आंदोलक ठार झाले.
- चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे १६ ऑगस्ट १९४२ रोजी तीव्र आंदोलन झाले.
- अमरावतीजवळच्या यावली गावात १५ ते १९ ऑगस्ट १९४२ या काळात तीव्र आंदोलन झाले.
मराठवाड्यातील आंदोलन : अंबाजोगाई (मोमीनाबाद) येथील योगेश्वरी विद्यालयाच्या १४ शिक्षकांविरुद्ध हैदराबाद संरक्षण नियमाद्वारे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले.
- नांदेड येथे ३ ऑक्टोबर १९४२ रोजी मोठे आंदोलन करण्यात आले.
- १ ऑगस्ट १९४२ ते २१ मे १९४३ या 'चलेजाव'च्या पहिल्या टप्प्यात प्रतिसरकारच्या कार्यकर्त्यांनी मोर्चे, निदर्शने, घातपात या मार्गांनी सरकारला जेरीस आणले. रूळ उखडणे, तारा तोडणे, तिरंगा फडकाविणे, प्रभातफेऱ्या, सभा इत्यादी कार्यक्रम राबविले. प्रतिसरकारच्या भूमिगत कार्यकर्त्यांनी कराड, पाटण, तासगाव, खानापूर, वाळवा, खटाव येथील श्रीमंतांना लुटून क्रांतिकार्यासाठी पैसा उभारला.
- सातारा, सांगली या ठिकाणी नागनाथअण्णा नायकवडी यांच्या 'आझाद दला'ने सशस्त्र आंदोलन केले.
- पुण्यातील वेस्टएंड व कॅपिटल या चित्रपटगृहांतून बॉम्बस्फोट घडवले गेले. १ ऑगस्ट १९४२ रोजी पुण्यात हॅमंड या अधिकाऱ्याने केलेल्या गोळीबारात नारायण दाभाडे शहीद झाले. २४ ऑगस्ट १९४२ रोजी व्यंकटेश अंताजी तथा मालक-देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली २० हजारांच्या जमावाने पाटण तहसील कचेरीवर मोर्चा काढून तिरंगा फडकविला. १९४६ साली म्हावशी येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांनी मालक-देशपांडे यांचा 'संयुक्त साताऱ्यातील सच्चा अन् मोठा लढवय्या स्वातंत्र्यसेनानी' या शब्दांत गौरव केला.
खानदेशातील आंदोलन : चलेजाव आंदोलनावेळी साने गुरुजी पुण्यातील भूमिगत चळवळीत सहभागी होते. गुरुजींच्या आदेशाने अंमळनेर येथे डॉ. उत्तमराव पाटील व लिलाताई पाटील या दाम्पत्याने आंदोलन केले.
- धुळे-नंदरबार रोडवरील 'चिमठाणे' येथील सरकारी खजिना आंदोलकांनी लुटला. नंदुरबार येथे शिरीषकुमार मेहता हा विद्यार्थी शाळेच्या इमारतीवर तिरंगा फडकावताना गोळीबारात शहीद झाला.
0 Comments