'मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन' अशी प्रतिज्ञा सावरकरांनी बालवयातच अष्टभूजा भगवती या कुलदेवतेसमोर केली होती.
वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी 'स्वदेशीचा फटका'; 'स्वतंत्रतेचे स्तोत्र' ही काव्य रचली.
विद्यार्थीदशेत सावरकरांवर दामोदर चाफेकर यांच्या फाशीचा (बलिदानाचा) प्रभाव होता.
सावरकरांचे क्रांतिकार्य :
सावरकरांनी 'राष्ट्रभक्त समूह' ही संघटना पागे व म्हसकर यांच्या साथीने स्थापन केली .
१ जानेवारी १९०० : भगूर येथे 'मित्रमेळा' या संघटनेची स्थापना. मित्रमेळा ही राष्ट्रभक्त समूहची शाखा होती.
मे १९०४ : मित्रमेळ्याचे रूपांतर 'अभिनव भारत' या संघटनेत झाले.
'अभिनव भारत'चे मुख्यालय : नाशिक
जोसेफ मॅझिनी यांच्या 'यंग इटली' या संघटनेच्या धर्तीवर अभिनव भारतची स्थापना करण्यात आली.
श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंग्लंडमध्ये सुरू केलेल्या 'छत्रपती शिवाजी स्कॉलरशिपची' मदत घेऊन जून १९०६ मध्ये सावरकर कायद्याच्या अभ्यासासाठी लंडनला गेले. तेथे क्रांतिकारकांना प्रेरणा देण्यासाठी सावरकरांनी 'इटलीच्या जोसेफ मॅझिनीचे चरित्र' तसेच १८५७ चे स्वातंत्र्यसमर' (इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स-१८५७) हे ग्रंथ लिहिले. लंडनमधून त्यांनी अभिनव भारत संघटनेच्या सदस्यांना क्रांतिकारी वाङ्मयातून पिस्तूले पाठविली.
अभिनव भारतच्या क्रांतिकार्याचा सुगावा लागताच ब्रिटिशांनी १९०९ मध्ये सावरकरांचे ज्येष्ठ बंधु गणेश ऊर्फ बाबाराव यांना अटक केली. नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याने बाबारावांना काळ्या पाण्याची सजा सुनावली. यामुळे अनंत लक्ष्मण कान्हेरे या अभिनव भारत संघटनेच्या नेत्याने २१ डिसेंबर १९०९ रोजी नाशिकच्या विजयानंद थिएटरमध्ये कलेक्टर जॅक्सनची हत्त्या केली. (या दिवशी तेथे देवल नाट्यकंपनीचे 'शारदा' नाटक चालू होते)
गणु वैद्य याने पोलिसांना अभिनव भारतच्या क्रांतिकारकांची माहिती पुरविली.
जानेवारी १९१० मध्ये वि. दा. सावरकर पॅरिसला गेले, त्यावेळी ब्रिटिशांनी त्यांना फरारी घोषित केले. वि. दा. सावरकर पॅरिसहून इंग्लंडला आले असता जॅक्सनच्या हत्त्येच्या आरोपाखाली त्यांना व्हिक्टोरिया स्टेशनवर अटक करण्यात आली. खटल्यासाठी 'मोरिया' या बोटीतून भारतात आणताना फ्रान्सच्या समुद्रात मार्सेलिस जवळ ८ जुलै १९१० रोज़ी त्यांनी बोटीतून धाडसी उडी टाकून पलायनाचा अयशस्वी प्रयत्न केला.
२२ मार्च १९११ रोजी नाशिक येथील कोर्टाने वि. दा. सावरकरांना ५० वर्षांची शिक्षा ठोठावली व त्यांची रवानगी अंदमान तुरूंगात करण्यात आली. याप्रसंगी ५० वर्षे ! तोवर ब्रिटिश सरकार टिकले तर ना!' हे तेजस्वी उद्गार २८ वर्षीय सावरकरांनी काढले.
१९२४ साली सावरकरांना अंदमानातून हलवून रत्नागिरी येथे स्थानबध्द करण्यात आले.
१९३७ मध्ये प्रांतात सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारने सावरकरांची सुटका केली.
१९३८ साली मुंबई येथील अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. सावरकरांनी साहित्यिकांना 'लेखण्या मोडा, बंदुका घ्या' असे आवाहन केले.
स्वातंत्र्यवीर सावरकरांची ग्रंथ संपदा : माझी जन्मठेप (आत्मचरित्र), शत्रूच्या शिबिरात, अथांग
काव्यसंग्रह : कमला, गोमंतक, सप्तर्षी, विरहोच्छवास . १९२३ साली वि.दा. सावरकर यांनी 'हिंदूत्व व हिंदू कोण' हा ग्रंथ लिहून राष्ट्रवाद व्यक्त केला. या ग्रंथापासून प्रेरणा घेऊन १९२५ साली नागपूर येथे 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची' स्थापना करण्यात आली. आप्पा रामचंद्र कासार हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अंगरक्षक होते, तर गजानन विष्णू दामले हे त्यांचे सचिव होते.
0 Comments