राजर्षी छत्रपती शाहू महाराज | छत्रपती शाहू महाराजांचे कार्य |

 राजर्षी छत्रपती शाहू महाराज (१८७४-१९२२) 

राजर्षी छत्रपती शाहू महाराज
राजर्षी छत्रपती शाहू महाराज


  • "छत्रपती शाहू महाराज यांच्यासारखा सखा अस्पृश्यांना पूर्वी लाभला नव्हता व पुढेही लाभेल की नाही याबद्दल आम्हास शंका आहे." - डॉ. बाबासाहेब आंबेडकर. 

राजर्षी शाहू महाराजांचा विस्तृत जीवनक्रम खालीलप्रमाणे : 

  • जन्म : २६ जून १८७४ (कागलच्या घाटगे घराण्यात). 
  • जन्मस्थळ : लक्ष्मीविलास पॅलेस, कसबा बावडा (कागलवाडी), कोल्हापूर.  
  • मूळ नाव : यशवंतराव 
  • पित्याचे नाव : जयसिंगराव ऊर्फ आबासाहेब घाटगे
  • आईचे नाव : श्रीमंत राधाबाईसाहेब 
  • दत्तक विधान : १७ मार्च १८८४ (कोल्हापूरचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या पत्नी श्रीमंत आनंदीबाईसाहेब यांनी कागलच्या घाटगे घराण्यातील यशवंतराव यांस दत्तक घेऊन त्यांचे नाव शाहू महाराज असे ठेवले.) 
  • शिक्षण : १८८५ ते १८८९ : या काळात राजकोट येथील राजपुत्रांसाठीच्या महाविद्यालयात शिक्षण. प्रिन्सिपल मॅकनॉटन यांच्या मार्गदर्शनाखाली राजांनी राजकोट येथील शिक्षण पूर्ण केले. 
  • १८९० ते १८९४ : महाराजांनी धारवाड येथे सर एस. एम. फ्रेजर यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्रजी भाषा, राज्य कारभार व जागतिक इतिहास आदी विषयांचे परिपूर्ण अध्ययन केले. 
  • विवाह : १ एप्रिल १८९१ रोजी बडोद्याचे गुणाजीपंत खानविलकर यांची कन्या श्रीमंत लक्ष्मीबाई साहेब यांच्याशी शाहू महाराजांचा विवाह. 
  • राज्याभिषेक : २ एप्रिल १८९४ रोजी वयाच्या २० व्या वर्षी राजे कोल्हापूर संस्थानाचे कायदेशीर वारसदार बनले. शाहू महाराजांचा राज्याभिषेक समारंभ मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड हॅरिस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न.

शाहू महाराजांनी केलेले विविध कायदे : 

  • १८९४ : पासूनच वेठबिगाराची पद्धती बंद करून राजांनी अब्राह्मणांना संस्थानात नोकऱ्या देण्यास सुरुवात केली.
  • १९०१ : महाराजांनी कोल्हापूर संस्थानात गोवध बंदी कायदा केला. 
  • १९१६ : कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्याचे आदेश (प्रत्यक्ष अंमलबजावणी : १९१९ पासून)

शाह महाराजांनी केलेल्या शैक्षणिक सुधारणा :


  • ११ जानेवारी १९११ : कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन केली. 
  • १९११ : संस्थानात १५ टक्के विद्यार्थ्यांना नादारीची घोषणा. 
  • १९१३ : कोल्हापुरात सत्यशोधक समाज शाळा सुरू. 
  • २५ जुलै १९१७ : च्या वटहुकूमाने संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्यात आले. सक्तीच्या शिक्षणाची पहिली शाळा संस्थानात चिपरीपेटा येथे सुरू केली. 
  • १९१८ ला राजाराम कॉलेज (कोल्हापूर) आर्य समाजाकडे हस्तांतरीत केले. लष्करी शिक्षणासाठी संस्थानात इन्फंट्री स्कूलची स्थापना केली. 
  • १९१२ : पाटील शाळांची स्थापना. 
  • १९१८ : संस्थानात तलाठी शाळांची स्थापना. 
  • २५ जून १९१८ : संस्थानातील पारंपरिक कुळकर्णी वतने बंद करून त्या जागी पगारी तलाठ्यांची नेमणूक.
  • २९ जुलै १९१८ : तलाठी हे पद कायमस्वरूपी केले. 

विविध जातीधर्माच्या विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू महाराजांनी स्थापन केलेली वसतीगृहे:

  • १८९६ ते १९२१ या काळात राजांनी कोल्हापुरात सर्व जाती-जमातींच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अशी सुमारे २० वसतीगृहे स्थापन केली. यापैकी प्रमुख वसतीगृहे पुढीलप्रमाणे : राजाराम होस्टेल (१९०१); व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग (१९०१); वीरशैव लिंगायत बोर्डिंग (१९०६); मुस्लीम बोर्डिंग (१९०६); मिस क्लार्क होस्टेल (१९०८); दैवज्ञ बौर्डिंग (१९०८); नामदेव बोर्डिंग (१९११); सरस्वतीबाई गौड सारस्वत बोर्डिंग (१९१५); प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग (१९२०).

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे अस्पृश्यता निर्मुलन कार्य : 

  • २६ जुलै १९०२ : शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीयांसाठी नोकरीत ५० टक्के जागा राखीव ठेवल्या.
  • १९१८ साली कोल्हापूर संस्थानातील महार वतने रद्द करून त्या जमिनी अस्पृश्यांच्या नावे केल्या.
  • मार्च १९१८ : बलुतेदारी पद्धती बंद केली.

राजर्षी शाह महाराजांनी महिलांसाठी केलेल्या सुधारणा : 


  • जुलै १९१७ : पुनर्विवाह व विधवा विवाहास मान्यता देणारा कायदा संस्थानात संमत. 
  • फेब्रुवारी १९१८ : आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा संस्थानात संमत.
  • (स्वतःच्या घराण्यातील मलगी (चलत बहीण) इंदोरच्या होळकर या धनगर घराण्याची सून बनविली. 
  • १९१९ : स्त्रियांना क्रूरपणे वागविण्यास प्रतिबंध करणारा कायदा संमत. 
  • १९२० : संस्थानात घटस्फोटाचा कायदा संमत केला.



Post a Comment

1 Comments