सविनय कायदेभंग चळवळ व महाराष्ट्र
१९३० साली गांधीजींनी सविनय कायदेभंगाची चळवळ उभारली. सविनय कायदेभंग आंदोलनात 'गांधी टोपी' हे चळवळीचे प्रतिक मानण्यात आले होते.
दांडी यात्रेत सहभागी महाराष्ट्रातील सत्याग्रही : दांडी यात्रेत गांधीजींच्या ७८ अनुयायांपैकी १३ अनुयायी महाराष्ट्रीयन होते. पंडित खरे, गणपतराव गोडसे, बाळासाहेब खेर, केशव हरकारे, विनायकराव, अवंतिकाबाई गोखले, जमनालाल बजाज, द. ना. बांदेकर, स. का. पाटील, हरिभाऊ मोहानी, दत्ताजी ताम्हाणे, शामराव पाटील इत्यादी.
सोलापुरातील सत्याग्रह व मार्शल लॉ : या काळात बेजबुड बेन हे भारतमंत्री होते. १९३० च्या सविनय कायदेभंग आंदोलनात संपूर्ण भारतात महाराष्ट्रातील केवळ सोलापूर जिल्ह्यात मार्शल लॉ (लष्करी कायदा) जारी करावा लागला अशी कबुली भारतमंत्री बेजबुड बेन यांनी दिली. ४ मे १९३० रोजी सरकारने गांधीजींना अटक करून येरवडा कारागृहात रवानगी केली.
- त्याच्या निषेधार्थ ६ मे १९३० रोजी सोलापूरात गिरणी कामगारांनी संप केला. सोलापूरमध्ये १५ मे १९३० रोजी मार्शल लॉ (लष्करी कायदा) पुकारण्यात आला. मार्शल लॉस विरोध करणाऱ्यांपैकी मल्लाप्पा धनशेट्टी, श्रीकिसन सारडा, जगन्नाथ शिंदे आणि कुर्बान हुसेन या चौघांना पोलिस शिपायांच्या खुनाचा आरोप ठेवून १२ जानेवारी १९३१ रोजी येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली. १२ जानेवारी हा सोलापूर जिल्ह्यात 'हतात्मा दिन' म्हणून साजरा केला जातो.
शिरोडा येथील सत्याग्रह : १२ मे ते १५ मे १९३० या काळात ५८३ स्वयंसेवकांनी कोकणातील शिरोडा येथे मिठाचा सत्याग्रह केला. डॉ. आठल्ये, आचार्य जावडेकर, विनायकराव भुस्कुटे यांनी येथे नेतृत्व केले.
वडाळा येथे मिठाचा सत्याग्रह : १७ मे ते १ जून १९३० अखेर मुंबईतील वडाळा येथील मिठागारावर सत्याग्रह.
खानदेशातील सत्याग्रह : पूर्व व पश्चिम खानदेशात कायदेभंगाची चळवळ करण्यात आली. शहादा तालुक्यातील स्वयंसेवक यात आघाडीवर होते.
पुणे जिल्ह्यातील सविनय कायदेभंग : महर्षी वि. रा. शिंदे, केशवराव जेधे, धर्मानंद कोसंबी इत्यादींनी पुणे जिल्ह्यातील मिठाच्या कायदेभंगाचे नेतृत्व केले. कुलाबा, ठाणे येथे एस. एम. जोशी, ना. ग. गोरे यांनी नेतृत्व केले. वि. रा. शिंदे, एस. एम. जोशी यांना सहा महिन्यांची शिक्षा झाली.
बिळाशी जंगल सत्याग्रह : सातारा जिल्ह्यातील बिळाशी येथे स्त्री-पुरुषांनी जंगल सत्याग्रह केला. राजुताई कदम यांनी विशेष धाडस दाखविले. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सातारा व पुणे जिल्ह्यातील सासवड येथे सभा घेतल्या.
पुसदचा जंगल सत्याग्रह : १० जुलै १९३० रोजी लोकनायक बापूजी अणे यांनी ११ स्वयंसेवकासह पुसद येथील आरक्षित जंगलात गवत कापून कायदेभंग केला. बापूजी अणे यांना ६ महिन्यांची शिक्षा झाली. ११ जुलै १९३० रोजी डॉ. मुंजे यांनी सत्यागह केला.
ठाणे येथील सत्याग्रह : नानासाहेब देवधेकर व कमलादेवी चट्टोपाध्याय यांच्या नेतृत्वाखाली ५ मे १९३० रोजी ठाणे जिल्ह्यातील उंबरगाव येथे मिठाचा सत्याग्रह.
चिरनेर सत्याग्रह : २५ सप्टेंबर १९३० रोजी पनवेलजवळील चिरनेर येथील शेतकऱ्यांनी सत्याग्रह केला.
दहीहंडा सत्याग्रह : अकोला जिल्ह्यातील दहीहंडा गावातील खाऱ्या पाण्याच्या विहिरीतील पाण्याचे मीठ तयार करून कायदेभंग करण्यात आला. बापूसाहेब सहस्त्रबुद्धे यांनी या लढ्याचे नेतृत्व केले. एप्रिल १९३० मध्ये नागपूर येथे नरकेसरी अभ्यंकर तर यवतमाळ येथे लोकनायक बापूजी अणे यांच्या नेतृत्वाखाली मिठाच्या पुड्यांचा लिलाव करण्यात आला.
बाबू गेनू यांचे बलिदान : मूळ गाव : महाळुगे पडवळ (ता. आंबेगाव, जि. पुणे) सविनय कायदेभंगात बाबू गेनू काँग्रेसचे सत्याग्रही म्हणून कार्यरत होते. १२ डिसेंबर १९३० रोजी मुंबईतील वाळवादेवी येथील हनुमान रस्त्यावर बाबू गेनू यांनी परदेशी कापडाने भरलेल्या मोटारीपुढे आत्मबलिदान केले.
0 Comments